कळमनुरी, औंढय़ासह ग्रामीण भागात गॅस्ट्रोची साथ
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

कळमनुरी, औंढय़ासह ग्रामीण भागात गॅस्ट्रोची साथ Bookmark and Share Print E-mail
हिंगोली, १२ जून/वार्ताहर
कळमनुरी परिसरात गेल्या १५ दिवसांपासून गॅस्ट्रोची लागण सुरू आहे. कळमनुरीच्या रुग्णालयात काल १९ रुग्ण दाखल झाले. आता याचे लोन औंढा नागनाथसह ग्रामीण भागात पसरले. आमदार राजीव सातव यांनी आज औंढा रुग्णालयास भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.
कळमनुरीसह ग्रामीण भागात गेल्या पंधरा दिवसांपासून गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. कळमनुरी ग्रामीण रुग्णालयात गेल्या सोमवारी ५३ रुग्ण होते. मंगळवारी त्यात ४२ एवढी वाढ झाली. बुधवारी ४१, गुरुवारी ४६ आणि शुक्रवारी १९ रुग्ण दाखल झाले होते.
गॅस्ट्रोच्या आजाराने त्रस्त असलेले धीरज तेलगोटे, सूर्याबी खादिर खाँ, मंगल राऊत, रसूल बी, संतोष सरगड (सर्व कळमनुरी), कुंडलिक चिकणे (सांडस), विश्वनाथ गावंडे (मोरवड), शुभम करंडे (वाडी), संजय खांडेकर (जांभरुन), उषा मस्के (धानोरा), आनंदा काकळे (धानोरा), शोभा सोनटक्के (जटाळवाडी), कल्पना पवार (टाकळी), पंडितराव मस्के (पार्डी), दत्ता मगरे (उमरा) आज रुग्णालयात दाखल झाले.
ही साथ औंढा परिसरात पसरली आहे. औंढा ग्रामीण रुग्णालयातही गॅस्ट्रोचे रुग्ण आहेत. औंढा, शिरड शहापूर, पिंपळदरी, जवळाबाजार, लोहरा येथील अधिकारी-कर्मचारी रुग्णालयात गैरहजर राहतात, अशा तक्रारी आहेत. श्री. सातव यांनी आज अचानक औंढा ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. आरोग्य विभागाचे कर्मचारी रुग्णालयात हजर नसतात अशा तक्रारी उपस्थितांनी केल्या. ‘‘याकडे आता मी जातीने लक्ष घालून सुधारणा होण्यासाठी प्रयत्न करणार आहे,’’ असे आश्वासन श्री. सातव यांनी दिले.