राष्ट्रवादीच्या मोफत रोगनिदान शिबिरात ८००हून अधिक रुग्णांवर उपचार
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

राष्ट्रवादीच्या मोफत रोगनिदान शिबिरात ८००हून अधिक रुग्णांवर उपचार Bookmark and Share Print E-mail
औरंगाबाद, १२ जून/खास प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या औरंगाबाद पूर्व आणि महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत रोगनिदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.
समाजातील तळागाळातील लोकांची सेवा करणे, त्यांचे जीवनमान उंचाविणे यासाठी औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या विभागात आरोग्य शिबिर घेणार असल्याची माहिती आमदार सतीश चव्हाण यांनी दिली. या शिबिराचे उद््घाटन श्रीमती वीणा खरे यांच्या हस्ते झाले.
प्रत्येक कार्यकर्त्यांने शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करावे असे आवाहन आमदार चव्हाण यांनी केले. राष्ट्रवादीच्या स्थापनेला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पक्षामुळे मागासवर्गीयांना गेल्या १० वर्षांत न्याय मिळालेला आहे. दलित, मुस्लिम, अल्पसंख्यांक, कामगार, विद्यार्थी, युवक यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादीने स्थापनेपासूनच आग्रह धरला आहे असे श्रीमती वीणा खरे म्हणाल्या. सर्व कार्यकर्त्यांंनी आपआपले मतभेद विसरून एकत्र यावे आणि शरद पवार यांनी दाखविलेल्या स्वाभिमानाचा मार्ग अवलंबावा असे आवाहन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकरराव मुळे यांनी केले.
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त वातावरणातील समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण, प्रदूषण नियंत्रण, दारूबंदी, महिलांवर होणारे अत्याचार याबाबत जनजागरणाची मोहीम हाती घेतली जाईल असे राष्ट्रवादीचे औरंगाबाद पूर्वचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार यांनी सांगितले. या मोफत   रोगनिदान शिबिरात ८८६   रुग्णांवर उपचार करण्यात आले.