जीप झाडाला धडकून एक ठार, पाच जखमी
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

जीप झाडाला धडकून एक ठार, पाच जखमी Bookmark and Share Print E-mail
अंबड, १२ जून/वार्ताहर
शनी आमवस्येनिमित्ताने गेवराई तालुक्यातील श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथे शनिदर्शनासाठी चाललेल्या हिंगोली येथील भाविकांची जीप झाडाला धडकून एक जण ठार व पाच जण गंभीर जखमी झाले. जालना-अंबड रस्त्यावरील लालवाडी पाटीजवळ आज पहाटे ५ वाजता हा अपघात झाला.
या अपघातात शंकरलाल चंपालाल साहू (वय ६०) जागेवरच ठार झाले. गणेश भगवान देवकाते, शिवशंकर उमाकांतअप्पा सराफ, चंद्रकांत बापूराव खरजुले, घनश्याम मदनलाल मुंदडा, चालक अतिश तिवारी जखमी झाले. हे पाच जण शनिआमवस्येनिमित्त राक्षसभुवन येथे दर्शनासाठी जीपने (क्रमांक एमएच ३८-१६६०) चालले होते. जालना-अंबड रस्त्यावरील लालवाडी पाटीजवळ चालकाला डुलकी आल्याने नियंत्रण सुटून जीप लिंबाच्या झाडावर जोरात धडकली.  अपघाताचा आवाज ऐकून जवळच शेतात राहणारे लालवाडी येथील अर्जुन खरात तिकडे धावले. त्यांनी जखमींना उपचारासाठी नेण्याची मदत केली. अंबड पोलिसांनी जखमींना येथील उप-जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले.