गुण फुगविण्याचे आयसीएसईचे धोरण एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

गुण फुगविण्याचे आयसीएसईचे धोरण एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक Bookmark and Share Print E-mail
विविध संघटनांच्या प्रतिक्रिया
मुंबई, १२ जून / प्रतिनिधी

पाककला, शारीरिक शिक्षण, फॅशन डिझायनिंग, योगा, पर्यावरण अशा ‘स्कोअरींग’ विषयांच्या आधारे आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना भरघोस गुण देण्याचा प्रकार एसएससीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. आयसीएसईच्या गुण फुगविण्याच्या या धोरणामुळेच त्यांचे विद्यार्थी खूप हुशार असल्याचा गैरसमज समाजात पसरला आहे, अशा तीव्र प्रतिक्रिया विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या आहेत.
या प्रतिक्रिया आज ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीनंतर उमटल्या आहेत. एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र व तीन भाषा असे एकूण सहा मुख्य विषय (कोअर सब्जेक्ट) सक्तीचे आहेत. तेच विषय घेऊन ‘बेस्ट फाइव्ह’चा पर्याय स्वीकारण्याची तयारी आयसीएसईच्या पालकांनी दाखवावी, अशी आव्हानवजा सूचना पीटीए युनायटेड फोरमच्या अध्यक्षा अरूंधती चव्हाण यांनी केली आहे. एसएससीच्या पालकांनीही आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी आता कंबर कसायला हवी, असेही त्या म्हणाल्या.
तकलादू विषयांमध्ये चांगले गुण मिळाले म्हणून प्रवेशामध्ये आपला हक्क सांगणाऱ्या आयसीएसई विद्यार्थी-पालकांची अरेरावी राज्य सरकारने खपवून घेऊ नये. एसएससी बोर्डाला तुच्छ लेखून आपल्या मुलांना आयसीएसईच्या शाळांमध्ये दाखल करणाऱ्या पालकांना अकरावीत मात्र एसएससी बोर्ड कसेकाय चांगले वाटते, असा सवाल जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी व्यक्त केला.
आयसीएसई बोर्ड स्कोअरींग विषयांच्या आधारे विद्यार्थ्यांचे गुण फुगवत असेल तर राज्य शिक्षण मंडळानेही आपल्या विद्यार्थ्यांना अधिक विषयांचे पर्याय उपलब्ध करून भरघोस गुण मिळविण्याची संधी खुली करावी, असे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सांगितले. हलक्याफुलक्या विषयांच्या आधारे गुण मिळविणारे आयसीएसईचे विद्यार्थी, पालक एसएससी विद्यार्थी व पालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे एसएससीच्या पालकांमध्ये जागृती करून त्यांना संघटित करण्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करणार असल्याचे छात्रभारतीचे अध्यक्ष भूषण जाधव यांनी सांगितले. महाराष्ट्रात राहूनही राज्य सरकारचे नियम पाळण्यास विरोध करणाऱ्या आयसीएसईच्या पालकांची अरेरावी निषेधार्ह असल्याची नाराजी ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’चे  सरचिटणीस गजानन काळे यांनी व्यक्त केली.