परभणी जिल्ह्य़ामध्ये सर्वत्र पावसाचे दमदार आगमन
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

परभणी जिल्ह्य़ामध्ये सर्वत्र पावसाचे दमदार आगमन Bookmark and Share Print E-mail

परभणी, १२ जून/वार्ताहर
जिल्ह्य़ात मध्यरात्री पावसाने हजेरी लावली. मध्यरात्री जवळपास जिल्ह्य़ात सर्वत्र पाऊस झाला. पेरणीसाठी अजून दमदार पावसाची अपेक्षा आहे. असे असले तरीही आजच्या पावसाने या हंगामाची सुरुवात चांगली केली आहे.

मृग नक्षत्र सुरू होऊन चार दिवस लोटले तरीही पावसाचा पत्ता नव्हता. जीवघेण्या उकाडय़ाला सारेच त्रस्त झाले होते. पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात असतानाच मध्यरात्री शहरात तो आला. रात्री १२ ते १ असा तासभर पाऊस पडला. या पावसाने वातावरणातला उष्णा बराचसा कमी केला. पावसाच्या आगमनानंतर थंडगार वाऱ्याने सारा आसमंतच सुखावला. जोरदार वाऱ्यासह हा पाऊस होत असतानाच रात्री वीज गायब झाली. विजेचा हा लपंडाव पहाटेपर्यंत सुरूच होता. शेवटी रात्री दीडच्या आसपास गेलेली वीज सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास आली. त्यामुळे पावसानंतर वाढलेला उकाडा अधिकच असह्य़ करणारा ठरला.
शहरात मध्यरात्री पावसाने आपली सलामी दिली असली तरीही जिल्ह्य़ात काही ठिकाणी पाऊस सायंकाळीच सुरू झाला होता. सेलू तालुक्यात सायंकाळी ७ वाजता पावसाचे आगमन झाले. पाथरी तालुक्यातही रात्री १० वाजण्याच्या सुमारास पाऊस झाला. गंगाखेड तालुक्यात रात्री १२.३० वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस तासभर चालू होता. एकूणच मृगाच्या पहिल्या पावसाने जिल्ह्य़ात सर्वदूर सलामी दिली आहे.
शेतकरी सध्या जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काल रात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनाही थोडाफार दिलासा मिळाला आहे. मशागतीची कामे सर्वत्र आटोपली असून पेरणीयोग्य पावसाचीच आता प्रतीक्षा आहे. आज दिवसभरही आकाश ढगाळ होते. त्यामुळे उन्हाची तीव्रता तेवढी जाणवली नाही. शिवाय रात्रीच्या पावसानेही सुखद असा शिडकावा केल्याने उकाडाही कमी जाणवला.

एक तास मुसळधार पाऊस
गंगाखेड/वार्ताहर -
मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. प्रखर उष्णता आणि उकाडय़ामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना तासाभराच्या मुसळधार पावसाने सुखद धक्का बसला. पावसाने बहुतांश भागांमध्ये पाणी साचले. विशेष म्हणजे १४ लाख रुपये खर्ची घालून नगरपालिकेने गोदावरी नदीत जेवढे पाणी साठवले होते तेवढेच पाणी पहिल्याच दमदार पावसाने साचल्याचे पाहावयास मिळाले. या पावसामुळे  शेतकरीवर्गात आनंद पसरला आहे.


पत्रे उडाले, वीज गायब
उस्मानाबाद/वार्ताहर -
शहर व जिल्ह्य़ात काल मोठा पाऊस झाल्याचे वाटले खरे; पण आकडेवारीचा त्याला दुजोरा मिळत नाही.काही वेगळेच सांगत आहे. जिल्ह्य़ात काल सरासरी १६.३ मिलीमीटर पाऊस झाला. वाऱ्यामुळे अनेकांचे नुकसान मात्र झाले. झोपडपट्टी भागात पत्रे उडून गेले, तर अध्र्या शहरात रात्रभर अंधार होता.
उस्मानाबाद आणि तेर हे दोन महसुली क्षेत्र वगळता ढोकी आणि बेंबळी क्षेत्रात पाऊस झालाच नाही. तालुक्यात सरासरी १२.५ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. पण वाऱ्यामुळे द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले.
परंडा तालुक्यात काल सर्वाधिक पावसाची नोंद झाली, तर लोहारा तालुक्यात त्याचे दर्शनच झाले नाही. आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत पडलेला सरासरी पाऊस असा (आकडे मिलीमीटरमध्ये) : उस्मानाबाद १२.५, तुळजापूर ३.८, उमरगा १०.८, लोहारा शून्य, कळंब १४.६, भूम २२, वाशी ३३.१, परंडा ३३.३.    

मुलगी ठार
हिंगोली, १२ जून/वार्ताहर

वादळी वाऱ्यामुळे घराचे दार पडून वसमत येथील श्रीधर गल्लीमध्ये आज सायंकाळी आकांक्षा आनंदा राठोड (वय ८)  ठार झाली. ही दुर्घटना सायंकाळी ६ वाजता झाली. घराचे प्रवेशद्वारच आकांक्षाच्या अंगावर पडले. त्याखाली ती चिरडली गेली. वसमतमध्येच वीजवाहक तारांवर दुपारी मोठे झाड पडल्याने विजेच्या तारा तुटल्या. त्यामुळे शहरातील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद होता. हिंगोली औद्योगिक वसाहतीत काल झालेल्या वादळी वाऱ्याने घरावरील तसेच गोदामावरील पत्रे उडाले. एका घराच्या भिंतीच्या विटा पडल्याने दोन बालके किरकोळ जखमी झाले.