ट्वेन्टी-२० क्रिकेट भारताचा झिम्बाब्वेवर सहज विजय
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ट्वेन्टी-२० क्रिकेट भारताचा झिम्बाब्वेवर सहज विजय Bookmark and Share Print E-mail
हरारे, १२ जून/वृत्तसंस्था
५० मर्यादित षटकांच्या तिरंगी स्पर्धेतील पराभवाची परतफेड करताना ‘टीम इंडिया’ने झिम्बाब्वेचा ६ विकेट आणि ५ षटके राखून दणदणीत पराभव केला. ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या २ सामन्यांच्या झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत भारताने १-० आघाडी घेतली. दुसरा सामना उद्या (रविवार) याच मैदानावर होईल.नाणेफेक जिंकून भारताने झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजी दिली आणि यजमानांचा डाव २० षटकांत १११ धावांवर मर्यादित ठेवला. विजयासाठी आवश्यक धावसंख्या भारताने १४.५ षटकांत ४ विकेट गमावून पार केली. २ बाद १२ आणि ४ बाद ४८ अशा प्रारंभीच्या डळमळीत सुरुवातीनंतर युसूफ पठाण (२२ चेंडूत ३५) आणि विराट कोहली (२२ चेंडूत ३० धावा) यांनी ६७ धावांची अभेद्य भागिदारी पाचव्या विकेटसाठी केली.
त्याआधी भारताने पहिल्याच षटकात झिम्बाब्वेचा सलामीचा फलंदाज मासत्कात्झाचा बळी घेतला. झिम्बाब्वेचा ५० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेतील फॉर्ममधला फलंदाज ब्रेंडॉन टेलर याला विनयकुमारने वैयक्तिक १५ धावांवर पायचीत केले. ४० चेंडूत ४० धावा फटकावून चिभाका तंबूत परतला. आयर्विनने ४४ चेंडूत ३० धावा काढल्या. विनयकुमारने २४ धावांत ३ तर ओझाने ११ धावात २ बळी घेतले. पियुष चावला व अश्विन या फिरकी गोलंदाजांचीही ओझा, विनयकुमार यांना साथ लाभली.
विजयासाठी ५.५५ च्या सरासरीने ११२ धावा फटकाविण्याचे आव्हान भारतापुढे मोठे नव्हते. पण एम. फोफूने मुरली विजय आणि नमन ओझा ही भारताची सलामीची जोडी धावफलकावर १२ धावा असतानाच तंबूत पाठविली.     
झिम्बाब्वे :- हॅमिल्टन मासाकाद्झा झे. रैना गो. विनय कुमार १, ब्रेन्डन टेलर पायचित गो. चावला ४०, तातेंदा तैबू झे. शर्मा गो. अश्विन ४,  क्रेग आयर्विन त्रि. गो. दिन्डा ३०, एल्टन चिगुम्बुरा झे. विजय गो. ओझा ३, ग्रेग लॅम्ब पायचित गो. ओझा ०, प्रॉस्पर उत्सेया त्रि. गो. विनय कुमार ६, रे प्राईस त्रि. गो. दिन्डा ०२, एड रेन्सफोर्ड नाबाद १, ख्रिस एमपोफू नाबाद ३. अवांतर (लेगबाईज ३, वाईड १, नोबॉल २) ६. एकूण २० षटकात ९ बाद १११. बाद क्रम : १-२, २-३०, ३-४६, ४-७३, ५-८०, ६-८१, ७-१०३, ८-१०५, ९-१०७.
गोलंदाजी : विनय कुमार ३-०-२४-३, दिन्डा ३-०-२७-२, ओझा ४-०-११-२, अश्विन ४-०-२२-१, चावला ४-०-१४-१, पठाण २-०-१०-०.
भारत :- मुरली विजय झे. उत्सेया गो. एमपोफू ५, नमन ओझा झे. तैबू गो. एमपोफू २, सुरेश रैना झे. चिगुम्बुरा गो. प्राईस २८, रोहित शर्मा यष्टिचित तैबू  गो. प्राईस १०, विराट कोहली नाबाद ३०, युसूफ पठाण नाबाद ३७. अवांतर (वाईड ३, नोबॉल १) ४. एकूण १४.५ षटकात ४ बाद ११३. बाद क्रम : १-७, २-१२, ३-४७, ४-४८.
गोलंदाजी : एमपोफू ४-०-३१-२, रेन्सफोर्ड ३-०-२५-०, उत्सेया २-०-११-०, प्राईस ४-०-२७-२, चिगुम्बुरा १-०-१०-०, लॅम्ब ०.५-०-९-०.