आवर्तनाचे श्रेय लाटण्यासाठीच आमदार शिंदेंवर टीका-कोपनर
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आवर्तनाचे श्रेय लाटण्यासाठीच आमदार शिंदेंवर टीका-कोपनर Bookmark and Share Print E-mail
राशीन ,१२ जून/प्रतिनिधी
कर्जत तालुक्याचे चालू आवर्तन बंद करून पाणी पाणी करण्याची वेळ राष्ट्रवादीच्याच पुढाऱ्यांनी आणली. हक्काचे पाणी बंद केल्याने संभाजीराजे भोसले यांनी आंदोलन केले. आमदार राम शिंदे लोकप्रतिनिधीच्या नात्याने आंदोलनात सहभागी झाले. तालुकाभर ‘रास्ता रोको’ केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण केल्यानेच आवर्तन सुटले. मात्र, घनश्याम शेलार यांनी आवर्तन न सोडताच वृत्तपत्रात बातम्या छापून आणल्या. यातून त्यांचीच प्रसिद्धीची हौस दिसून येते, असा प्रतिटोला भाजपचे तालुकाध्यक्ष शांतिलाल कोपनर यांनी मारला.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी नुकतीच आमदार शिंदे यांची कामापेक्षा प्रसिद्धीसाठी धडपड चालू असल्याची टीका केली होती. प्रसिद्धीपत्रकाद्वारे भाजपचे तालुकाध्यक्ष कोपनर यांनी त्यांचा शाब्दिक हल्ला परतून लावला. पाण्यासाठी सर्वपक्षियांनी आंदोलनात उडी घेतली होती. मात्र, शेलार यांची भाषा आगलावी आहे. श्रीगोंदे तालुक्याने नेहमी मजा पाहण्याचे काम केले. आवर्तन बंद करणारी हीच मंडळी आहे. दुसऱ्याच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारून पुन्हा ‘विशेष आवर्तन’ दिल्याचा बडेजाव मारण्याची राष्ट्रवादीवाल्यांची जुनीच पद्धत आहे. कर्जत-करमाळ्याच्या हक्काचे पाणी गेले कोठे? कर्जतसाठी दुसरे आवर्तन कागदोपत्रीच दिल्याचे दाखवले. त्यावेळी शेजारच्या तालुक्यातील पालकमंत्र्यांना हा अन्याय दिसला नाही का, व्हिजन-२०ची स्वप्नं दाखवणाऱ्या पाचपुते यांनी समन्यायी भूमिका घ्यावी, असेही कोपनर म्हणाले.
आमदार शिंदे यांनी तालुकाभर आंदोलने केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. त्यावेळी पाणी सोडण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कर्जत तालुक्यातील जनतेचा प्रक्षोभ पाहिल्यानंतर जलसंपदा मंत्र्यांनी पाणी सोडण्याची भूमिका घेतली. त्यामुळे याचे श्रेय आमदार शिंदे यांना जाते. कुकडीच्या पाण्याचे श्रेय त्यांनाच जाईल, या भीतीने राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांना टार्गेट केले.
आता कर्जतकरांच्या प्रयत्नांनी आवर्तन सुटल्यावर श्रीगोंदेकर मंडळी जागी झाली. पाण्यासाठी जगताप पिता-पुत्रांनी पालकमंत्र्यांना साकडे घातले आहे. कर्जतवर अन्याय झाला त्यावेळी ही मंडळी कोठे गेली होती, असा सवाल कोपनर यांनी उपस्थित केला.
 सरकारदरबारी शेलार यांचे वजन आहे, मग आवर्तन सोडण्यासाठी महिना का लागला. कुकडीच्या आवर्तनाबाबत कर्जतवर नेहमी अन्याय होत आला आहे. टेल टू हेड पाण्याचे नियोजन व्हावे, असे कोपनर म्हणाले.