‘देवासाठी समर्पित जीवनातून खऱ्या आशीर्वादाची अनुभूती’
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

‘देवासाठी समर्पित जीवनातून खऱ्या आशीर्वादाची अनुभूती’ Bookmark and Share Print E-mail
नगर, १२ जून/प्रतिनिधी
देवापुढे लीन-नम्र होऊन प्रार्थना करणारा राजापुढे ताठ मानेने उभा राहू शकतो. याचाच सहजसोपा अर्थ म्हणजे देवासाठी समर्पित जीवन जगणारा कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असला तरी अद्भूत आशीर्वादीत जीवन जगू शकतो, असा संदेश आंध्रप्रदेशातील वक्ते रेव्ह. डॉ. डेव्हीड राई यांनी येथे दिला.
सावेडीतील जॉय इन जीझस मिनिस्ट्रीजच्या वतीने बिशप लॉईड कॉलनीत डॉ. राई यांची प्रार्थनासभा घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी पवित्र बायबलमधील विविध वचनांच्या आधारे प्रभू येशू ख्रिस्ताचे वैभवी पुनरागमन व त्या दृष्टीने त्याच्या प्रियजनांची अपेक्षित तयारी या बाबत संदेशातून मार्गदर्शन केले. पवित्र आत्म्याचा अभिषेक, आत्मिक पतनातून सावरणे, पापांची कबुली, पश्चाताप करून देवाकडे वळणे, विश्वासाने धार्मिकतेचे जीवन जगणे, देवाच्या वचनांचे रहस्य जाणून घेणे, देवाच्या इच्छेचा सन्मान करणे, आधी नम्रता मग मान्यता या उक्तीने समर्पित जीवन जगणे, पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारी फलप्राप्ती, प्रार्थनेचे ओझे आणि सेवेची संधी, ‘मी-पणा’ सोडणे, पवित्रजनांची सहभागिता आदी विविध विषयांचा डॉ. राई यांनी दोन दिवस चाललेल्या संध्याकाळच्या संजीवन सभा व दुपारच्या बायबल अभ्यासात परामर्ष घेतला.
संस्थेच्या वतीने प्रथमच अशी जाहीर सभा घेतल्याचे व तिला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे संयोजक ब्र. अरुण अब्राहम व पास्टर आलेश यांनी या वेळी सांगितले. पॉल भिंगारदिवे, अशोक पटारे, सुहासकुमार देठे, पास्टर मनेष अमृत, अब्राहम चेरियन, सोनाजी ठोंबे यांनी या सभेसाठी परिश्रम घेतले.