लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत Print E-mail

रविवार ,७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात’सारखी अनेक गीते  कविवर्य वा. रा. कांत यांनी लिहिली. स्वातंत्र्य, राष्ट्रभक्ती, मानवता व मांगल्य या मूल्यांवरील निष्ठा त्यांच्या कवितेतून प्रकटते. त्यांच्या कालपासून सुरू झालेल्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त न्या. नरेन्द्र चपळगावकर यांचा लेख..
 
चला, चंगळवादी होऊ या... Print E-mail

alt

गिरीश कुबेर , रविवार  , ३० सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घोषित केलेल्या नव्या आर्थिक सुधारणांना सध्या विरोधी पक्ष कडाडून विरोध करत आहेत. विशेषत: भाजप आणि डावे. आणि गंमत म्हणजे आपण विरोध का करतो, हे सांगताना दोघेही इशारा देतात की, यामुळे चंगळवादी वृत्ती वाढीस लागेल! तसं झालं तर त्यात गैर काय? खरं तर चंगळवादातूनच अर्थव्यवस्थेला गती येऊन रोजगार आणि संपत्तीची निर्मिती होत असते. तेव्हा आपण त्यासाठी तरी ‘चंगळवादी’ व्हायला काय हरकत आहे? आणि विरोधाभास म्हणजे आज आर्थिक सुधारणांना कडवा विरोध करणाऱ्या भाजपचं स्वत:चं सरकार जेव्हा देशात सत्तेवर होतं, तेव्हा त्यांनीही १०० टक्के परदेशी खासगी गुंतवणूक किराणा क्षेत्रात येऊ देण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा देशाचं वाटोळं होईल असं भाजपला वाटत नव्हतं? आज केवळ ५१ टक्के परदेशी गुंतवणुकीची मर्यादा असताना आणि त्याबरोबरीनं पायाभूत सोयीसुविधा विकसित करण्याची अट घातली जाणार असताना भाजपने त्याविरुद्ध गळा काढायची गरज काय?

 
अमेरिकेने यूपीए सरकारला झुकवले! Print E-mail

alt

प्रकाश करात , रविवार  , ३० सप्टेंबर २०१२
सरचिटणीस, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष
विदेशी किराणा दुकानांना भारतातील किरकोळ क्षेत्रात उतरण्याची परवानगी देण्याच्या यूपीए सरकारने घेतलेल्या स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठय़ा धोरणात्मक निर्णयामुळे मोठय़ा प्रमाणावर रोजगार नष्ट होतील. आजच्या घडीला भारतात कृषी क्षेत्राखालोखाल सर्वाधिक रोजगाराचे सृजन किरकोळ क्षेत्रातच होत आहे. २००९-१० च्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणानुसार चार कोटी लोक किरकोळ क्षेत्रात रोजगार कमावत आहेत. त्यातील बहुतांश अर्थव्यवस्थेच्या अन्य क्षेत्रांमध्ये उपयुक्त रोजगार संपादन न करू शकलेले, असंघटित किंवा स्वयंरोजगारावर अवलंबून असलेले छोटे व्यापारी आहेत. भारतात अशावेळी- जेव्हा रोजगाराच्या संधी नाटय़मयरीत्या घटत चालल्या असताना, तसेच २००५ ते २०१० या काळात रोजगाराचा वार्षिक दर अवघा ०.८ टक्के असताना छोटे व्यापारी आणि दुकानदारांच्या मोठय़ा प्रमाणावर होऊ घातलेल्या विस्थापनाचे अत्यंत भयंकर परिणाम संभवतात.

 
रालोआ पाश्चात्य दबावाला बळी पडली नव्हती! Print E-mail

alt

अरुण जेटली , रविवार  , ३० सप्टेंबर २०१२
विरोधी पक्षनेते, राज्यसभा
किरकोळ क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याचा निर्णय यूपीए सरकारने चुकीच्या वेळी घेतला आहे. देशाचे आर्थिक वास्तव आणि विद्यमान राजकीय परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर चुकीच्या ठरलेल्या या निर्णयाचे आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही.
मनमोहन सिंग सरकारची विश्वासार्हता रसातळाला पोहोचलेली आहे. सरकारचे नेतृत्व भ्रष्टाचार आणि आर्थिक कुव्यवस्थापनाच्या आरोपांची उत्तरे देण्यात अयशस्वी ठरलेले आहे. संसदेचे अधिवेशन संपत नाही तोच केंद्रीय मंत्रिमंडळाकडून किरकोळ क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामागे कोणती राजकीय बाध्यता होती?

 
रंगढंग फुलपाखरांचे! Print E-mail

alt

जोसेफ तुस्कानो , रविवार  , ३० सप्टेंबर २०१२
फुलपाखरांच्या पंखावरचा रंगीबेरंगीपणा निसर्गात अन्यत्र विरळाच! नजर खिळवून ठेवणाऱ्या त्या नानाविध छटा म्हणजे सौंदर्याची लुभावण करणारी उडती संकेतस्थळेच होत. या विविध रंगछटांवरून हे कीटक दूरवरून ‘आपुल्या जातीच्या’ना ओळखतातच; पण ते पाखरू नर की मादी, हेही त्यांच्या लक्षात येत असते.
भरपावसात पावसाचे टपोरे थेंब कोसळतात, तेव्हा फुलपाखरे काय करीत असावेत? त्यांच्या रंगीबेरंगी नाजूकपंखांना इजा पोहोचत असेल ना! कारण फुलपाखराचे वजन असते साधारणत: ५०० मिलीग्राम (म्हणजे अर्धा ग्राम), तर पाण्याचा टपोरा थेंब असतो ७०० ग्रॅमचा. मग हा असह्य़ मारा चुकविण्यासाठी ते नाजुक जीव एक शक्कल लढवतात. ते पावसाची चाहूल लागली की उंची गवताच्या पात्याखाली किंवा एखाद्या रोपटय़ाच्या पानाआड आडोसा घेते. पाऊस थांबला नि सूर्यप्रकाश बाहेर आला की ते लगेच बाहेर पडते.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>

Page 5 of 7