|
‘स्वतंत्र विचाराचे मुलगे’ दाखवा! |
|
|
चित्रा वैद्य , रविवार , २८ ऑक्टोबर २०१२ नीरजा यांचा २३ सप्टेंबरच्या अंकातील लेख खरोखरच विचारांना चालना देणारा आहे. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेच्या माध्यमातून ‘स्वतंत्र विचाराच्या मुली’ हा विषय त्यांनी हाताळला आहे. त्याच त्या सासू-सुनांच्या कपटकारस्थानांवर आधारित मालिकांपेक्षा ही मालिका खरोखरच वेगळी होती. हसत-खेळत आजच्या गोंधळलेल्या समाजाच्या मुखात समाजस्वास्थ्य टिकविण्यासाठी उपदेशामृताचे चार थेंब टाकायचा प्रयत्नही या मालिकेतून झाला. अमेरिकेचे गुणगान गात ऊठसूट तेथे जाण्यात कसा अविचार आहे किंवा लग्न म्हणजे केवळ एक करार- एक व्यवहार नसून व्यक्तींमधील परस्परसामंजस्याचे, जवळकीचे नाते विणणारी आणि विचारपूर्वक निर्माण केलेली ती एक पारंपरिक संस्था कशी आहे किंवा माणसांच्या भाऊगर्दीत राहूनही प्रत्येकाला विशेषत: स्त्रियांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व कसे जपता-जोपासता येते- असे सगळे जुनेच विचार नव्याने मांडण्याचा एक छान प्रयत्न या मालिकेमधून केला गेला.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>
|
Page 3 of 7 |