लेख
मुखपृष्ठ >> लोकरंग
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेखक अर्धाच पूल बांधू शकतो.. Print E-mail

रविवार ११ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कादंबरीकार- नाटककार किरण नगरकर यांच्याशी बोलणं हा एक सुंदर अनुभव असतो. आपण सेलिब्रेटी लेखक आहोत, याचा जराही अहंकार त्यांच्या बोलण्यामध्ये डोकावत नाही. उलट, स्वतकडे कमीपणा घेऊन ते आपल्या पुस्तकांच्या निर्मितीबद्दल, त्यामागच्या प्रेरणांबद्दल बोलतात. त्यांच्या ‘रावण अँड एडी’, ‘गॉड्स लिटिल सोल्जर’, ‘ककल्ड’ आणि ‘द एक्स्ट्राज’ या कादंबऱ्यांनी इंग्रजीमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे.
 
मधुघट रिकामे पडण्यामागचे वास्तव Print E-mail

डॉ. अजय ब्रह्मनाळकर - रविवार ११ नोव्हेंबर २०१२

१४ ऑक्टोबरच्या ‘लोकरंग’ मध्ये राजेंद्र येवलेकर यांचा ‘मधुघटचि रिकामे पडती घरी’ हा लेख प्रसिद्ध झाला होता.  त्या लेखावरील  प्रतिक्रिया..
२००६ पासून घटणारी मधमाश्यांची संख्या हा काळजीचा विषय आहे, याबाबत वाद नाही. कारण मधमाश्यांची संख्या घटत आहे ही वस्तुस्थिती आहे. मधमाश्या करीत असलेल्या परागीभवनामुळे सुमारे १/३ अन्न उत्पादन मिळते.
 
छित्तराजाचा ताम्रपट कोकणच्या इतिहासावर नवा झोत Print E-mail

डॉ. दाऊद दळवी - रविवार ११ नोव्हेंबर २०१२
अध्यक्ष, कोकण इतिहास परिषद, ठाणे

कल्याण येथील एका भंगाराच्या दुकानात नुकताच ताम्रपट सापडल्यामुळे एक हजार वर्षांपूर्वीच्या कोकणाची राजकीय व सामाजिक जडणघडण समजावून घेता येणे सोपे झाले आहे. त्याविषयी..
कल्याण पोलिसांना एका तपासात भंगाराच्या दुकानात तीन तांब्याचे पत्रे सापडले. त्यावर अक्षरे कोरलेली दिसल्यामुळे त्यांनी ते पत्रे पोलीस स्टेशनमध्ये आणले.
 
किरण नगरकरांचं काय करायचं? Print E-mail

प्रवीण दशरथ बांदेकर - रविवार ११ नोव्हेंबर २०१२

कादंबरीकार किरण नगरकर मराठीत का रुजू शकले नाहीत याचा तटस्थपणे घेतलेला शोध..
मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांतून महत्त्वाचे लेखन करणारे किरण नगरकर या इंग्रजीच्या माध्यमातून जगभर पोचलेल्या लेखकान मायमराठीने मात्र आपल्याला काहीसा दुजाभाव केल्याची खंत अनेकदा व्यक्त केली आहे. खरे तर अनेक द्विभाषिक लेखकांबाबत हे घडताना दिसते. हे असे का होत असावे, या प्रश्नाच्या अनुषंगाने नगरकरांच्या लेखनाबरोबरच मराठी वाचकांच्या अभिरुचीचा वेधही यानिमित्ताने घेता येईल.
 
व्हाइट हाऊसची वादळवाट..! Print E-mail

गिरीश कुबेर , रविवार ४ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अमेरिकेत गेले काही महिने आर्थिकदृष्टय़ा ताणलेलेच गेले. अमेरिकेची पत घसरली, त्यात नोकऱ्या कमी कमी होत गेल्या आणि एकूणच जगणं महाग झालं. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा व रिपब्लिकन पक्षाचे मिट रोम्नी यांच्यातील लढत रंगतदार अवस्थेत असतानाच ‘सॅण्डी’ चक्रीवादळामुळे ओबामा यांना प्रचार सोडून मदत कार्यावर लक्ष केंद्रित करावे लागले.

 
परफॉर्मर हीच माझी भूमिका आहे.. Print E-mail

रविवार ४ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

जगभरातील मराठी माणसांचे लाडके पु. ल. देशपांडे ऊर्फ भाईंची ८ नोव्हेंबर रोजी जयंती. त्यानिमित्त येत्या गुरुवारी परचुरे प्रकाशनतर्फे ‘पाचामुखी..’ हे पुलंचे पुस्तक प्रसिद्ध होत आहे. यात आहेत पुलंची काही गाजलेली भाषणे आणि त्यांच्या मुलाखती. त्यातील नामवंत समीक्षक प्रा. स. शि. भावे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा संपादित अंश..
 
चला, गड बांधूयात! Print E-mail

अभिजित बेल्हेकर ,रविवार ४ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

डोंगरांनो का उभे? सांगाल का काही मला?
तीनशे वर्षांचिया जो मागला तो मामला
कुणी फिरस्ता हिंडता वनी,
वदला ऐशी आर्जववाणी।
ऐकून त्याची आर्त याचना,
आली येथल्या जडा चेतना।।
मला विचारा मीच सांगतो,
आधी या माझ्याकडे, सरसावत एकेक पुढे,
हात उभारूनि घुमू लागले, डोंगर किल्ले बुरूज कडे ।।
 
बारा वर्षांचं चक्र… Print E-mail

alt

रविवार , २८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘नागमंडल’, ‘हयवदन’, ‘हमिदाबाईची कोठी’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘पुरुष’, ‘बॅरिस्टर’, ‘संध्याछाया’ यांसारख्या समांतर आणि व्यावसायिक रंगभूमीवरील वैविध्यपूर्ण नाटकांनी मराठी रंगभूमीला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या प्रतिभावान दिग्दर्शिका विजया मेहता यांना ‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले होते. सांस्कृतिकदृष्टय़ा समृद्ध बालपण, इब्राहिम अल्काझी यांच्याकडून मिळालेलं नाटकाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, ‘रंगायन’ची मंतरलेली वर्षे,  रंगभूमीच्या निमित्ताने पुलं, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी आदी भिन्न पिंडप्रकृतीच्या नाटककारांशी आलेला संबंध, फ्रिट्झ बेनोव्हिट्झ, ब्रेख्त आणि पीटर ब्रुक यांच्यामुळे जागतिक रंगभूमीशी जोडली गेलेली नाळ, ‘रावसाहेब’, ‘पेस्तनजी’सारख्या फिल्म्सच्या निमित्ताने सिने-माध्यमाचा घेतलेला अनुभव, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि एनसीपीएमधील प्रशासकीय कारकीर्द तसंच आपल्या व्यक्तिगत जीवनाविषयी विजयाबाईंनी व्यक्त केलेलं मनमोकळं मनोगत..

 
हमिदाबाईची कोठी आणि दळवी पर्व Print E-mail

alt

रविवार , २८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘झिम्मा’ हे केवळ विजया मेहता यांचं आत्मचरित्र नाही, तर तो मराठी रंगभूमीवरचा  मौल्यवान दस्तऐवजही आहे. बाईंच्या आठवणींच्या धाग्यांचा हा गोफ वाचकांना बांधून ठेवील, यात शंका नाही. हे पुस्तक ‘राजहंस’ प्रकाशनातर्फे  लवकरच प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील खास उतारा ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी..
ह मिदाबाईचा लेखक अनिल एक अनोखं व्यक्तिमत्त्व. त्याची ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’, ‘डोंगर म्हातारा झाला’ ही पुस्तकं साहित्यक्षेत्रात गाजत होती. खरंतर पिंडानं अनिल विमुक्त भटक्या; सतत वेगवेगळी माणसं हुडकत फिरणारा.
 
...आणि मी पुन्हा ‘बॅरिस्टर’ मध्ये आलो! Print E-mail

alt

विक्रम गोखले , रविवार , २८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
नाटकाशी  माझा संबंधही नाही, असा मी न-नट होतो. कोणीतरी विजयाबाईंना सांगितलं, ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकात एक मुलगा आहे. तो इतरांपेक्षा वेगळा आहे. तो वेगळा कसा आहे, हे बाईंनी नाटक पहायला न येता माहिती देणाऱ्याकडून समजून घेतलं. ‘जास्वंदी’ हे पहिलं नाटक मी १९७२-७३ मध्ये केलं होतं. आज मी जो काही आहे, तो बाईंच्याच मार्गदर्शनामुळे. निरीक्षणातून जी अनुभूती येते आणि त्यातून आपण नव्याने काम करत जातो, हे मी अनुभवलं आहे.
प्रयोगाच्या वेळेला मिनिट नि मिनिट बाई काय करतात, ज्यावेळेला त्यांच्याकडे संवाद नाहीत त्यावेळेला त्या काय करतात, इतर नटांकडून जेव्हा संवाद बोलले जातात त्यावेळी बाई काय करतात, हे मी बघायचो.
 
‘स्वतंत्र विचाराचे मुलगे’ दाखवा! Print E-mail

alt

चित्रा वैद्य , रविवार , २८ ऑक्टोबर २०१२
नीरजा यांचा २३ सप्टेंबरच्या अंकातील लेख खरोखरच विचारांना चालना देणारा आहे. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेच्या माध्यमातून ‘स्वतंत्र विचाराच्या मुली’ हा विषय त्यांनी हाताळला आहे.
त्याच त्या सासू-सुनांच्या कपटकारस्थानांवर आधारित मालिकांपेक्षा ही मालिका खरोखरच वेगळी होती. हसत-खेळत आजच्या गोंधळलेल्या समाजाच्या मुखात समाजस्वास्थ्य टिकविण्यासाठी उपदेशामृताचे चार थेंब टाकायचा प्रयत्नही या मालिकेतून झाला. अमेरिकेचे गुणगान गात ऊठसूट तेथे जाण्यात कसा अविचार आहे किंवा लग्न म्हणजे केवळ एक करार- एक व्यवहार नसून व्यक्तींमधील परस्परसामंजस्याचे, जवळकीचे नाते विणणारी आणि विचारपूर्वक निर्माण केलेली ती एक पारंपरिक संस्था कशी आहे किंवा माणसांच्या भाऊगर्दीत राहूनही प्रत्येकाला विशेषत: स्त्रियांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व कसे जपता-जोपासता येते- असे सगळे जुनेच विचार नव्याने मांडण्याचा एक छान प्रयत्न या मालिकेमधून केला गेला.
 
रूढींचा विळखा; मतलबांचा उदोउदो! Print E-mail

सुहास सरदेशमुख ,रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

आपल्याकडे तीर्थस्थळांची कमी नाही. अनेक देवस्थानं आज पैशांच्या श्रीमंतीने राष्ट्रीय पर्यटनस्थळांच्या यादीत समाविष्ट झालेली आहेत. तथापि देवीची तीर्थस्थळं असलेली ठिकाणं काहीशी दुर्लक्षिली गेलेली दिसतात. तिथल्या अनिष्ट रूढी-परंपरांचा विळखाही काळ बदलला तरी अद्याप सुटायला मागत नाही. तशात बाजारी अर्थकारणाची आणि या देवस्थानांना लागलेल्या ‘घुशीं’ची प्रकरणे अधूनमधून बाहेर येत असतात. सणासुदीच्या या दिवसांत लोकांच्या भाविकतेच्या नावाने होणाऱ्या या अनिष्ट गोष्टींचीही चर्चा करणं अप्रस्तुत ठरू नये.
 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 1 of 3

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो