पुस्तकेचे पान - रविवार ८ ऑगस्ट २०१०
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पुस्तकेचे पान - रविवार ८ ऑगस्ट २०१० Bookmark and Share Print E-mail
दिव्य आनंदाची प्रचीती
डॉ. प्रज्ञा ओक - रविवार ८ ऑगस्ट २०१०

९८९२३२१८८०
सर्व दत्तभक्तांना अत्रिअनसूया नंदन त्रिमूर्ती श्री दत्तात्रेय श्री नृसिंहसरस्वती महाराज तसेच अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांचे समग्र चरित्र ज्ञातच आहे. श्री दत्तात्रेयांचा अजून एक अवतार आपल्या मनात असतो तो म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार. श्रीपाद श्रीवल्लभांनी अखंड सौभाग्यवती सुमतीराणी व अप्पलराजू शर्मा यांचे पोटी पीठिकापूरम् (आंध्र प्रदेश) येथे अवतार घेतला. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारात त्रिगुणतत्त्वापलीकडे चतुर्थतत्त्वाचा समावेश आहे हे दर्शवण्यासाठी त्यांनी भाद्रपदातील गणेश चतुर्थीला अवतार घेतला. श्रीपाद श्रीवल्लभांविषयी गुरुचरित्रात सखोल माहिती नाही. त्यामुळे सर्व दत्तभक्तांना त्यांचे चरित्र अज्ञातच होते.
श्रीपाद श्रीवल्लभांचे समकालीन भक्त श्री शंकर भट्ट यांनी सुमारे ७०० वर्षांपूर्वी श्रीपाद प्रभूंचे संपूर्ण चरित्र प्रथम संस्कृतमध्ये व नंतर तेलगू भाषेत लिहिले. योग्य वेळी मी हे चरित्र माझ्या भक्तांसाठी उदयास आणेन, असे त्यांनी शंकर भट्टास सांगितले, तसेच या चरित्रामृताचे विविध भाषांत अनुवाद होतील व त्या योग्य व्यक्तीची निवड मी स्वत: करेन, असे वचन श्रीपाद प्रभूंनी शंकर भट्टास दिले. त्याप्रमाणे आता श्रीपाद प्रभूंनी आज्ञा केल्याप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानाने हे चरित्रामृत प्रकाशात आणले व श्रीपादांच्या इच्छेने याचा मराठी अनुवाद श्रीपाद श्रीवल्लभांचा कृपाशीर्वाद लाभलेले हैद्राबादचे सिद्धयोगाचार्य प. पू. सद्. हरिभाऊ निटूरकर (भाऊ महाराज) यांच्याकडून केला गेला. या ग्रंथातील प्रत्येक अक्षराचे सामथ्र्य पेलवून ते सामान्य भक्तांपर्यंत पोचवण्याचे कार्य एक सिद्धयोगीच करू जाणे. या ग्रंथात सिद्धयोगी प. पू. भाऊ महाराज यांच्या साधनेचे तप:सामथ्र्य अंतर्निहित आहे.
‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत’ हा दिव्य अद्भुत  अक्षरसत्य व ब्रह्मसत्य ग्रंथ आहे. या ग्रंथातील प्रत्येक अक्षरात श्रीपाद श्रीवल्लभांचे चैतन्य आहे. भक्त जेव्हा हा ग्रंथ वाचतो तेव्हा भक्ताची स्पंदने या ग्रंथातील चैतन्यात जाऊन तेथून त्याला शुभ स्पंदनांची प्राप्ती होते. या देवाणघेवाणात आपले प्रारब्ध क्षीण होते व दिव्य अनुभूती भक्ताला येते.
या ग्रंथात ७०० वर्षांपूर्वीच भविष्यात पुढे घडणाऱ्या घटनांचा उल्लेख केला आहे. उदाहरणार्थ शिवाजी महाराज, श्री रामदास स्वामी, श्री गजानन महाराज, गाडगेबाबा, माणिक प्रभू, श्री साईबाबा तसेच श्रीपाद श्रीवल्लभ कधी कोणत्या नक्षत्रावर पुढील अवतार नृसिंह सरस्वती व स्वामी समर्थ म्हणून घेतील याचाही समावेश आहे.
अध्यात्म क्षेत्रातील जाणकार व्यक्ती तर असे म्हणतात की, हा ग्रंथ सर्व वेद-उपनिषदांचे सार आहे. ज्ञान व भक्तीने परिपूर्ण हा ग्रंथ चौफेर विस्तारला आहे.
सामान्य माणसाला प्रश्न पडतो, माझ्या वाटय़ाला ही दु:खे का? या प्रश्नांचा सखोल अभ्यास केवळ हाच ग्रंथ उलगडतो. पूर्वजन्म, पूर्वजन्मातील कर्मे कशी आपल्यावर परिणाम करतात, त्यावरील सोपे उपाय यात आहेत. पूर्वजन्मातील पापे केवळ आपलीच नव्हेत तर घराण्यातील कोणा पूर्वजांची पापकर्मे तसेच पुण्यकर्मेसुद्धा भोगणे क्रमप्राप्त आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या पितामहांच्या पापकर्माचे फळ म्हणून लहानपणी श्रीपादांना पुरेसे पोटभर दूधही मिळत नसे तसेच त्यांच्या दोन्ही भावांना वैकल्य प्राप्त झाले. सर्वशक्तिमान श्रीपाद प्रभूंनीसुद्धा प्रारब्ध भोगूनच ते कसे अनिवार्य आहे हे दाखवले. कलियुगातील धर्माचरण नष्ट  झाल्याने मानवाला दु:खे आहेत. कलियुग म्हणजे काय, त्याची व्याप्ती, ते केव्हा सुरू झाले, त्याची झळ लागू नये म्हणून काय करावे याचे मार्गदर्शन यात मिळते.
वैज्ञानिकदृष्टय़ासुद्धा हा ग्रंथ परिपूर्ण आहे. यात कणाद ऋषींच्या  परमाणूचे रहस्य विशद केले आहे. सूक्ष्म कणांच्या भेदामुळेच विविध धातूंची निर्मिती होते. अणू-रेणूचे रहस्य यात आहे.
सृष्टीची निर्मिती, ब्रह्मांड कसे आहे हा खगोलशास्त्रीय विचारही यात मांडला आहे. खंड कसे निर्माण झाले, द्वीप म्हणजे काय याचेही ज्ञान हा ग्रंथ देतो.
आपण जे अन्न सेवन करतो त्यामुळे शरीराबरोबर मनही तयार होते. अयोग्य व्यक्तीकडील अन्नसेवनानेही आपल्याला त्रास होऊ शकतो. अन्नाचे महत्त्व अनन्य आहे. अन्नदान केल्याचे फळ, ते कोणाला कसे करावे, त्याचे फायदे या ग्रंथात आहेत.
प्रारब्धाने त्रस्त झालेला माणूस अनेक ज्योतिषांकडे जातो. ग्रहाची वक्र दृष्टी आहे असे त्याला कळते व तो त्या ग्रहावर नाराज होतो, पण या ग्रहांचा खेळ काय? ते एवढय़ा दूर असलेले ग्रह मानवावर कसे परिणाम करतात? व त्यावरील उपाय स्वत: श्रीपाद प्रभूंनी या ग्रंथात दिले आहेत. कालसर्पयोगाचा बाऊ किंवा भीती न बाळगता यातून सहज बाहेर पडता येऊ शकते. साडेसातीने त्रस्त व्यक्तीला सुरेख उपाय यात दिले आहेत. स्वत: शंकर भट्टांच्या साडेसातीचे वर्णन यात आहे.
दत्ततत्त्वातील सामावलेले शिवतत्त्व कसे आहे हेही यात उलगडले आहे. शिवभक्ताला शिवमहिमा, रुद्राक्ष महिमा, शिवपूजा कशी करावी याचे यात मार्गदर्शन मिळेल. सूर्यास्ताची वेळ शिवआराधनेला पूरक असते, प्रदोषाचे महत्त्व, त्याचा अर्थ व फायदे केवळ याच ग्रंथात वाचावयास मिळेल. शनिप्रदोष विशेष फलदायी  सांगितला आहे. शिवमहिम्याव्यतिरिक्त माता अरुंधती- वशिष्ठ ऋषींची माहिती, नवनाथांचे वर्णन, तारादेवी, छिन्नमस्ता देवी, बगलामुखी देवी व इतर अनेक शक्तिदेवता, आपली शक्तिपीठे याचेही वर्णन यात केले आहे. दत्तप्रभूंचा प्रिय औदुंबर वृक्ष याचेही माहात्म्य आपल्याला कळेल.
आपणा सर्वाचा परिचित व आवडता गायत्री मंत्र यातील प्रत्येक अक्षराच्या अर्थासकट यात आहे. या मंत्राची पुन्हा नव्याने माहिती होते.
मुमुक्षु साधकासाठी यात अमूल्य रत्ने दडली आहेत. साधकाची जशी प्रगती होते तसे त्यातील खोल जडजवाहीर साधकाला प्राप्त होते.
आत्मसाक्षात्काराचा साधा सोपा अर्थ व त्यासाठीचा देवयान मार्ग श्रीपाद प्रभूंनी मोकळा केला आहे. सायुज्य, सालोक्य, सामीप्य व सारूप्य मुक्ती हे अवघड  शब्द सोपे करून विशद केले आहेत.
साधक व अवतारी पुरुष यातील भेद तसेच साधकाच्या सात अवस्था याचेही वर्णन वाचायला मिळते.
प्रत्येक मानवाच्या मनातील प्रश्न व त्यांना प्रभूंनी दिलेली उत्तरे असा सुंदर संवाद आपल्याला वाचावयास मिळतो.
गुरुचरित्रात एका गरीब ब्राह्मणाची कथा आहे. यात नृसिंहसरस्वतींनी घेवडय़ाचा वेल उपटून मातीतील सोन्याचा हंडा देऊन दारिद्रय़ दूर केले असे आहे. या ब्राह्मणाची पूर्वजन्मकथा या पोथीत आहे. त्याच्यावर असा अनुग्रह होण्याचे कारण आपल्याला कळते.
कुंडलिनी शक्ती व शक्तिपात याचेही ज्ञान यात आहे. कुंडलिनी जागृतीने होणारे साधनेतील अनुभव दिव्य असतात. शक्तिपात म्हणजे शक्तीचे पतन नसून, दिव्य गुरुशक्तीचे भक्तामध्ये होणारे संक्रमण होय. प. पू. सद्. सिद्धयोगाचार्य भाऊ महाराज हे याच मार्गाने साधकावर अनुग्रह करतात व या पोथीत वर्णिलेला दिव्य आनंद शिष्याला प्रदान करतात.
हा ग्रंथ वाचून प्रत्येक मानवाला सर्वप्रथम आनंदाची अनुभूती येते. या ग्रंथात एवढे ज्ञान असून हा क्लिष्ट नाही. यात केवळ श्रीपादप्रभूंचे भक्तांबद्दलचे अमाप वात्सल्य व कृपाशीर्वादच आहेत. या ग्रंथ पठणाचे नियम कडक नाहीत. कोणत्याही जातीचा, धर्माचा हा ग्रंथ वाचू शकतो. कलियुगातील या काळात कलीच्या प्राबल्याने माणूस अधिकाधिक त्रस्त होत आहे. त्याला कलीच्या विळख्यातून सोडवण्यासाठीच ७०० वर्षेपर्यंत सुप्त असलेला हा ग्रंथ श्रीपादांच्या कारुण्याने भक्ताला मिळाला आहे. याच्या पारायणाने दिव्य अनुभव येतात. काही अनुभव देत आहे.
- पारायण करणाऱ्या व्यक्तीला दत्तक्षेत्रातून प्रसाद येतो.
- कित्येक मुलींचे विवाह जमले.
- शारीरिक व्याधींनी त्रस्त लोकांना आराम वाटू लागला.
- लातूरच्या एका तरुण मुलीला अंगभर कोड होते. तिने व तिच्या आईने सश्रद्धेने केलेल्या पारायणाचे फळ मिळाले. मुलगी नॉर्मल होऊन लग्न जमले.
- आर्थिक विवंचना असलेल्या लोकांना मार्ग दिसला, त्यांच्या अडचणी  दूर झाल्या.
- श्रीपाद प्रभूंनी म्हटले आहे की, या ग्रंथातील माझ्या वाक्याची सत्यता साधक पाहू शकतो. त्याप्रमाणे अकोल्यातील बहीणभावांनी पडताळले. ग्रंथात श्रीपादांनी म्हटले आहे तीन दिवस अहोरात्र माझा ध्यास घेऊन नामस्मरण करणाऱ्याला मी सदेह दर्शन देईन व त्याप्रमाणे श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या भक्तीचे फळ त्यांना दिले.
अनेक ज्योतिषांचे उंबरठे झिजवणे, अनेक कर्मकांडांत धन वाया घालवणे व नशीब बदलण्याचा प्रयत्न करणे यापेक्षाही सर्वात सोपा उपाय म्हणजे या ग्रंथाचे श्रद्धेने पारायण करणे व घरबसल्या ऐहिक व पारलौकिक सुखाची प्राप्ती करून घेणे.
या चरित्रामृताच्या पठणाने माझ्या भक्तालासुद्धा प्राप्ती होईल हे स्वत: श्रीपाद श्रीवल्लभांचे वचन आहे.
हा ग्रंथ केवळ निर्जीव वस्तू नसून साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांचा पुस्तकरूपाने अवतार आहे असे मला वाटते.
श्रीपाद श्रीवल्लभांनीच स्वत: शंकरभट्टाला वचन दिले आहे की तू लिहीत असलेल्या चरित्रामृताखेरीज इतर कोणताही ग्रंथ समग्र नाही. केवळ याच्या वाचनानेच लोकांना सुख मिळेल. म्हणून सर्व भक्तांना नम्र विनंती,
श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान (पीठिकापूरम्) यांची अधिकृत मान्यता असलेला व श्रीपादांचा कृपाशीर्वाद लाभलेल्या श्री हरिभाऊ निटूरकर महाराज (हैदराबाद) यांनी मराठी व हिंदीत अनुवादित केलेला ग्रंथच वाचावा, तरच दिव्य आनंदाची प्रचीती येईल.
या ग्रंथात ७०० वर्षांपूर्वीच महासंस्थानाची रचना कशी असेल असे वर्णिले आहे व त्याप्रमाणेच रचना प्रेरणा देऊन श्रीपाद प्रभूंनी महासंस्थान घडविले आहे. हे आता नंतर वाचल्यावर तेथील लोकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही व ग्रंथाच्या सत्यतेची प्रचिती आली. श्री क्षेत्र कुरवपूर येथे श्रीपाद श्रीवल्लभ वयाच्या तिसाव्या वर्षी अंतर्धान पावले. कुरवपूर क्षेत्राची माहिती यात वाचायला मिळते. या ग्रंथात एक सिद्धमंगल स्तोत्र आहे. ज्याची पवित्र स्पंदने कल्याणकरी आहेत.
असा परिपूर्ण साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांचे वास्तव्य असलेला ग्रंथ सर्व दत्तभक्तांनी वाचावा व आपले कल्याण करून घ्यावे.
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत
मूळ ग्रंथ - श्री शंकर भट
मराठी अनुवाद - हरीभाऊ निटूरकर