मदरशाची भिंत पडून पाच विद्यार्थी ठार
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मदरशाची भिंत पडून पाच विद्यार्थी ठार Bookmark and Share Print E-mail
गंगापूर तालुक्यातील मेहंदी भालगावजवळच्या म्हसा शिवारातील दुर्घटनेत पाच जखमी
औरंगाबाद, १२ जून/खास प्रतिनिधी

गंगापूर तालुक्यातील मेहंदी भालगावजवळील मदरशाची भिंत पडून नमाज पढणारे पाच विद्यार्थी जागीच ठार झाले. पाच जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी औरंगाबादेतील सरकारी रुग्णालयात आणण्यात आले आहे. ही भीषण दुर्घटना आज सायंकाळी घडली. ठार झालेल्या विद्यार्थ्यांची नावे अशी : आरेफ मुन्सी (जामगाव), फरहान शफीक (धोत्रा), सादीक अब्दुल नासीर (औरंगाबाद), मोबीन शेख (गाडीवार), इरफान महंमद (नायगाव). जखमी विद्यार्थी : मोबीन शेख (वय १२), अब्दुल रहेमान (वय ७), जावेद शेख वहीद (वय ८), अब्दुल समद (वय ११), महंमद इद्रीस अब्दुल रज्जाक (वय १०).
गंगापूरमध्ये काल आणि आज वादळी वाऱ्यासह मृग नक्षत्र बरसला. या पावसामुळे आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मेहंदी भालगावजवळील म्हसा शिवारात असलेल्या उस्मानबिन अफवान या मदरशाची भिंत पडली.
काल झालेल्या मुसळधार पावसानंतर आजही दुपारपासून गंगापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आला. या वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील पत्रे उडाले. मेहंदी भालगावजवळ उस्मानबिन अफवान मदरसा आहे. या मदरशावरील पत्रे आज दुपारी उडाले आणि पत्रे उडाल्यानंतर भिंतही कोसळली. ही भिंत कोसळल्यामुळे नमाज पढणारे पाच विद्यार्थी जागीच ठार झाले. जखमी पाच विद्यार्थ्यांच्या पायाला आणि डोक्याला इजा झाली आहे. या सर्वाना तातडीने औरंगाबादच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार चालू आहेत.  भालगावजवळ म्हसा हे निर्जन गाव आहे. या गावात मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी अरबी मदरसा आहे. तेथे ४७ मुले शिकतात. त्यापैकी ४२ मुले आज मदरशामध्ये होती. नमाजाची वेळ असल्यामुळे सर्व मुले एकत्र जमली होती. अचानक वीज कडाडल्याने ते सारे भीतीने व्हरंडय़ात आले आणि त्याच क्षणी भिंत कोसळली. या भिंतीखाली ही मुले दबली गेली. मदरशावरील पत्रे उडू नये म्हणून दोन ते तीन फूट उंचीची वरंडी बांधण्यात आली होती. ती पडल्यामुळे पाच मुले जागीच ठार झाले.
या दुर्घटनेचे वृत्त कळताच तहसीलदार अरुण दराड आणि गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. डी. शिंदे सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले. या ताफ्याने व अन्य रहिवाशांनी भिंतीखाली असलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश मिळविले.
गंगापूरच्या उप-जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यासाठी एकच डॉक्टर उपलब्ध होता. गंगापूरमधील काही डॉक्टरांनी उपचारासाठी मदत केली. मदरशाचे चालक शेख गनी यांनी मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह ओळखले. औरंगाबादचे संपर्कमंत्री राधाकृष्ण विखे आणि प्रभारी जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर घटनास्थळी भेट देणार आहेत.
गंगापूर तालुक्यात काल सायंकाळी चार वाजता वादळी वाऱ्यासह मृगनक्षत्राचे आगमन झाले. गंगापूर-औरंगाबाद मार्गावरील वीज कंपनीचे खांब जमीनदोस्त झाले आहे. गंगापूर तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत. वैजापूर आणि लासूर रस्त्यावरही झाडे उन्मळून पडल्याचे चित्र आहे. पंचायत समितीच्या कार्यालयावरील पत्रे वादळाने उडाले आहेत.