एस.टी.च्या जालना विभागाची लक्षणीय कामगिरी
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

एस.टी.च्या जालना विभागाची लक्षणीय कामगिरी Bookmark and Share Print E-mail
जालना, १२ जून/वार्ताहर
खासगी प्रवासी वाहतुकीच्या स्पर्धेतही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जालना विभागाने लक्षणीय कामगिरी बजाविली आहे. गेल्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत जालना विभागाच्या उत्पन्नात एक कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.
एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत शाळा-महाविद्यालयांच्या सुट्टय़ांमुळे एस. टी. गाडय़ांना गर्दी होती. मे महिन्यात तर लग्नांची धामधूम होती. एप्रिल आणि मे महिन्यांत प्रवाशांची संख्या वाढेल हे गृहीत धरून त्या दृष्टीने एस. टी.च्या जालना विभागाने नियोजन केले होते. नांदेड, परभणी, निजामाबाद त्याचप्रमाणे बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर इत्यादी भागांतील एस. टी. बसेसचा मार्ग जालना शहरातूनच जातो. त्यामुळे या भागातील एस. टी. गाडय़ा मोठय़ा प्रमाणात जालना शहरातून ये-जा करतात. असे असले तरी जालना विबागाने या दोन महिन्यांत आपल्या विभागातील गाडय़ांचे व्यवस्थित नियोजन केले. नांदेड-परभणी आणि विदर्भातून येणाऱ्या गाडय़ा औरंगाबाद किंवा त्या मार्गाने जालना येथून पुढे जातात. त्यामुळे या गाडय़ांमधून जालना येथून औरंगाबादला जाण्यासाठी या दोन महिन्यांत प्रवाशांना जागा मिळणे जवळपास दुरापास्तच झाले होते. मे महिन्यात तर बस गाडय़ांमध्ये पाय ठेवायलाही जागा नाही, अशी परिस्थिती असायची.
यामुळे या काळात जालना-औरंगाबाद आणि परत अशा अनेक गाडय़ा जालना बसस्थानकातून सोडण्यात येत होत्या. प्रवाशांची गर्दी वाढली की अनेक वेळेस अशी गाडी सोडली गेली. अनेकदा अशा गाडय़ा विनावहकही सोडण्यात आल्यामुळे जालना-औरंगाबाद आणि परत प्रवास करणाऱ्यांची सोय झाली. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली निम्म्या किमतीच्या तिकिटात प्रवास सुविधा, एस. टी.च्या त्रमासिक आणि पासेसच्या सुविधा इत्यादींमुळेही बसगाडय़ांची गर्दी वाढली. त्यामुळे काळ्या-पिवळ्या गाडय़ा आणि अन्य खासगी वाहनांची स्पर्धा असतानाही एस. टी.च्या जालना विभागाच्या गेल्या महिन्याच्या उत्पन्नात वाढ झाली.
एप्रिल आणि मे महिन्यांत एस. टी.च्या जालना विभागातील गाडय़ांच्या प्रवासात तीन लाख ८५ हजार किलोमीटर एवढी मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. जालना एस. टी. आगार राज्यात२१ व्या क्रमांकावर राहिला. या दोन महिन्यांत जिल्ह्य़ातील परतूर आगार प्रवासी भारमान, उत्पन्न इत्यादीसंदर्भात राज्यातील २४७ आगारांमध्ये प्रथम क्रमांकावर राहिला आहे. जिल्ह्य़ातील अंबड आगारही राज्यात ३४ व्या क्रमांकावर राहिला आहे. प्रवासी वाहतूक आणि उत्पन्नासंदर्भात जालना विभागाने अव्वल स्थान पटकावलेले असले तरी प्रामुख्याने जालना बसस्थानकाच्या स्वच्छतेकडे मात्र पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नसल्याच्या तक्रारी आहे. विदर्भ त्याचप्रमाणे परभणी-नांदेडकडून येणाऱ्या-जाणाऱ्या गाडय़ांमुळे जालना येथील मध्यवर्ती बसस्थानक नेहमी गजबजलेले असते; परंतु तेथील स्वच्छता आणि अन्य सुविधांकडे मात्र पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नाही.