मिनी बससेवेची मागणी
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मिनी बससेवेची मागणी Bookmark and Share Print E-mail
परतूर, १२ जून/वार्ताहर
ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या पाहता एस. टी. महामंडळाने तालुक्यातील प्रमुख मार्गावर मिनी बससेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
सोमवारपासून शैक्षणिक वर्षांला सुरुवात होणार आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावा-गावातून शहरात शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या मुला-मुलींची संख्या मोठी आहे. गावात आठवीचा व त्यापुढील वर्ग उपलब्ध नसल्याने अनेक पालक मुली व मुलांना पुढील शिक्षणासाठी परतूरला पाठवतात. शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी विशेष बाब म्हणून मोफत पासची योजना फार पूर्वीच लागू केली. शेकडो मुली शिक्षण घेण्यासाठी बसने ये-जा करतात. परंतु प्रमुख मार्गावर बसच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचता येत नाही.  
अवैध वाहतूक करणारी वाहने क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी बसवून भरधाव वेगाने पळविली जातात. त्यामुळे जीवास धोका निर्माण होतो. अशाप्रकारे अनेक निष्पाप प्रवाशांचा बळी गेलेला आहे. शालेय विद्यार्थ्यांना लवकर येता यावे व घरी वेळेवर परतता यावे, तसेच तालुकाभरात बोकाळलेल्या अवैध वाहतुकीस लगाम बसावा यासाठी सातोना, वाटूर, श्रुष्टी, येणोरा, हलडी, सोयंजना, दैठणा, वलखेड, उस्मानपूर, बामणी, रायपूर, सिरसगाव, रोहिणा इतर रस्त्यांवर महामंडळाने मिनी बससेवा सुरू केल्यास विद्यार्थ्यांसह प्रवाशांची सोय होऊ शकते.