विश्वकोश ऑस्करचा
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विश्वकोश ऑस्करचा Bookmark and Share Print E-mail
लेख

अरविंद व्यं. गोखले , रविवार , १८ जुलै २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मराठी भाषेत चित्रपटांवर पुस्तके प्रसिद्ध झाली; हॉलिवूडवरही अनेकांनी लिहिले. त्यात श्रीकृष्ण जकातदार, रा. बा. कुलकर्णी, वा. य. गाडगीळ अशी काही मंडळी जुन्या पिढीत होऊन गेली. काही नावे अलीकडच्या काळातही पुढे आली; पण या नव्या पुस्तकाच्या लेखिकेचे असे स्वतंत्र नाव त्यांनी नसतानाही हे धाडस करावे हे विशेष होते आणि त्यात लेखिकेला शंभर टक्के यश मिळाले आहे. त्यांचे नाव आहे, शैलजा देशमुख!

त्यांनी मराठीत, सोप्या भाषेत वाचकांच्या हाती ऑस्करचा हा विश्वकोशच दिला आहे. या पुस्तकाचे नाव आहे, ‘अ‍ॅण्ड द ऑस्कर गोज टू.!’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या २२ जुलै रोजी अमोल पालेकर व परेश मोकाशी यांच्या उपस्थितीत पुण्यात होत आहे.
मराठी भाषेत ऑस्करविषयी देखणे पुस्तक तुमच्या हातात दिले तर तुम्ही काय कराल? हा संदर्भग्रंथही आहे, त्यात असंख्य सौंदर्यस्थळे आहेत आणि विषयांचेही वैविध्य आहे. नुसत्या या कल्पनेनेच आपण तो पट उलगडायचा प्रयत्न करायला लागतो. आता तसे करायची आवश्यकता नाही. तुमच्या हाती अख्खा कोशच दिला जात आहे. पुण्याच्या शैलजा देशमुख यांनी ऑस्करविषयी सारे काही सांगणारा हा विश्वकोश तयार केला आहे. ऑस्करचा हा आकृतिबंध नाही म्हटले तरी गेल्या ८२ वर्षांचा आहे. म्हणजे या सरळसरळ ८२ कथा आहेत. आगळ्यावेगळ्या कथांची परिमाणे अर्थातच वेगवेगळी आहेत. या चित्रपटांपैकी काही चित्रपट काळाच्या पडद्याआड गेले आहेत, तर काही चित्रपट आजही ताजेतवाने वाटावेत असे आहेत; ते जुने झाले असले तरी! अकादमी पुरस्कारांचा इतिहासही तितकाच रंजक बनलेला आहे. त्याबद्दल वाचकाला उत्सुकता असणे स्वाभाविक आहे. हा सोहळा इतका देखणा आणि नेटका
असतो, की त्याबद्दल आपल्या मनात आदरयुक्त दबदबा असतो. गेली काही वर्षे या सोहळय़ाचे थेट प्रक्षेपण जगभरात केले जाते. ते दोनशे देशांमध्ये दाखवण्यात येते. त्यामुळेच पुरस्काराचा इतिहास, त्याचा आरंभकाळ, त्याची आताची स्थिती, अशा बऱ्याच गोष्टींना लेखिकेने उत्तमरीत्या चित्रित केले आहे. पहिल्यावहिल्या ऑस्कर पुरस्काराचे वितरण १६ मे १९२९ रोजी  झाले. चित्रपटसृष्टीतले दिग्दर्शक, अभिनेते, लेखक आणि तंत्रज्ञ, तसेच जे जे उत्तम त्यांचा गौरव करणे हा हेतू ठेवून चित्रपटांच्या पुरस्कारांची कल्पना मांडण्यात आली. या कल्पनेचे जनक होते, ‘मेट्रो गोल्डविन मेअर’ या स्टुडिओचे प्रमुख लुईस बी. मेयर! अभिनेता डग्लस फेअरबँक्स (सीनिअर) हा त्या संस्थेचा अध्यक्ष बनला. प्रारंभी निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, लेखक आणि तंत्रज्ञ या पाच शाखांचाच विचार पारितोषिकासाठी केला जावा, असे ठरवण्यात आले. पहिल्या पारितोषिकांची नावे समारंभापूर्वी तीन महिने आधी जाहीर करण्यात आली होती. सुरुवातीच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण रेडिओवरून करण्यात आले. पहिल्या दहा वर्षांमध्ये वृत्तपत्रांना आधी निकाल देऊन त्यांना ही नावे निकालाच्या दिवशी रात्री अकरा वाजता जाहीर करण्याची विनंती करण्यात येऊ लागली; पण ‘लॉस एंजेलिस टाइम्स’ या वृत्तपत्राने १९४१मध्ये ही यादी आधीच प्रसिद्ध केली. तेव्हापासून ती सीलबंद पाकिटातून देण्याची प्रथा सुरू करण्यात आली. असे बरेच काही आपल्याला या ऑस्करविषयीच्या विश्वकोशात वाचायला मिळते. माहिती असलेली किंवा माहिती नसलेली गोष्ट वाचतानाही ती त्यांनी कंटाळवाणी बनू दिलेली नाही.
या पुरस्कारांचा प्रारंभ होतो तो ‘विंग्ज’ या १९२७-२८च्या चित्रपटाने! ‘पॅरामाऊंट पिक्चर्स’चा हा त्या वर्षीचा सवरेत्कृष्ट चित्रपट! तो मूकपट होता हे विशेष! पहिल्या महायुद्धात सामील झालेल्या दोन वैमानिक योद्धय़ांची ही कथा आहे. साहस आणि मृत्यूचे तांडव यांचे द्वंद्व दाखवणारा, तसेच अंगावर शहारे आणणारा हा चित्रपट मती गुंग करून सोडतो, असे लेखिकेने म्हटले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची कथा अगदी अलीकडे म्हणजे २००६ मध्ये दिग्दर्शक विल्यम वेलमनच्या चिरंजीवांनी ‘द मॅन अँड हिज विंग्ज’ या पुस्तकातून मांडली होती. चित्रपट तयार झाला त्या वर्षी त्याचे अवघे दोन प्रतिस्पर्धी होते. हा चित्रपट तरीही २० लाख डॉलर खर्च करून बनवण्यात आला होता. ऑस्करचा त्या वर्षीचा सन्माननीय पुरस्कार चार्ली चॅप्लिन यांना देण्यात आला होता. त्या पुढल्या वर्षी ‘ब्रॉडवे मेलडी’ हा ‘बोलपट’ ऑस्करविजेता ठरला. तो नृत्य-संगीतप्रधान होता. या चित्रपटाचा काही भाग रंगीत बनवल्याने त्याचे प्रचंड स्वागत झाले.  समीक्षकांनी मात्र त्याला अजिबातच गौरवले नाही. उलट तो सर्वात वाईट असल्याचे त्यांचे म्हणणे पडले. हा चित्रपट ‘एमजीएम’चा होता. सन १९२९-३०मध्ये ‘ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट’ हा युद्धाचे वास्तव सांगणारा चित्रपट आला. मृत्यूचे तांडव आणि माणुसकीवरचा विश्वास उडावा इतके क्रौर्य आणि रक्तपात यांचा थरार त्यात होता. हा चित्रपट परिणाम-कारकतेच्या बाबतीत सर्वच काळात श्रेष्ठ आहे, असे लेखिकेचे म्हणणे आहे. ज्या चित्रपटाने ग्रेटा गाबरेला सर्वप्रथम नाव मिळवून दिले तो १९३१-३२चा ‘ग्रँड हॉटेल’! या हॉटेलमध्ये लोकांची जा-ये सुरू असते, प्रत्यक्षात घडत तर काहीच नाही. मग त्या हॉटेलात उच्चभ्रू मंडळींची जा-ये सुरू होते आणि या चित्रपटाच्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी ग्रेटा गाबरे आणि जॉन बॅरिमूर या जोडीचा प्रणय होता. ग्रेटा गाबरे चित्रपटात ‘बॅले डान्सर’ आहे. अतिशय नाटय़पूर्ण कथानक आणि अनेक व्यक्तींचे एकत्र येणे असे त्याचे वैशिष्टय़ होते. त्या पुढल्या वर्षी ‘कॅव्हाल्केड’ या चित्रपटाने बाजी मारली. लंडनमध्ये राहणाऱ्या जोडप्याच्या दृष्टिकोनातून इंग्लंडमध्ये १८९९ ते १९३२ या कालखंडात होत गेलेला सामाजिक, आर्थिक बदल  मांडण्याचा प्रयत्न त्यात करण्यात आला आहे. त्या संपूर्ण कालखंडावर नाही म्हटले तरी युद्धाचा कसा प्रभाव होता. ते चित्रपटातल्या बारीक बारीक प्रसंगांतून दाखवण्यात आले आहे. सन १९३४मध्ये आलेल्या ‘इट हॅपन्ड वन नाईट’ या नर्मविनोदी आणि हळुवार प्रेमकथेने एक वेगळा पायंडाच पाडला. क्लार्क गेबल आणि क्लॉडेट कोल्बर्ट या जोडीचा हा चित्रपट अतिशय गाजला. हिंदी चित्रपट-सृष्टीवरही काही काळ त्याचा प्रभाव होता. देव आनंद-वहिदा रेहमानचा ‘सोलवा साल’, राज कपूर-नर्गिस यांचा ‘चोरी चोरी’, आमिर खान-पूजा भट यांचा ‘दिल है के मानता नहीं’ या चित्रपटांवर त्याची छाप होती. त्या वर्षी सर्वाधिक नामांकने होती, त्यात ‘क्लिओपात्रा’ हा त्या काळात गाजलेला आणि नंतर त्यावरून बेतलेल्या अनेक चित्रपटांचा ‘जनक’ही होता. १९३५मध्ये आलेला ‘म्युटिनी ऑन द बाउंटी’ हा अतिशय उत्कंठावर्धक चित्रपट त्याच्या अतिशय तरल अशा छायाचित्रणाने गाजला. १७८७ मध्ये ‘एचएमएस बाउंटी’ या बोटीवर झालेल्या बंडाचे हे कथानक आहे. १९३७ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द लाइफ ऑफ एमिल झोला’ या प्रख्यात फ्रेंच लेखक एमिल झोलाच्या जीवनावर आधारलेल्या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ही गोष्टच फार अप्रतिम आहे.
त्याला लेखक म्हणून मान्यता मिळत असतानाच एक अत्यंत खळबळजनक घटना फ्रान्समध्ये घडते. कॅप्टन आल्फ्रेड ड्रेफस (जोसेफ शिल्डकॉट) या फ्रेंच-ज्युईश अधिकाऱ्यावर लष्करातल्या गुप्त गोष्टी जर्मनीला पुरवल्याचा आरोप ठेवला जातो. तो निरपराध असताना त्याला डेव्हिल्स आयलंड येथे जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी पाठवण्यात येते. ड्रेफसची पत्नी ल्यूसी सत्य शोधून काढायची विनंती करायला एमिलकडे येते. मग एमिल आपली सर्व शक्ती पणाला लावतो आणि मग त्याची ती जगप्रसिद्ध कादंबरी जन्माला येते, ‘आय अ‍ॅक्यूज’! धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्या विरोधात उभे राहायचे धाडस तो करतो. समाजवाद आणि विचारस्वातंत्र्य यांच्या या  पुरस्कर्त्यांला अंगावरल्या कपडय़ांनिशी इंग्लंडमध्ये पलायन करावे लागते, अशी ही कहाणी, पण ती इथेच संपत नाही. हा एमिल झोला उभा केला आहे पॉल म्युनीने! तथापि, त्याला सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला नाही. तो मिळाला, ‘कॅप्टन करेजस’ या चित्रपटासाठी स्पेन्सर ट्रेसी याला! १९३८मध्ये आलेला ‘यू कान्ट टेक इट विथ यू’ हा फ्रँक काप्राचा चित्रपट सर्वार्थाने अर्थपूर्ण ठरला. आजही आपल्याला हे वाक्य बऱ्याच जणांना ऐकवावेसे वाटत असते, पण आपण ते सुनवू शकत नाही. भौतिक गोष्टी, संपत्ती मृत्यूनंतर आपण  ‘वर’ नेऊ शकत नाही, असा ‘संदेश’ देणारा हा चित्रपट आहे. फ्रँक काप्राला उत्कृष्ट चित्रपटाबरोबरच उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार देण्यात आला. त्याआधीचा ‘इट हॅपन्ड वन नाइट’ या त्याच्या चित्रपटाने बाजी मारलेलीच होती. त्यानंतरच्या वर्षी आला तो सवरेत्कृष्ट चित्रपट, ‘गॉन विथ द विंड’! क्लार्क गेबल आणि व्हिव्हियन ली यांच्या प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट आजही आपल्याला ‘अहा!’ म्हणायला भाग पाडतो. या एका चित्रपटाला १९४०मध्ये एकूण नऊ अकादमी पुरस्कार जाहीर झाले. व्हिव्हियन लीला सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला, पण सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मात्र त्या वर्षी क्लार्क गेबलला न मिळता तो ‘गुड बाय मि. चिप्स’साठी रॉबर्ट डोनाटला मिळाला.

 

चित्रपटांची पारायणे
लेखिका शैलजा देशमुख यांनी ज्ञानप्रबोधिनीच्या ‘छात्र प्रबोधिनी’साठी चित्रपटांवर यापूर्वी रसास्वाद लिहिलेला आहे. या पुस्तकाचे अर्धे लेखन २००२मध्ये आपण पूर्ण केले आणि मग त्याचा क्रम ठरवून कामाला लागले, असे त्यांनी म्हटले आहे.  साधारणपणे एकेक चित्रपट सात-आठ वेळा पाहून आणि बऱ्याचदा त्यातल्या संवादासाठी मागे जाऊन किंवा ते थांबवून त्या पुढे गेल्या. अशा पद्धतीने त्यांची पारायणे झाली. त्यातली सौंदर्यस्थळे टिपली, त्याची टिपणे तयार केली आणि मगच त्याच्या लिखाणाला हात घातला. ऑस्कर पुरस्कार गेल्या काही वर्षांपासून आपल्या कुतुहलाचा विषय बनलेला आहे. ‘गांधी’ चित्रपट ऑस्करमध्ये आणि व्यवहारात प्रचंड यशस्वी झाला तरी ते यश महात्मा गांधी या व्यक्तिमत्त्वाचे होते. तो चित्रपट  शंभर टक्के आपला नव्हता. सन २००८मध्ये ‘स्लमडॉग मिल्योनेर’ आला आणि त्याने क्रांती घडवली. आपल्या मातीशी हा चित्रपट जोडला गेलेला असल्याने त्या विषयी आपल्या भावना अचानकपणे उचंबळून आल्या. त्यातले ‘जय हो’ हे आधीच लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन बसले होते. त्यामुळे ए. आर. रेहमानला पारितोषिक म्हणजे जणू ते व्यक्तिगत स्वरूपात आपलेच पारितोषिक आहे असे आपण मानले.
आपण मॅथेमॅटिक्सची विद्यार्थिनी असल्याने कामाच्या चौकटी आखून घेऊन ते पूर्ण केल्याचे त्या अभिमानाने सांगतात. आपला हा लिखाणाचा सारा कालखंड म्हणजे निखळ आनंदाचा काळ होता असे त्या म्हणाल्या. १९२७पासून ते २००९पर्यंतच्या साऱ्या ऑस्करविजेत्यांना मराठीत एकत्र आणायचे महत्कार्य त्यांनी अशा पद्धतीने पूर्ण केले आहे. या चित्रपटांसाठी निवड कशी केली जाते, त्यांचा निवडीचा निकष काय असतो, अशा आपल्यासारख्याच शंका लेखिकेच्या मनात रुंजी घालत होत्या. त्यांनी त्या सोडवायचा त्यांच्या परीने प्रयत्न तर केलाच, पण त्या पलीकडे जाऊन त्यांनी प्रत्येक चित्रपटाच्या कथानकालाही आत्मसात केले आणि ते आपल्या भाषेत लिहून काढले. हे चित्रपट एकूण होतात ८२! त्यांच्या कथानकासह त्यांच्याविषयी लिहिणे हे अत्यंत जिकिरीचे असणारे कामही त्यांनी अतिशय व्यवस्थित पार पाडले. झपाटल्याप्रमाणे चित्रपट पाहणे, ते समजून घेणे, त्याचा मनात उमटलेला आकृतिबंध तपासून पाहणे, त्यातले सौंदर्य, मर्म शब्दबद्ध करणे, आवश्यक ती तांत्रिक माहिती मिळवणे, या असल्या कष्टाच्या कामालाही त्यांनी स्वत:ला अक्षरश: जुंपून घेतले. त्या एम. ए., एम. एड आहेत आणि त्या पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये अध्यापनाचे काम करतात. अनेक पुस्तकांचे संपादन आणि विविध विषयांवर त्यांनी आतापर्यंत लेखन केले आहे.

‘कॅसाब्लांका’ (१९४३), ‘गोइंग माय वे’ (१९४४), ‘द लॉस्ट वीकएण्ड’ (१९४५), ‘जंटलमन्स अ‍ॅग्रीमेंट’ (१९४७), ‘ॉरेन्स ऑलिव्हिएचा ‘हॅम्लेट’ ( १९४८), बेट्टी हटनची प्रमुख भूमिका असलेला ‘द ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ’ (१९५२), ‘द ब्रीज ऑन द रिव्हर क्वाय’ (१९५७), ज्या चित्रपटाने त्या काळात निर्मितिमूल्यांचे, लढायांचे, पोशाखी कपडेपटांचे, दागदागिन्यांचे तोपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले होते तो ‘बेनहर’ (१९५९) अशा काही चित्रपटांविषयी या पुस्तकात इतके भरभरून लिहिले गेले आहे, की आपली मती त्या काळाच्या पडद्यावर गुंग होऊन जाते. ‘बेनहर’ने त्या वर्षी तब्बल ११ अकादमी पुरस्कार मिळवले होते. नताली वुडची प्रमुख भूमिका असलेला आणि शेक्सपिअरच्या ‘रोमिओ अ‍ॅण्ड ज्युलिएट’वरून बेतलेला ‘वेस्ट साइड स्टोरी’ (१९६१), पीटर ओ’टूल, जॅक हॉकिन्स, ओमर शरीफ, अँथनी क्वेल, अँथनी क्वीन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ (१९६२) हे काही चित्रपट म्हणजे त्या काळातले आजच्या भाषेतले ‘बाप’ चित्रपट होते. सन १९६४मध्ये जॉर्ज बर्नार्ड शॉच्या ‘पिग्मॅलियन’ या मूळ नाटकावर आधारित ‘माय फेअर लेडी’ ही संगीतिका ब्रॉडवेवर लोकप्रिय झाली होती. आपण तिला पुलंच्या ‘ती फुलराणी’ने ओळखतो. ऑड्रे हेपबर्न, रेक्स हॅरिसन यांच्या नावांनी आणि त्याच्या संगीताने जो चित्रपट अजरामर करून ठेवला तो ‘माय फेअर लेडी’ हा १९६४चा चित्रपट म्हणजे आधीच्या सर्व चित्रपटांवर केलेली मात होती. एक कोटी ७० लाख डॉलर एवढा खर्च करून ‘वॉर्नर ब्रदर्स’ने तो बनवला होता आणि त्याला मिळालेले यशही तेवढेच दिमाखदार होते. ‘माय फेअर लेडी’नंतर आलेल्या आणखी एका संगीतिकेने पुढचे वर्ष दणाणून सोडले. हा चित्रपट अर्थातच ‘द साऊंड ऑफ म्युझिक’! ज्युली अँड्रय़ूज अणि ख्रिस्तोफर प्लमर यांच्या भूमिकांमुळे आणि अर्थातच रिचर्ड रॉजर्स, ऑस्कर हॅमरस्टाईन आणि आयर्विन कोस्टल यांच्या संगीताने गाजलेला हा चित्रपट अजरामर बनला आहे.
दुसऱ्या महायुद्धातल्या एका अमेरिकी जनरलच्या जीवनावर बेतलेला ‘पॅटन’ हा चित्रपट म्हणजे जॉर्ज सी. स्कॉटची सारी करामत होय! सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा त्या वर्षीचा पुरस्कार त्याचाच होता. त्यानंतरच्या वर्षांमध्ये आलेले चित्रपट एकसे बढकर होते.  ‘द फ्रेंच कनेक्शन’ (१९७१), ‘द गॉडफादर’ (१९७२), ‘द स्टिंग’ (१९७३), ‘द गॉडफादर (भाग-२, १९७४), ‘द वन फ्ल्यू ओव्हर ककूज नेस्ट’ (१९७५), ‘क्रॅमर व्हर्सेस क्रॅमर’(१९७९) आणि १९८२चा ‘गांधी’! सवरेत्कृष्ट चित्रपटासह एकूण आठ पुरस्कार मिळवून या चित्रपटाने त्या वर्षी कमाल केली होती. बेन किंग्जले, रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्या अनुक्रमे अभिनयाची आणि दिग्दर्शनाची ती कमाल होती, तशी ती त्या अतिव्याप्त अशा ऐतिहासिक आणि भावूक विषयाचीही होती. १९८७चा ‘द लास्ट एम्परर’, १९८८चा ‘रेन मॅन’, १९९१चा ‘द सायलन्स ऑफ द लॅम्ब्ज’ (अँथनी हॉपकिन्स, ज्यूडी फॉस्टर), १९९२चा ‘अनफरगिव्हन’ (क्लिंट ईस्टवूड), १९९५चा ‘ब्रेव्हहार्ट’, १९९७चा ‘टायटानिक’, २००१चा ‘ए ब्यूटीफुल माइंड’, २००८चा ‘स्लमडॉग’ आणि २००९चा ‘द हर्ट लॉकर’ असेही हे काही चित्रपट! त्यांची आपल्याला बरीच माहिती मिळते. काही चित्रपट पाहिलेले, तर काही न पाहताच नुसते ऐकलेले, पण त्या सर्वाचा एक कोश गुंफून तो वाचकांना नजाकतीने पेश केला गेला आहे. आतमध्ये असणारी चित्रे पाहतांना तर आपण हरखून जातो. आजवर सर्वाधिक म्हणजे अकरा अकादमी पुरस्कार मिळवणारे चित्रपट अवघे तीन निघाले, त्यात ‘बेनहर’, ‘टायटॅनिक’ आणि ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज-द रिटर्न ऑफ द किंग’ यांचा समावेश होता. कॅथरिन हेपबर्नला सर्वाधिक वेळा म्हणजे चार वेळा सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या खालोखाल म्हणजे तीन वेळा इन्ग्रिड बर्गमनचा क्रमांक लागतो. अशी ही भन्नाट माहिती वाचायला हवीच. याखेरीज इतरही प्रचंड ज्ञान आपल्याला हॉलिवूडच्या या कोशाद्वारे होऊन जाते. त्याही अर्थाने हे पुस्तक आवर्जून वाचावे आणि अर्थातच पाहावे असे. शैलजा देशमुख या नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. या पुस्तकाचे प्रकाशक आहेत, ‘नंदिनी पब्लिशिंग हाऊस’.
अ‍ॅण्ड द ऑस्कर गोज टू.. लेखिका : शैलजा देशमुख, प्रकाशक : नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पुणे. पृष्ठे : ४४८, किंमत : ६५० रुपये मात्र.

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा. 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो