|
रोजगार संधी |
|
|
सोमवार,२९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
* भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई येथे टेक्निकल ऑफिसरच्या ५ जागा : उमेदवारांनी बीई/बीटेक्. पदवी कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित कमाचा सुमारे ५ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २८ वर्षे- राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम.
|
|
अर्थ व सांख्यिकी संचालनालय; अन्वेषक/लिपिक टंकलेखक पदाची तयारी |
|
|
संजय मोरे, सोमवार,२९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
नोकरीच्या विविध संधी सतत येत असतात. त्यासाठी प्रथम गरज आहे ती जागरूकतेची आणि येणाऱ्या जाहिरातींकडे वेळीच चौकसपणे पाहण्याची. हे ज्ञानाचे युग आहे, त्यामुळे ज्या व्यक्तीकडे पुरेसे ज्ञान नसेल ती व्यक्ती कोणत्याही उपक्रमात यशस्वी होऊ शकत नाही. स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम हा व्यापक व विस्तृत असा असतो. त्यामुळे सखोल अभ्यास केल्याशिवाय उमेदवार या परीक्षेत यशस्वी होऊ शकत नाही. ही गोष्ट विचारात घेता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी या परीक्षेतील विषयांचा सखोल अभ्यास करून ज्ञान संपादन करणे अत्यंत आवश्यक आहे.
|
भारतीय कंपन्यांपुढील आव्हान : गुणवत्तेचा शोध |
|
|
प्रतिनिधी, सोमवार,२९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आज नोकरीच्या नवनव्या संधी उपलब्ध होत असल्या तरी कंपन्यांना त्या पदासाठी योग्य अशा उमेदवारांची निवड करणे मुश्कील बनत आहे. अलीकडेच करण्यात आलेल्या एका अहवालात पुढील निष्कर्ष काढण्यात आला आहे. नोकरी देताना अर्हता, अनुभव, वेतन आणि वय या निकषांमुळे उमेदवारांची निवड हा कळीचा मुद्दा बनत असल्याचेही समोर आले आहे. नोकरीची ऑफर देताना उमेदवार निवडीमध्ये कंपन्यांच्या उच्चपदस्थांना मोठय़ा अडचणी येत असून हा कल पुढील तीन वर्षांमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे, असे ‘रँडस्टॅड इंडिया’च्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या जागतिक पातळीवरील वर्कमॉनिटर सर्वेक्षण २०१२ मध्ये स्पष्ट झाले आहे.
|
|
नवनिर्माणाचे शिलेदार : अपंगसेवक शिक्षक |
|
|
राजू दीक्षित, सोमवार,२९ ऑक्टोबर २०१२ (समन्वयक : हेमंत लागवणकर)
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अहमदनगर जिल्ह्य़ातल्या संगमनेर तालुक्यातील वडगाव पान इथल्या जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेत दुपारची सुट्टी झाली होती. मुलांना पूरक पोषण आहाराचे वाटप करण्यात आले होते. सगळे विद्यार्थी खात होते, पण वैभव गायकवाड या विद्यार्थ्यांला मात्र खाताना अडखळल्यासारखं होत होतं. केळ्यासारखा मऊ पदार्थ खातानासुद्धा त्याला त्रास होत होता. ही गोष्ट त्या शाळेतल्या एका शिक्षकाच्या नजरेतून सुटली नाही. वैभवचा जबडा एका बाजूने बंद असल्यामुळे त्यास घास घेण्यासाठी, तोंडात घेतलेला घास चावण्यासाठी आणि गिळण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत होते.
|
एम.पी.एस.सी. (पूर्वपरीक्षा) पेपर -२ ची तयारी |
|
|
डॉ. जी. आर. पाटील, सोमवार,२९ ऑक्टोबर २०१२
अलीकडेच एमपीएससीने राज्यसेवा प्रारंभिक परीक्षेच्या अभ्यासक्रमात मोठय़ा प्रमाणावर बदल केला. सुरुवातीस फक्त एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा बदल त्रासदायक वाटत असला तरी राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने हा बदल अत्यंत लाभदायक आहे. या नव्या अभ्यासाच्या जोरावर एमपीएससीची तयारी करता करता यूपीएससीच्या तयारी करता करता एमपीएससीच्या प्रारंभिक परीक्षेची तयारी आपोआप होणार आहे. शिवाय केंद्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेसाठी राज्यातील विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शतील आणि त्या परीक्षेतही यशाचा आलेख आपोआप उंचावला जाईल. याकरिता सर्वप्रथम या बदलाचे स्वागत करायला हवे.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 4 of 16 |