शेतक ऱ्यांना कर्ज देणे भाग पाडू -टोपे
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

शेतक ऱ्यांना कर्ज देणे भाग पाडू -टोपे Bookmark and Share Print E-mail
भोकरदन, १२ जून/वार्ताहर
‘‘शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरिता राष्ट्रीयीकृत बँकांसह मोठय़ा बँका टाळाटाळ करीत आहेत. या बँकांच्या प्रमुखांसह व्यवस्थापकांना पुढील आठवडय़ात जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून कर्ज देण्यास भाग पाडणार आहे. त्यांनी शेतकऱ्यांना कर्ज न दिल्यास प्रसंगी मी मंत्री असूनही रस्त्यावर उतरून आंदोलन करीन,’’ असे प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी आज जाफराबाद सांगितले.
भोकरदन येथील श्री गजानन महाराज नागरी सहकारी बँकेच्या जाफराबाद शाखेचे उद्घाटन आज श्री. टोपे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर बाजार समितीच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार चंद्रकांत दानवे होत. प्रमुख पाहुणे म्हणून जालना जिल्हा परिषदच्या शिक्षण समितीचे सभापती राजेश चव्हाण, कृषी समितीचे सभापती मनीष श्रीवास्तव उपस्थित होते.
श्री. टोपे म्हणाले की, सहकार क्षेत्राला उर्जितावस्थेत काम सरकारी करीत आहे. जाफराबाद हा विकसनशील तालुका असल्याने येथील शेतकरी, शेतमजूर आणि छोटय़ा व्यापाऱ्यांना या बँकेचा लाभ होणार आहे. सहकार क्षेत्रात काम करताना हेवेदावे न ठेवता माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे सहकारी संस्थारूपी मंदिरात जाताना मनातील राजकारणरूपी जोडे बाहेरच ठेवावे.
शेतकऱ्यांना आज कर्जाची नितांत गरज असून बँकांनी कमीत कमी कागदपत्रांत त्वरित अर्ज उपलब्ध करून द्यावे. नागरी बँकांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून मोबाईल आणि एटीएम सुविधांसह न झोपणारी बँक ग्रामीण भागात उपलब्ध करून द्यावी. मुख्यमंत्र्यांनी नांदेड जिल्हा बँकेप्रमाणेच जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १ अब्ज रुपये उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नव्या दमाने कर्जपुरवठा करण्यासाठी या बँकेची परिस्थिती सुधारणार आहे, असे श्री. टोपे म्हणाले.
गेल्या वर्षी खताचा तुटवडा होता. या वर्षी मात्र जालना जिल्ह्य़ाला ३ हजार ६०० टन खत उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे खतटंचाई जाणवणार नाही, असे सांगून श्री. टोपे म्हणाले की, व्यापाऱ्यांनी कृत्रिम टंचाई निर्माण करू नये म्हणून प्रत्येक तालुक्याच्या खरेदी-विक्री संघामार्फत खतपुरवठा करण्यात येईल. तसेच काळाबाजार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. जालना जिल्ह्य़ाची जुनी ओळख पुसून श्रीमंत जिल्हा म्हणून ओळख निर्माण होण्यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर भर द्यावा. याचे अनुदान ७५ टक्क्य़ांपर्यंत वाढविण्याचा सरकार विचार करीत असून यासोबतच जोडधंदा आणि दुग्ध व्यवसायसुद्धा शेतकऱ्यांनी विकसित केले पाहिजे.
बँकेचे संस्थापक अध्यक्ष गणेशराव रोकडे यांनी प्रास्ताविक केले. आमदार दानवे म्हणाले की, या बँकेमुळे जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांचा फायदा होणार असून भाजपाच्या काही बडय़ा नेत्यांनी स्वत:च्या संस्थापुरत्याच बँका सुरू ठेवल्या आहेत. अनेक बँका सुरू झाल्या आणि लगेच बंद पडल्या. मात्र रोकडे यांच्या बँकेचा आलेख चढता असून तो कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड करावी.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण मिरकर यांनी केले. सरव्यवस्थापक सतीश रोकडे व व्यवस्थापक प्रकाश खरात यांनी आभार मानले.