‘बायबल सोसायटी’च्या नगर शाखेला दुसरे बक्षीस
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

‘बायबल सोसायटी’च्या नगर शाखेला दुसरे बक्षीस Bookmark and Share Print E-mail
नगर, १२ जून/प्रतिनिधी
पवित्र बायबलचे लेखन, छपाई व वितरण या कार्यासाठी समाजातून निधीसंकलन करण्यामध्ये गेल्या वर्षी महाराष्ट्र व गोवा विभागात नगरच्या शाखेने दुसरा क्रमांक पटकावला. बायबल सोसायटी ऑफ इंडियाच्या मुंबई ऑक्झिलरीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबद्दल नगर शाखेचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
मुंबई ऑक्झिलरीच्या अलीकडेच पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मावळते अध्यक्ष बिशप राईट रेव्हरंड प्रकाश पाटोळे व नवीन अध्यक्ष बिशप राईट रेव्हरंड डॉ. अब्राहम मार पौलस यांच्या हस्ते बायबल सोसायटीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य उल्हास देसाई, रेव्ह. डॉ. जॉन प्रभाकर, प्रा. फ्रँकलिन कुटिन्हो, डॉ. संजय पाटोळे, प्रदीप राजगुरू व प्रा. योगेश विलायते यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ऑक्झिलरीचे सचिव रेव्हरंड डॉ. व्हिक्टर गोलापल्ली, पुणे शाखेचे टी. वाय. वाघमारे आदी या वेळी उपस्थित होते.  
बायबल सोसायटी ऑफ इंडिया सुमारे २०० वर्षे जुनी नोंदणीकृत संस्था असून, बायबलचे लेखन, छपाई आणि सवलतीच्या दरात वितरण संस्थेमार्फत करण्यात येते.
समाजाच्या प्रत्येक घटकातून या सेवाकार्यासाठी ऐच्छिक स्वरुपात निधीसंकलन केले जाते. जमा होणाऱ्या रकमेचा विनियोग कशा प्रकारे झाला, त्याची माहिती दर वर्षी वार्षिक सभा घेऊन संस्थेच्या सभासदांपुढे व समाजापुढे अहवालाद्वारे मांडली जाते. सन २००९-१० या आर्थिक वर्षांत मुंबई ऑक्झिलरीने महाराष्ट्र व गोवा या राज्यांतून २६ लाख १० हजार १ रुपये संकलन करून १८ लाख ७७ हजार ३४७ बायबल प्रतींचे वितरण-विक्री केली.  संस्थेच्या नगर शाखेचे यात ३ लाख ३३ हजार १०० रुपयांचे योगदान होते.
पुणे शाखेने ६ लाख ७८ हजार ५५ रुपयांसह प्रथम क्रमांक, नगरला दुसरा क्रमांक, १ लाख ९२ हजार ९०० रुपयांसह नागपूर शाखेचा तिसरा क्रमांक, १ लाख ४४ हजार २६१ रुपयांसह नाशिक शाखेचा चौथा, तर १ लाख ३५ हजार ४६१ रुपये संकलनासह कल्याण शाखेने पाचवा क्रमांक मिळविला.
डॉ. शिरीष शिरसाठ नवे सदस्य
ऑक्झिलरीच्या नव्या कार्यकारिणीत नगरचे प्रतिनिधी म्हणून डॉ. शिरीष शिरसाठ यांची प्रथमच निवड झाली. यापूर्वी उल्हास देसाई, रेव्ह. डॉ. जॉन प्रभाकर हे ऑक्झिलरीचे सदस्य होते.