पत्नीला जिवंत जाळणाऱ्या गुन्हेगाराचा खटला
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

पत्नीला जिवंत जाळणाऱ्या गुन्हेगाराचा खटला Bookmark and Share Print E-mail
जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी
अर्चना गंभीरे खूनखटला
बीड, १२ जून/वार्ताहर

दारूच्या आहारी जाऊन पत्नीला  जिवंत जाळणाऱ्या अच्युत नानासाहेब गंभीरे याला कडक शिक्षा व्हावी. यासाठी हा खून खटला जलद गती न्यायालयात चालवावा, अशी मागणी युवक क्रांती दलाच्या मीरा डोईफोडे यांनी पत्रकाद्वारे केली.
केज तालुक्यातील मुंडेवाडी येथे अर्चना गंभीरे या विवाहितेला मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून तिचा पती अच्युत व सासरच्या लोकांनी खून करून तिला जाळून टाकले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी श्रीमती डोईफोडे यांनी गावाला भेट दिली. त्यानंतर पोलीस अधिकारी   यांच्याशी घटनेची एकूण माहिती घेतली.
दारूच्या आहारी जाऊन अच्युत याने पत्नीचा खून केला. गावागावांत सुरू असलेल्या दारूची दुकानांमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन आपण किती भयानक कृत्य करतो आहे याचे भानही त्यांना राहत नाही.
अर्चना या विवाहितेचा दोन वेळा गर्भपात झाला होता. त्यामुळे तिला मूलबाळ होत नाही हा आरोपही खोटा आहे. केवळ दारूच्या व्यसनामुळे ही घटना घडली आहे. त्यामुळे हा खूनखटला जलद गती न्यायालयात चालवावा   आणि    आरोपीला कडक शिक्षा  द्यावी अशी मागणी श्रीमती डोईफोडे यांनी केली आहे.