जनगणनेत ओबीसींच्या स्वतंत्र नोंदीसाठी समता परिषदेचे धरणे
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

जनगणनेत ओबीसींच्या स्वतंत्र नोंदीसाठी समता परिषदेचे धरणे Bookmark and Share Print E-mail
औरंगाबाद, १२ जून/खास प्रतिनिधी
सध्या चालू असलेल्या जनगणनेत ओबीसीची स्वतंत्र नोंद घेऊन इतर मागसवर्गीयांना न्याय द्यावा अशी मागणी पुन्हा एकदा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने केली आहे. समता परिषद, महाराष्ट्र ओबीसी जनजागरण समिती यांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.
हे धरणे आंदोलन परिषदेचे विभागीय अध्यक्ष डॉ. संजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष जयराम साळुंके आणि मल्हार सेनेचे लहुजी शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली झाले. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी जातीनिहाय जनगणनेला संमती दर्शविली आहे. असे असतानाही काही पक्ष आणि संघटनांनी याला विरोध दर्शविला आहे. यामुळे देशातील ओबीसी समाजात तीव्र नाराजी पसरली आहे.
तालुका आणि सर्कलनिहाय जनगणनेत ओबीसीची स्वतंत्र नोंद घेण्यासाठी पूर्वीच जनजागरण मोहीम राबविण्यात आली होती. येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मुंबई विद्यापीठाला जगन्नाथ शेठ यांचे नाव द्यावे, पुणे विद्यापीठाचे नामांतर क्रांतिज्योती सावित्रीमाता फुले आणि सोलापूर विद्यापीठाला अहल्यादेवी होळकर तर जळगाव विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात यावे अशी मागणीही या वेळी करण्यात आली आहे.
मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या नावाखाली बहुजनांच्या दीनदलित व उपेक्षितांच्या मुलामुलींची कत्तल करू नका, त्यांच्यासाठी पूर्णपणे परीक्षा पद्धत रद्द करू नका, त्यांच्या गुणवत्तेचे परीक्षण व्हावे अशीही मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनात अ‍ॅड्. महादेव आंधळे, स. सो. खंडाळकर, संजीवनी घोडके, सुभाष दाभाडे, रमेश गायकवाड, पंडित सत्त्वधर, एल. एन. पवार, अनिता देवतकर आदी सहभागी झाले होते.