पशुचिकित्सालयाची दुरवस्था
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पशुचिकित्सालयाची दुरवस्था Bookmark and Share Print E-mail
सतीश टोणगे, कळंब, १२ जून
‘पशुधन हेच सर्वोच्च धन’ असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्याची निर्मिती झाली. पण हे दवाखान्यांची सध्या दयनीय अवस्था असून उपचाराअभावी पशुधन नष्ट होऊ नये, म्हणून शेतकरी मातीमोल किमतीमध्ये जनावरे विकू लागले आहेत. कळंब येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला ‘सुपर - ए’ दर्जा मिळूनही हा दवाखाना शेवटच्या घटका मोजत आहे.
अपुरे कर्मचारी, औषधाचा तुटवडा, पडकी इमारत, दवाखान्यासमोर मटन मार्केट, दवाखान्याला साधी पाटीही नाही. ही अवस्था आहे, कळंब येथील प्राण्यांसाठीच्या उपचार केंद्राची. या दवाखान्याला शहर व शहराशेजारील २० ते २५ गावांतील शेतकरी आपली जनावरे उपचारांसाठी आणतात. बाह्य़ रुग्ण विभागाचीही दयनीय अवस्था झालेली आहे. पत्रे, दरवाजे, खिडक्याही नाहीत. घाणीचे साम्राज्य आहे. जुने बांधकाम असल्याने कधी पडेल हे सांगता येत नाही; त्यामुळे कर्मचारीही थांबत नाहीत. औषधे नसल्याने शेतकरी त्रासून गेला आहे. जनावरे उपचाराअभावी मरण्यापेक्षा, कोणत्याही किमतीमध्ये विकण्याची तयारी दाखविल्याने हे पशुधन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या भागात जनावरांची संख्या भरपूर आहे. सरकार वर्षभराच्या औषधासाठी २० हजार रुपयांची तुटपुंजी तरतूद करीत असल्याने औषधाचा तुटवडा जाणवू लागला आहे.
तालुक्यामध्ये येरमाळा, शिराढोण, दहीफळ, खामसवाडी या ठिकाणी पशुचिकित्सालये आहेत; परंतु तेही औषधाविना चालू असतात.
कळंब येथील सुपर ए दर्जा मिळालेले पशुचिकित्सालयालाच खऱ्या अर्थाने उपचारांची गरज आहे. न बोलता येणाऱ्या मुक्या जनावरांसाठीच्या उपचारासाठी सुसज्ज चिकित्सालये उभारण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.