खाँसाहेब आणि कार्तिकीची बहारदार मैफल
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

खाँसाहेब आणि कार्तिकीची बहारदार मैफल Bookmark and Share Print E-mail
नगर, १२ जून/प्रतिनिधी
‘लिटील चॅम्प’ विजेती कार्तिकी गायकवाड व ख्यातकीर्त शास्त्रीय गायक खाँसाहेब उस्ताद गुलाम नियाँज खाँ यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. केडगाव येथील संदीप संगीत विद्यालयाच्या अकराव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सवात नगरकरांना ही सुरेल मेजवानी मिळाली.
यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन भानुदास कोतकर यांच्या हस्ते झाले. नगर शहरात अद्ययावत सुविधांनी युक्त अशा वास्तूत संगीत विद्यालय सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
कार्तिकीचा कोतकर यांच्या हस्ते, तर खाँसाहेबांचा ज्येष्ठ गायक पंडित रेवणनाथ भनगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्तिकीने गायलेल्या ‘घागर घेऊन’, ‘खंडेरायाच्या लग्नाला’ या गाण्यावर प्रेक्षकांनी अक्षरश: ताल धरला. विद्यालयातील प्रफुल्ल जाधव, वैभव बनसोडे, सुनील मरकड, प्रशांत थोरात, मुकुंद बोरकर या विद्यार्थ्यांनी समूह तबलावादन केले. केशव गाडेकर यांची गाणी रसिकांना आवडली. त्यानंतर उस्ताद खाँसाहेबांच्या गायनाने मैफलीने कळस गाठला. त्यांनी ‘कहे सखी कहे सखी’ ही यमन रागातील पारंपरिक बंदिश एकतालात गायिली.
कार्यक्रमास कल्याण गायकवाड, माजी महापौर संदीप कोतकर, प्रभाकर गुंड, कानगुडेमहाराज, सोनवणे गुरुजी, रावसाहेब ताठे, जयसिंग भोर आदी उपस्थित होते. श्याम नानेकर यांनी प्रास्ताविक  केले. सूत्रसंचालन संजय आंधळे यांनी केले. संयोजन अच्युत सुतार यांनी केले, तर आभार तनपुरे यांनी मानले.