संक्षिप्त
मुखपृष्ठ >> नागपूर वृत्तान्त >> संक्षिप्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

संक्षिप्त Bookmark and Share Print E-mail
जवानांची विभागीय कार्यालयापुढे निदर्शने
नागपूर, १८ ऑगस्ट / प्रतिनिधी

गृहरक्षक दलाच्या जवानांना सेवेतून बेदखल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पारित केलेला जी.आर. रद्द करून जवानांच्या सेवा कायम कराव्या, या मागणीसाठी गृहरक्षक दलाच्या जवानांनी विभागीय आयुक्त कार्यालय जी.पी.ओ.चौकात निदर्शने केली. निदर्शकांचे नेतृत्व गृहरक्षक दल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष बाबा हाडके, उपाध्यक्ष दुष्यंत सालवणकर, सचिव सुजय काळे, कोषाध्यक्ष जितेंद्र कापसे, जिल्हा अध्यक्ष नामदेव बुरडे यांनी केले. असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना सुपूर्द केले. यावेळी विभागीय आयुक्तांनी गृहरक्षक दलाच्या जवानांच्या मागण्यांचे निवेदन पत्र भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांना पाठवण्याचे आश्वासन दिले. प्रदर्शनात नागपूर, कामठी, कळमेश्वर, सावनेर, खापा, नरखेड, जलालखेडा, उमरेड, मौदा, वर्धा, चांदूर रेल्वे आणि अमरावती येथील गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते.    

सांदीपनी शाळेत पालकांसाठी कार्यशाळा
पालकत्व ही शिकवण्याची गोष्ट नाही परंतु, जीवनात ही भूमिका स्वीकारल्यानंतर आयुष्याच्या शेवटपर्यंत ती पार पाडणे आवश्यक असते. या उद्देशाने सांदीपनीने ही कार्यशाळा आयोजित केली. सांदीपनी शाळेने विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास साधण्याकरता पालकांना मदत व्हावी, या दृष्टीने कार्यशाळेत मांडणी केली. ही कार्यशाळा वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली होती. मानसशास्त्रज्ञ अनुपमा गडकरी व त्यांच्या चमूने कार्यशाळेत माहिती दिली. पालकाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या पाल्यासमोर आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून राहिले पाहिजे. मूळातच ३ ते ६ वर्ष या कालावधीतच विद्यार्थी शिक्षण व अध्ययन या प्रक्रियेला जाणून घेत असतो. तेथे त्यांच्याशी पालकांनी सुसंवाद साधून त्यांना या वयातच शिक्षणाचे महत्त्व व त्यांची जबाबदारी समजावून दिली पाहिजे. पालकांनी पाल्याला सहन न होणारे ताशेरे मारणे, शिक्षा करणे इत्यादी गोष्टी टाळल्या पाहिजेत. कारण, विद्यार्थ्यांसमोर पालक हा आदर्श असल्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे, वागण्याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित झालेले असते. रोजच्या जीवनातील पाल्याच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा पालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली. शाळेच्या अध्यक्ष राजश्री श्रीकांत जिचकार, प्रमुख सल्लागार लता थेरगावकर, प्राचार्य भारती बिजवे, मुख्याध्यापक मल्का फैजुद्दीन कार्यशाळेला उपस्थित होत्या.     

विद्यार्थ्यांना गणवेष वाटप
लॉयन्स क्लब ऑफ नागपूर मेडिकोजच्या वतीने ज्ञानोदय विद्यालयातील ३२ विद्यार्थ्यांना नि:शुल्क गणवेषाचे वाटप करण्यात आले. महाल, गांधीगेट येथील शाळेत झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आनंद गादेवार हे होते. उपप्रांतपाल चंद्रकांत सोनटक्के हे प्रमुख अतिथी होते. डॉ. विनोद जैस्वाल व डॉ. एन.पी. तोलानी हे प्रकल्प संचालक होते. शाळेच्या मुख्याध्यापक सौ. सोनकुसरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना शक्य त्या प्रकारे मदत करून, त्यांचे शिक्षण व आरोग्य याबाबत अनुकूल वातावरण तयार करण्याचे काम लॉयन्स क्लब करत राहील असे सोनटक्के यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी मोफत करण्याचा मनोदय डॉ. गादेवार यांनी व्यक्त केला. तर डॉ. जैस्वाल यांनी समाजातील गरजू विद्यार्थ्यांची सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. सुरेश मिर्झापुरे राजेश काळे, अनिल पाटील, राजेश शाहू हे डॉक्टर-सदस्य यावेळ हजर होते.    

मनसेची वृक्षारोपणावर मोहीम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ‘वृक्षारोपण आणि त्यांचे संगोपन’ मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील या मोहिमेची सुरुवात मनसेचे विदर्भ विभागीय संघटक हेमंत गडकरी यांनी कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी, वरोडा परिसरातील सार्वजनिक स्थळे आणि शाळा येथे केली. ‘घर तिथे झाडं’ ही जाणीव प्रत्येकाने ठेवावी तसेच वृक्षाचे संगोपन प्रत्येकाने नैतिक जबाबदारी मानावे, असे प्रतिपादन गडकरी यांनी यावेळी केले. याप्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अजय ढोके, कळमेश्वर तालुका अध्यक्ष सेवक शिंगणे, समाजसेवक दीपक भट तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.    

कोशिश फाऊंडेशनतर्फे वह्य़ांचे वाटप
जगदीश नगरातील पंडित नेहरू विद्यालयातील ८५० गरजू विद्यार्थ्यांना कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष सलील देशमुख यांच्या हस्ते वह्य़ांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला वॉर्डाचे नगरसेवक हरीश ग्वालबंशी, पंचमुखी शिक्षण संस्थेचे सचिव श्रीराम बेहरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अशोक अडिकणे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक पाहुणे सर प्रामुख्याने उपस्थित होते. शैक्षणिक क्षेत्रातील दर्जा उंचावण्याकरता सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे मत सलील देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले. पंडित नेहरू विद्यालयाचे सुपरवायझर भागवतकर यांनी संचालन केले. संस्थेचे सचिव श्रीराम बेहरे यांनी आभार मानले.     

विदर्भात १२ सचिवांची नियुक्ती
शेतकरी, कामगार आणि अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी हिंद मजदूर किसान पंचायतने विदर्भात १२ सचिवांची नियुक्ती करून त्यांना जिल्हा प्रभारी बनवले आहे. ही नियुक्ती विदर्भ प्रदेशाध्यक्ष बाबा हाडके यांच्या हस्ते करण्यात आली आहे. किसान पंचायततर्फे जनजागृती करून सप्टेंबर महिन्यापासून विदर्भात विदर्भ राज्य निर्मितीसाठी आंदोलन सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

विश्वास क्रेडिट सोसायटीची आमसभा
विश्वास एज्युकेशन सोसायटी कर्मचारी क्रेडिट को-ऑप. सोसायटीची ६वी वार्षकि आमसभा नुकतीच संस्थेचे अध्यक्ष श्रीराम काळे यांच्या अध्यक्षतेखाली विश्वास माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अलका काळे, पद्मश्री स्मिता पाटील कन्या विद्यालय महादुलाच्या मुख्याध्यापिका विजया तंबाखे उपस्थित होत्या. १०वीत प्रावीण्य प्राप्त केलेल्या सभासदांच्या मुलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे उपाध्यक्ष राजेश परमार यांनी केले. आभार विजया तंबाखे यांनी केले.    

सहकारी संस्था तालुका विकास परिषद
पुण्याच्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघातर्फे सहकारी शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत मौदा तालुक्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक व सेवक यांच्याकरता सहकारी संस्था तालुका विकास परिषद नुकतीच पार पडली. नागपूर जिल्हा सहकारी बोर्ड आणि मौदा येथील सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेचे उद्घाटन रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एल.के. उमाळे यांनी केले. सहकारी चळवळ वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नागपूर जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष प्रकाश कुहीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मालती तिघरे, सहायक निबंधक मंगला उईके यावेळी व्यासपीठावर हजर होते. सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य एस.एम. जगनाडे, निवृत्त प्राचार्य आर.एच. गोहणे, सहकार व्यवस्थापन सल्लागार एस.एम. आदमने यांची यावेळी भाषणे झाली. परिषदेचे संचालन सहकार शिक्षणाधिकारी विनायक मांडवकर यांनी केले.     

सायंकालीन न्यायालयांचे कामकाज सुरू
नागपूर, १८ ऑगस्ट/ प्रतिनिधी

नागपुरात सोमवारपासून सहा सायंकालीन न्यायालये सुरू झाल्यामुळे हजारोंच्या संख्येत प्रलंबित असलेल्या खटल्यांच्या निपटाऱ्याला वेग येईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे दरवर्षी हजारोंच्या संख्येत दाखल होणारे न्यायालयीन खटले आणि दुसरीकडे न्यायाधीशांची व न्यायालयांची मर्यादित संख्या, यामुळे प्रलंबित खटल्यांचे प्रमाण वाढतच असते. जलद न्याय मिळण्याचा उपाय म्हणून गुजरातच्या धर्तीवर सायंकालीन न्यायालये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार नागपुरात सहा न्यायालये सोमवारपासून सुरू झाली आहेत. अशोक कुळकर्णी, आर. बलवानी, एस.ए. गायकवाड, पी.जी. देशमुख, डी. एच. झंवर व जी.एच. पाटील अशी या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांचे कामकाज दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत न्यायमंदिर इमारतीत होणार आहे. येत्या आठवडाभरात एकूण १९ सायंकालीन न्यायालये सुरू होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.    

तणनाशकांची चौकशी करा, शेतकऱ्यांची मागणी
कोंढाळी, १८ ऑगस्ट / वार्ताहर

सोयाबीन आणि इतर पिकांसोबत वाढलेले तण शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरले आहे. तण काढायला मजूर न मिळाल्याने त्यावर तणनाशक औषधांचा फवारा करण्यात आला. मात्र, त्याचा परिणाम झाला नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तणनाशक औषध पूर्णपणे निरुपयोगी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. स्थानिक कृषी केंद्राचे संचालक मात्र औषधाचा पुरवठा मान्यताप्राप्त कीटकनाशक औषध कंपन्यांकडून करण्यात आल्याचे सांगून जबाबदारी टाळत आहेत. याप्रकरणी काटोलच्या कृषी अधिकाऱ्यांनी स्थानिक कृषी केंद्राची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

काचोरे लॉन्सवरील जुगार अड्डय़ावर छापा
नागपूर, १८ ऑगस्ट/ प्रतिनिधी

वर्धा मार्गावरील काचोरे लॉन्सवरील जुगावर अड्डय़ावर पोलिसांनी छापा टाकून आठ जुगाऱ्यांना अटक केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चिंचभवनमधील काचोरे लॉन्स येथे जुगार खेळल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी त्यावर पाळत ठेवली व मंगळवारी तेथे छापा टाकला. यावेळी विवेक पांडुरंग काचोरे (५१) रा. चिंचभवन, प्रवीण विठ्ठलराव बालपांडे (३५) रा. सोमलवाडा, विजय नारदेलवार (३४) रा. श्याम नगर, जागेश्वर अजाबराव राऊत (३०) रा. गजानननगर, प्रशांत कानतोडे (३५) रा. शिवणगाव, सुधीर धनराज झलके (३०) रा. शिवणगाव, दिनकर व्यंकटेश राऊत (३९) रा. गजानन सोसायटी, नरेंद्र बनाईत (३२) रा. हरिहर नगर जुगार खेळताना सापडले. त्यांच्याकडून रोख ३७ हजार ३७० व आठ मोबाईल असा एकूण २३ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला व  आरोपींना अटक करण्यात आली.    

मराठी बोली साहित्य संघाच्या वर्धापन महोत्सवाचे शनिवारी उद्घाटन
नागपूर, १८ ऑगस्ट / प्रतिनिधी

मराठी बोली साहित्य संघ व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी बोली साहित्य संघाचा सहावा वर्धापन दिन महोत्सव २१ व २२ ऑगस्टला आयोजित करण्यात आला आहे. दोन दिवस होणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. २१ ऑगस्टला दुपारी २ वाजता वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांच्या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मनोहर रोकडे राहतील. यावेळी हडस हायस्कूलचे सेवानिवृत्त प्राचार्य यादवराव महाजन यांच्या ‘भावस्पर्श’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होईल. उद्घाटनानंतर प्रा. कृष्णा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होईल. दुसऱ्या दिवशी २२ ऑगस्टला दुपारी २ वाजता ‘महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणात बोलीचे प्रतिबिंब किती?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात प्रा. बबन नाखले, डॉ. सुरेश खैरनार, डॉ. रवींद्र शोभणे  सहभागी होणार आहेत. यावेळी डॉ. बोरकर यांचा सत्कार करण्यात येईल. दुपारी ४ वाजता पत्रकार श्रीपाद अपराजित यांच्या अध्यक्षतेखाली व रेखा वडिखाये यांच्या उपस्थितीत समारोप होईल. या महोत्सवास साहित्यप्रेमीनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुभाष चांदूरकर यांनी केले आहे.

केंद्र सरकारचा ‘आम आदमी’च्या कल्याणावर भर -कमलनाथ
नागपूर, १८ ऑगस्ट / प्रतिनिधी

काँग्रेसप्रणीत केंद्र सरकार अल्पसंख्याक, इतर मागासवर्गीय आणि गरीबांसाठी अतिसंवेदनशील आहे. सर्वाच्या कल्याणासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवण्यात येत आहेत, असा दावा केंद्रीय भूपरिवहन मंत्री कमलनाथ यांनी केला. कमलनाथ यांचे आज येथे आगमन झाले असता प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्यावतीने संयोजक हैदरअली दोसानी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली ‘आम आदमी’च्या कल्याणावर भर देण्यात आला आहे. देशाच्या विकासात सर्वसामान्यांचा सहभागी करण्यात येत आहे. तसेच, मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे, असेही कमलनाथ म्हणाले. यावेळी नगरसेविका कुसुम घाटे, नाना असलम, सुबोध बघेल, शिवराज गुप्ता, अभय काळे, विजय गंथाडे, हारुन नागानी, मोहम्मद हनीफ, मजलूम हुसेन, इश्तियाक कामिल, आजम अन्सारी, नवाब मलीक, सुरेश सगणे, जितेंद्र भटमेरकर, किरण वेमारकर आणि सुरेश भगत आदी उपस्थित होते.     

रफींची याद जागवणारा ‘दिल ने फिर याद किया’
नागपूर, १८ ऑगस्ट/ प्रतिनिधी

स्वरदीप संस्थेतर्फे मो. रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘दिल ने फिर याद किया’ हा हिंदी गीतांचा कार्यक्रम नुकताच लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात सादर करण्यात आला. या कार्यक्रमात अविनाश घोंगे व वर्षां बारई यांनी एकापेक्षा एक सरस गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरूवात ‘दिल एक मंदिर’ या युगल गीताने झाली. त्यानंतर एहसान तेहा होगा, मेरे मेहबूब तुझे, अकले है चले आवो, तकदीर का फसाना, सुहानी रात ढल चुकी, पत्थर के सनम, देखा है तेरी ऑंखो मे, तुम मुझे यू भुला ना पाओगे इत्यादी गीते अविनाश घोंगे व वर्षां बारई यांनी सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. मधुबन मे राधिका, रंग और नूर की बारात, तुम जो मिल गये, इत्यादी मो. रफी यांची गाजलेली गीते यावेळी अविनाश घोंगे यांनी सादर करून दाद मिळविली. वर्षां बारई आणि अविनाश घोंगे यांनी गायलेल्या अनेक युगल गीतांना रसिकांकडून दाद मिळाली. या कार्यक्रमात गोविंद गडीकर, श्रीकांत पिसे (सिंथेसायझर), विलास पुजारी (संवादिनी), मोरेश्वर दहासहस्त्र (तबला), अशोक डोके (ढोलक), चारुदत्त जिचकार (ऑक्टोपॅड) यांची साथसंगत केली. कार्यक्रमाचे रसाळ निवेदन शुभांगी रायलू यांनी केले. मावळते पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अरुंधती दीक्षित, वनराईत विश्वस्त गिरीश गांधी उपस्थित होते. संस्थेचे प्रमुख प्रमोद बारई यांनी सर्व पाहुण्याचे स्वागत केले. मो. रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला रसिकांनी गर्दी केली होती.     

तेलगाव ग्रामपंचायतीविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कळमेश्वर, १८ ऑगस्ट / वार्ताहर

निराधारांसाठी असलेल्या शेतजमिनीवर तालुक्यातील तेलगाव ग्रामपंचायतीने बेकायदेशीर ताबा मिळवून भूखंड पाडले असल्याची तक्रार राष्ट्रीय बहुजन मुक्ती आंदोलनातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निदेवनात करण्यात आली आहे. गरीब कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी असलेल्या उपजाऊ सुपीक जमिनीवर ग्रामपंचायतने ताबा केला आहे. या जागेवर भूखंड पाडून ते विकून गैरव्यवहार केला असल्याची तक्रार संघटनेच्यावतीने उपजिल्हाधिकारी मिलिंदकुमार साळवे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून तेलगाव ग्रामपंचायतीवर कडक कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश डोंगरे, कोषाध्यक्ष गौरव पाटील, जिल्हाध्यक्ष चरण वालदे आणि कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते.    

कोंढाळी आरोग्य केंद्राला न्यायवैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतीक्षा
कोंढाळी, १८ ऑगस्ट/ वार्ताहर

राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावर वसलेल्या आणि अपघातांसाठी संवेदनशील समजल्या जाणाऱ्या कोंढाळी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही पूर्णवेळ न्यायवैद्यकीय अधिकारी नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राला पूर्णवेळ न्यायवैद्यकीय अधिकारी आणि शवविच्छेदनासाठी लागणारा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्याची मागणी अ‍ॅड. विनोद पांडे यांनी केली आहे. कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे. मात्र, येथील वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्याने बाहेरील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने तात्पूर्ते काम चालवण्यात येत आहे. सात महिन्याआधी येथे शवविच्छेदन गृह मंजूर झाले. मात्र, अजूनही पूर्णवेळ न्यायवैद्यकीय अधिकारी केंद्राला मिळाले नाही. शवविच्छेदन गृहात अजूनही सफाई कामगार नियुक्त करण्यात आले नाही. कुत्रा चावणे, सर्पदंश, यासारख्या उपचारासाठीही रुग्णांना काटोल ग्रामीण रुग्णालयात पाठवले जाते. अपघातासाठी संवेदनशील असलेल्या या केंद्रावर न्यायवैद्यकीय अधिकारी आणि औषध नसणे, जिल्हा परिषद प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचे चिन्ह असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.    

सुनील केदार मंत्री होणार- कमलनाथ
सावनेर, १८ ऑगस्ट / वार्ताहर

केंद्रीय मंत्री कमलनाथ सावनेरला आले असता सावनेर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवन जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार सुनील केदार यांना मंत्री करण्याची मागणी निवेदनाद्वारे त्यांना केली. यावेळी सुनील केदार मंत्री होणार, अशी ग्वाही कमलनाथ यांनी कार्यकर्त्यांना दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कमलनाथ यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अ‍ॅड. चंद्रकांत पिसे, पंचायत समितीचे सभापती प्रा. साहेबराव विखे, सभापती विठोबा पावडे, सचिव अरविंद दाते प्रामुख्याने उपस्थित होते. नागपूर ते सावनेर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे कमलनाथ यांनी याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.डी.ओ. दिलीप भगत यांनी केले. संचालन राज पाटील यांनी तर आभार माजी जिल्हा परिषद सदस्य देवीनाथ डोंगरे यांनी मानले.     

व्यसनमुक्ती निर्मूलनावर कार्यशाळा
नागपूर, १८ ऑगस्ट/ प्रतिनिधी

जीवन विकास शिक्षण संस्थेद्वारे संचालित नवप्रतिभा महाविद्यालयात ‘व्यसनमुक्ती निर्मूलन’ या विषयावर आधारित एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. आयुर्वेदिक लेआऊटमध्ये झालेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष बाबुराव झाडे, सचिव विजय वैद्य, प्रमुख वक्तया डॉ. सरोज आगलावे, संपदा नासेरी आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुधा पेशकर उपस्थित होते. सहसचिव राजेंद्र झाडे यांनी प्रास्ताविक केले.प्रमुख वक्तया सरोज आगलावे यांनी विविध उदाहरणांद्वारे ‘व्यसन’ म्हणजे काय आणि व्यसनाधीन होण्याची कारणे यांची माहिती दिली. व्यसनाधीनतेच्या मोहजाळापासून युवा पिढीने का व कसे दूर राहावे, याची माहिती त्यांनी विविध खेळ व शब्दकोडय़ांद्वारे दिली. ‘व्यसनमुक्त समाजासाठी मी निव्र्यसनी होणार’, अशी शपथ त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली. विजय वैद्य यांनी व्यसनाधीनांचे वर्णन ‘गंदे लोग, गंदी पसंद’ असे केले. प्राचार्य सुधा पेशकर यांनी चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधून व्यसनाधीनतेचा प्रसार होत असल्याचे सांगून, चांगले तेच घ्यावे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.बाबूराव झाडे यांनी विद्यार्थ्यांना ‘निरोगी शरीर- निरोगी मन’ या मंत्राची आठवण करून दिली आणि ‘शरीर हीच संपत्ती’ हे लक्षात घेऊन निव्र्यसनी राहण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. मोहन पाठक यांनी केले.  याप्रसंगी व्यसनाधीनताविरोधी स्टीकर्स विद्यार्थ्यांना देण्यात आले, तसेच सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले. प्रतिभा मेंढे, रोहन झाडे, प्रियंका तिवारी या विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.    

‘चिकित्सा क्षेत्रात अमेरिकेत नोकरीच्या संधी’वर शनिवारी कार्यशाळा
 नागपूर, १८ ऑगस्ट / प्रतिनिधी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व प्रुडेंट ऑप्शन या संस्थेतर्फे शनिवारी, २१ ऑगस्टला ‘चिकित्सा क्षेत्रात अमेरिकेत नोकरीच्या संधी’ या विषयावर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पैठणकर सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली, अशी माहिती विभाग प्रमुख डॉ. प्रकाश उके यांनी पत्रकार परिषदेत दिली. व्यवसाय चिकित्सा ही आरोग्य विज्ञान क्षेत्रात झपाटय़ाने प्रगत होणारी वैद्यकीय शाखा असून त्यामध्ये भारतात आणि विदेशात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. चिकित्सा व्यवसाय क्षेत्रात आतापर्यंत अमेरिकेत सात डॉक्टरांना संधी देण्यात आली आहे. व्यावसायिक चिकित्सा शाळा व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानी नागपूर विद्यापीठतंर्गत १९६३ मध्ये स्नातक अभ्यासक्रम सुरू केला. सध्या या केंद्रात साडेचार वर्षांचा बीओएच आणि तीन वर्षीय एम ओ टी तसेच पीएच. डी. अभ्यासक्रम नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठतंर्गत चालवण्यात येत आहे. व्यावसायिक उपचार केंद्र अपंग तसेच विविध साधनांना सज्ज आहे. वैद्यकीय व्यवसायात नौकरीच्या संधी उपलब्ध करून देणारी अमेरिकेतील प्रुडेंट ऑपशन्स ही नावाजलेली कंपनी आहे. व्यवसाय चिकित्सासाठी उत्तम व्यवसायासाठी संधी, अमेरिकेत राहण्याची सोय करण्यात येईल. कार्यशाळेसाठी मोजक्या जागा शिल्लक असून इच्छुक व्यवसाय चिकित्सकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. उके यांनी केले. पत्रकार परिषदेला डॉ. दीपक आशिया, डॉ. सुचेता पाल, डॉ. लिना देशपांडे, डॉ. मनीष भावतकर उपस्थित होते.     

नरेंद्रनगर अग्निशामक स्थानकाचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन
नागपूर, १८ ऑगस्ट/ प्रतिनिधी

स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर नरेंद्रनगर अग्निशामक व आणिबाणी सेवा स्थानकाचे उद्घाटन महापौर अर्चना डेहनकर यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्याचे स्वागत मुख्य अग्निशामक अधिकारी चंद्रशेखर जाधव यांनी केले. याप्रसंगी स्थानकाधिकारी एस.के. काळे, बी.के. आश्राम, बी.एम. चंदनखेडे, एस.एन. खान, व्ही.एस. यादव, सहाय्यक स्थानकाधिकारी सुनील राऊत, केशव कोठे, एस.एम. भोयर, विजय वंजारी, राजू दुबे उपस्थित होते. संचालन स्थानक अधिकारी राजेंद्र उचके यांनी केले.    

संदीप जोशी आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मानित
नागपूर, १८ ऑगस्ट/ प्रतिनिधी

महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जोशी यांना ‘राजकीय कार्यक्षम कार्यकर्ता, आचार्य अत्रे पुरस्कार’ने नुकतेच सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र ज्ञान अध्ययन मंडळाचे महासंचालक डॉ. विवेक सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुण्याच्या आचार्य अत्रे प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांना पहिल्यांदाच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. शहरात पर्यावरणाच्या दृष्टीने होणारे विविध कार्यक्रम, नवीन संकल्पना आखुन, शहराचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षास हा पुरस्कार दिला जातो. याप्रसंगी कला, साहित्य, नाटय़, सिनेमा क्षेत्रातील कलावंत सिद्धार्थ जाधव, ऋजुता देशमुख, परेश मोकाशी, प्रभाकर वाडेकर, डॉ. रवींद्र तांबोळी यांचा देखील गौरव आचार्य अत्रे प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देऊन करण्यात आला.    

‘श्रावणसरी’ चित्रप्रकल्पाचे आज उद्घाटन रघुवीर मुळगावकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन
नागपूर, १८ ऑगस्ट / प्रतिनिधी

मान्सून बोनांझा या चित्रप्रकल्पानंतर सिस्फातर्फे उद्या, गुरुवारपासून ‘श्रावणसरी’ या चित्रप्रकल्पाला प्रारंभ होत असून दिवं. चित्रसम्राट रघुवीर मुळगावकर यांच्या मुद्रित चित्रांचे प्रदर्शन उद्या आयोजित करण्यात आले आहे. लक्ष्मीनगरातील सिस्फाच्या छोटी गॅलरीत आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबईचे उपयोजित चित्रकार प्रा. रंजन जोशी यांच्या हस्ते सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक श्रीकांत पाठक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील.श्रावणसरी या पंधरवडय़ाच्या चित्रप्रकल्पात ५ सप्टेंबपर्यंत चार प्रदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. रंगश्रीमंत दिवं. दीनानाथ दलाल यांची मुद्रित चित्रे, प्रसिद्ध छायाचित्रकार व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे ‘महाराष्ट्र देशा’ या विषयावरील गाजलेल्या छायाचित्राचे प्रदर्शन व सिस्फाच्या वर्धापनदिनी नागपुरातील सर्व कला महाविद्यालयातील निवडक विद्यार्थ्यांच्या स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. रघुवीर मुळगावकर यांच्या मुद्रित चित्रांच्या प्रदर्शनामध्ये एकूण ४५ चित्रे राहणार आहेत. हे प्रदर्शन २२ ऑगस्टपर्यंत दुपारी ४ ते ९ या वेळेत रसिकांसाठी खुले राहणार असून या प्रदर्शनाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिस्फाचे अधिष्ठाता चंद्रकात चन्नो यांनी केले.    

संदीप जोशी यांच्या वेबसाईटचे आज लोकार्पण
नागपूर, १८ ऑगस्ट/ प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे युवा नेते व महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जोशी यांच्या नव्या वेबसाईटचा लोकार्पण समारंभ उद्या, गुरुवारी रात्री ८ वाजता रामदासपेठमधील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांच्या हस्ते या वेबसाईटचे उद्घाटन होणार आहे. यावेळी ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीचे संपादक प्रवीण बर्दापूरकर, माजी आमदार व वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, सकाळचे कार्यकारी संपादक श्रीपाद अपराजित, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष अनिल सोले व आमदार सुधाकरराव देशमुख उपस्थित राहणार आहेत. संदीप जोशी यांचे नवीन संकेतस्थळ  \www.sandipjoshi. com.

डॉ. सतीश वटे यांचा शनिवारी अभिनंदन सोहोळा
नागपूर, १८ ऑगस्ट/ प्रतिनिधी

वनराई व विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नीरी संस्थेचे नवनियुक्त संचालक व तरुण शास्त्रज्ञ डॉ. सतीश वटे यांचा अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.  शंकरनगरातील राष्ट्रभाषा संकुलाच्या बाबुराव धनवटे सभागृहात २१ ऑगस्टला सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते डॉ. वटे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला क्रीडा संघटक डॉ. बाबासाहेब आकरे उपस्थित राहणार आहेत. डॉ. सतीश वटे राष्ट्रीय पातळीवरील खो खोचे खेळाडू आहेत. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वनराईतर्फे करण्यात आले आहे.     

नारायण सुर्वे यांना उद्या श्रद्धांजली
नागपूर, १८ ऑगस्ट/ प्रतिनिधी

विदर्भ साहित्य संघ व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य नारायण सुर्वे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २० ऑगस्टला शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रभाषा संकुलाच्या बाबुराव धनवटे सभागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर राहणार आहेत. वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, प्रा. सुरेश द्वादशीवार व राजेंद्र नाईकवाडे संवेदना व्यक्त करणार आहेत. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य संघातर्फे करण्यात आले आहे.     

रेल्वेत ओळखपत्र म्हणून ‘क्रेडिट कार्ड’ चालणार  
नागपूर, १८ ऑगस्ट/ प्रतिनिधी

‘इ-तिकीट’ काढून प्रवास करणाऱ्यांकडील बँकेचे ‘क्रेडिट कार्ड’ हे ओळखपत्र म्हणून रेल्वेने मान्य केले असून ते ऑगस्ट महिन्यापासून लागू करण्यात आले. छायाचित्र असलेले बँकेचे ‘क्रेडिट कार्ड’च्या व्यतिरिक्त पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने दिलेले छायाचित्र असलेले ओळखपत्र, शासनमान्य शाळा-महाविद्यालयाचे ओळखपत्र आणि छायाचित्र जोडलेले राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक असे सहा प्रकारच्या ओळखपत्रांना रेल्वेने मान्यता दिली आहे. ‘क्रेडिट कार्ड’ ओळखपत्र म्हणून स्वीकारण्यास ६ ऑगस्टपासून सुरुवात देखील झाली आहे. इंटरनेटद्वारे तिकीट घेणाऱ्यांना मात्र रेल्वेची कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. यामध्ये शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांची सवलत कायम राहणार आहे, असे रेल्वेच्या सूत्राने सांगितले.    

रेल्वेची माहिती १३९ क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे
नागपूर, १८ ऑगस्ट/ प्रतिनिधी

रेल्वेच्या विषयी माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक १३९ निश्चित करण्यात आले. आता या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पी.एन.आर. चौकशी, गाडय़ांच्या आगमन, प्रस्थान, वेळापत्रक, ‘बर्थ’ची उपलब्धता तसेच प्रवास भाडय़ाविषयी माहिती प्राप्त करता येणार आहे.    

स्वाइन फ्लूचे ३ रुग्ण पॉझिटिव्ह
नागपूर, १८ ऑगस्ट / प्रतिनिधी

मेडिकल आणि मेयोमध्ये स्वाइन फ्लू रुग्णांची गर्दी वाढत असली तरी त्यांच्यावर तेवढय़ाच तत्परतेने होणाऱ्या उपचारामुळे आतापर्यंत १२ रुग्णांना बरे करण्यात मेडिकलला यश आले आहे. त्यापैकी ५ डॉक्टर होते. आज पुन्हा ८ संशयितांचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. काल, मंगळवारी पाठवलेल्या चार नमुन्यांपैकी ३ पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५वर गेली आहे.
 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो