संरक्षित साठय़ातील सात हजार टन खत उपलब्ध
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

संरक्षित साठय़ातील सात हजार टन खत उपलब्ध Bookmark and Share Print E-mail
नांदेड, १२ जून/वार्ताहर
मृगाच्या पावसाची चाहूल लागताच जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी खताची वेळेवर उपलब्धता होण्यासाठी संरक्षित साठय़ातील सात हजार टन खत जिल्हा पणन अधिकारी आणि कृषी उद्योग विकास महांडळ यांच्याकडे उपलब्ध करून दिले आहे.
शेतकऱ्यांची डीएपी आणि १०:२६:२६ खताची वाढती मागणी तसेच जिल्ह्य़ास जून महिन्यात एकही रेक न प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डिकर यांनी कृषी आयुक्तांकडे संरक्षित साठा वितरित करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यासाठी मान्यता मिळविली. जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव इंगोले आणि कृषी सभापती प्रकाशराव भोसीकर यांनी शेतकऱ्यांना वेळेवर खतपुरवठा होण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. श्री. गुल्हाणे आणि श्री. हर्डिकर यांनी ३५०० टन डीएपी आणि ३५०० टन १०:२६:२६ खते तालुकानिहाय ठरवून दिलेल्या गुणांकानुसार वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अर्धापूर प्रत्येकी १८० टन, भोकर २१३, बिलोली २०४, देगलूर २१०, धर्माबाद १६३, हदगाव २६८, हिमायतनगर १५१, कंधार २७१, किनवट २५९, लोहा २६३, माहूर १८०, मुदखेड १९७, मुखेड २८५, नांदेड २५३, नायगाव २६२ आणि उमरी तालुक्यात १४० टन डीएपी आणि तेवढय़ाच प्रमाणात १०:२६:२६ शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा साठा विविध कृषी सेवा केंद्रांवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. सदर विक्री केंद्रांवर नियुक्त कर्मचाऱ्यांसमक्ष होणार आहे. आवश्यकतेनुसार खत खरेदी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी केले आहे.