पर्सी जिजिना , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२ विक्री संचालक - सजावट जोतून इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुलांमुळे घराला एक जागतेपण येतं.. सध्या मुलांची स्वतंत्र खोली ही संकल्पना रुळते आहे. ही खोली कशी असावी, त्यात कोणत्या गोष्टी आवर्जून असाव्यात, याविषयी.. निमित्त आहे, १४ नोव्हेंबर या बालदिनाचे.. लहान मुलांची खोली म्हणजे त्यांचं स्वत:चं असं छोटंसं विश्वच! जिथे तो दिवसभराचा बहुतांश वेळ घालवितात. भरपूर मस्ती, खेळणं, गृहपाठ करणं, पुस्तकं वाचणं, चित्र काढणं आणि रंगविणं या कामात ते दंग असतात. इथे ती स्वत:च्या काल्पनिक जगात दिवसभर रममाण होतात. मुलांच्या आयुष्याला वळण देण्यात विशेषत: त्यांच्या वाढीच्या वयात मुलांच्या खोलीची किती महत्त्वाची आहे, यावर अनेक बालतज्ज्ञांनी आपली मते मांडलेली आहेत. |
प्रणोती प्रकाश , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दीपावली म्हणजे वर्षांतला सगळ्यात मोठा आनंदाचा, उत्साहाचा सण! नवीन कपडे, छान छान वस्तू, लाडू, चिवडा, चकल्यांची मस्त मेजवानी, फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची रोषणाई आणि अर्थातच प्रियजनांच्या भेटीगाठी! त्यात या वर्षी तुमचं दिवाळी गिफ्ट हे इतरांच्या गृहसजावटीमध्ये भर घालणारं असेल तर.. आपण भारतीय म्हणजे मुळातच उत्सवप्रिय. त्यातही जर दिवाळीचा सण असेल तर आपल्या आनंदाला उधाणच येतं. दिवाळीत आपण आप्त, मित्रपरिवार यांच्याकडे जातो आणि या प्रेमाच्या भेटींचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एकमेकांना चविष्ट फराळाबरोबरच भेटवस्तूसुद्धा देतो. मुळात सणाच्या, आनंदाच्या दिवशी एकमेकांना भेटवस्तू देणं हा आपला पूर्वीपासून चालत आलेला रिवाज आहे. शुभदिनाचं औचित्य साधून एकमेकांना भेटवस्तू दिल्या तर आनंदात भर तर पडतेच, शिवाय आपले नातेसंबंध अधिकाधिक समृद्ध, दृढ होण्यासही मदत होते. नात्यातला गोडवा, जिव्हाळा वाढतो. म्हणूनच कदाचित भेटवस्तू देण्याचा हा प्रघात आजही विनाखंड सुरू आहे. मग या वर्षी तुम्ही दिलेली गोड भेटवस्तू एखाद्याच्या घरातील सजावटीत चार चाँद लावणार असेल तर मग क्या बात है!
|
लता दाभोळकर , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुलांनी भिंतीवर साकारलेलं विश्व सर्वस्वी त्यांचं असतं. त्यात ती रमतातही. त्यांच्या या व्यक्त होण्यातून मुलांच्या मनात चाललेल्या भावनांच्या कल्लोळाची जाणीव आपल्याला होऊ शकते. मुलांचं मन समजून घेण्याचं ते एक उत्तम माध्यम ठरू शकतं. पाच वर्षांची मीनाक्षी भिंतीवर चित्र काढते.. लिहिते.. त्या वेळचा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीयच! भिंतीवरच्या तिच्या चित्रांमध्ये तिनं तिचं सारं भावविश्व साकारलेलं असतं.. त्या चित्रांमध्ये ती आणि तिचा बाबा, शाळेतल्या लाडक्या बाई असतात. आणि हो तिला घाबरवून टाकणारी चेटकीणही! त्यातही एक चांगली आणि दुसरी दुष्ट! मग त्यांच्याशी बराच वेळ चालणारा तिचा संवाद.. आणि रोज आई ऑफिसमधून घरी आल्यावर तिला त्या चित्रांचा अन्वयार्थ उलगडून सांगताना तिची चाललेली शब्दांची जुळवाजुळव.. सारं काही मोहवून टाकणारं.. पण लहानग्या मीनाक्षीचं भिंतीवरचं हे भावविश्व तिच्या आजीआजोबांना फारसं रुचत नाही. त्यांच्या लेखी मीनाक्षीचा हा ‘उद्योग’ म्हणजे भिंती घाण करणं. मग कधी रागाने, कधी एखाद्या फटक्याने तिला भिंतीवर लिहिण्यापासून परावृत्त केलं जातं; पण त्याने लहानग्या मीनाक्षीवर फारसा फरक पडत नाही, कारण ती भिंत म्हणजे तिचं सारं भावविश्व असतं; जे तिच्या आनंदीवृत्तीला अधिक रूचणारं असतं. |
संज्योत दुदवडकर , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२ इंटीरिअर डिझायनर
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दीपोत्सव म्हणजे दिव्यांचा उत्सव! दीप, पणत्या, आकाशकंदील असा सगळा प्रकाशमयी सरंजाम दिवाळीच्या स्वागतासाठी आता सज्ज झाला आहे. पण या दिवाळीत पारंपरिक रोषणाईबरोबरच इलेक्ट्रिक लॅम्पच्या साहाय्याने घर छान प्रकाशमय केलं तर! दिवाळीच्या स्वागतासाठी सगळ्यांची घरं आता छान सज्ज झाली असतील. घराची झाडलोट करून घरांना नवी झळाळी मिळाली असेल. दिवाळीत दिव्यांची आरास केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पण या पारंपरिक दिव्यांच्या रोषणाईबरोबरच घरात आधुनिक, इलेक्ट्रिकल लॅम्पची रोषणाई केली तर.. मग तर तुमचं घर नक्कीच या दिवाळीत मस्त झळाळून उठेल. गृहसजावटीत लॅम्प ही वस्तू अतिशय महत्त्वपूर्ण असते. घराची सजावट करताना एखादा कोपरा किंवा विशिष्ट जागा अर्थपूर्णरीत्या उठावदार करायची असेल तर लॅम्पची रचना हमखास केली जाते. यामुळे संपूर्ण खोलीला एक वेगळाच उबदार स्पर्श प्राप्त होतो. याआधी तुम्ही घरातील कोणत्याही खोलीत लॅम्पची मांडणी केली नसेल तर या दिवाळीत ती करून बघा, तुमचं घर नक्कीच उठावदार दिसेल. शिवाय हे काम अगदी एका दिवसात होण्यासारखं आहे. आपल्या आवडीचा लॅम्प इलेक्ट्रिशियनकडून लावायला तुमचा फार वेळ जाणार नाही. फक्त घरात कोणत्या जागेत लॅम्प लावायचा आहे, त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा लॅम्प चांगला दिसेल याचा विचार करून लॅम्पची निवड करा. |
डॉ. अद्वैत पाध्ये , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२ मानसोपचारतज्ज्ञ
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुलांसाठी स्वतंत्र खोली असण्याचं हे युग आहे. त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्व विकासासाठी, निकोप वाढीसाठी हे गरजेचं असलं तरी पालक आणि पाल्य यांच्यातील सुसंवादाला कुठे खीळ बसता कामा नये, हे अधिक महत्त्वाचं आहे. ‘चांदोबा चांदोबा भागलास का, िलबोणीच्या झाडामागे लपलास का, िलबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी’ हे बालगीत आपण सगळ्यांनीच लहानपणी ऐकलं आहे. आता हे बालगीत आपण व्हिडीओ सीडीजमधून आजच्या मुलांना ऐकवतो आहोत. या गाण्यात म्हटल्याप्रमाणे पूर्वीची गृहसंस्कृती चिरेबंदी वाडय़ाची होती. दगडी चिरेबंदी वाडे, त्याचे मोठे लाकडी प्रवेशद्वार, ते बंद करायला फक्त एक लाकडी अडसर किंवा अगदी असले तर मोठे कुलूप. आत प्रवेश केल्यावर दिसे ते वातावरण सुंदर, पवित्र करणारे तुळशीवृंदावन व त्यापाशी तेवणारा दिवा! मग असे पडवी किंवा ओसरी. तिथून मुख्य घरातील खोल्या. वाडय़ाच्या भव्यतेप्रमाणे यासुद्धा मोठय़ा, प्रशस्त. दिवाणखाना, स्वयंपाकघर, कोठीची खोली, माजघर, बाळंतिणीची खोली, कुटुंबप्रमुख असलेल्या जोडप्याची खोली, वर छोटा चिंचोळा जिना किंवा मोठा लाकडी जिना जाई तो माडीवर. |
अनुश्री हर्डीकर , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आज प्रत्येक क्षेत्रात बाजारपेठ काबीज करण्यासाठी नवनवीन युक्त्यांचा वापर केला जात आहे. यात दिसून येणारा समान घटक म्हणजे लहान मुलांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. अगदी खाद्यपदार्थापासून ते कपडय़ांपर्यंत आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंपासून ते घरापर्यंत प्रत्येक बाबतीत मुलांना महत्त्व दिले जाते. त्यांना आकर्षति करून घेतले जाते. मग ती व्यक्ती गरीब असो की अतिश्रीमंत. आपल्या मुलांना हवे ते देण्याची तळमळ सर्वामध्येच असते. याचेच प्रतििबब आजच्या बांधकाम क्षेत्रातही पडलेले दिसून येते. ‘सनटेक रिअल्टी लिमिटेड’च्या वतीने सनटेक सिटी हा गृहनिर्माण प्रकल्प याचेच उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. या गृहप्रकल्पात जागतिक दर्जाच्या सुविधा आपल्या ग्राहकांना देतानाच खास मुलांकरता डिस्नीतील पात्रांचा समावेश केला आहे. सहा ते अकरा या वयोगटातील मुले संपूर्ण जगाकडे नावीन्यपूर्ण नजरेने पाहात असतात. मुलांचं भावविश्व समृद्ध करण्यासाठी या गृहप्रकल्पात अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत. मुलांमधील जिज्ञासेला चालना देण्याच्या कामात मुलांची सजवलेली खोली तुम्हाला साथ देऊ शकेल. थोडय़ा मोठय़ा मुलांमध्ये दोन्ही वयोगटांचे मिश्रण आढळून येते. |
डॉ मुकुंद नवरे , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२ अमेरिकेत ‘नेबरहूड वॉच’ ही एक गुन्हे-प्रतिबंधक व्यवस्था आहे. यात घरी किंवा इतर कुठेही आपल्याला लक्ष्य केले जाऊ नये, यासाठी स्थानिक नागरिकांना शिक्षित केले जाते. तसेच कुठेही संशयास्पद कृत्य होत असल्यास त्याची सूचना नागरिकांनी पोलिसांना देणे महत्त्वाचे आहे. शेजाऱ्याने तुमच्या घरात लक्ष घालणे म्हणजे तुमच्या खासगी आयुष्यात नाक खुपसण्याचा एक प्रकार, असंच कुणीही म्हणेल. असं असतानाही ‘नेबरहूड वॉच’ या विषयावर असोसिएशननं एक मीटिंग ठेवली आहे, तर आपण जाऊ या का?’ असं माझ्या मुलानं विचारलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं आणि त्याच वेळी मनात उत्सुकता निर्माण झाली. जुलै महिन्यात आम्ही अमेरिकेत न्यू जर्सीमधील पार्सिपनी या गावी मुलाकडे राहायला गेलो तेव्हाची ही गोष्ट! तेथील हंटिंग रिज नावाच्या वसाहतीत त्यानं काही महिन्यांपूर्वी घर घेतलं. या वसाहतीत एकूण दोनशे दहा घरं आणि तिथल्या सर्व रहिवाशांची असोसिएशन आहे. बहुतेक घरं एकमेकांना रो -हाऊसप्रमाणे लागून तर काही स्वतंत्र, पण दोन मजली. शिवाय गराज, बेसमेंट (तळघर) असलेली ऐसपस. छान रस्ते, नीटनेटकी झाडे, सर्वत्र हिरवळ, पोहण्याचा सामूहिक तलाव शिवाय रहिवाशांनी आपापल्या घरासमोर लावलेली किंवा कुंडय़ांमध्ये ठेवलेली फुलझाडे, असा नीटनेटका परिसर.
|
भगवान मंडलिक , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुंबईपासून तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर असलेली कल्याण-डोंबिवली शहरं, ही राहण्यासाठी मुंबईकरांची नेहमीच पसंतीची ठिकाणं राहिली आहेत. कारण इथून मुंबईत जाणं अन्य शहरांच्या तुलनेत सोपं आहे. तसेच या शहरांनी आपला सांस्कृतिक वारसाही जीवापाड जपला असल्याने अनेक मुंबईकर जेव्हा येथे राहायला गेले, तेव्हा त्यांना या शहरांमध्ये उपरेपण जाणवलं नाही. कल्याण हे एक ऐतिहासिक खाणाखुणा जपणारं शहर. कला-संस्कृतीचं हे माहेरघर. या शहराने अनेक कलावंत दिले. आपलं पारंपरिक रूप मोठय़ा आनंदानं मिरवणाऱ्या या शहराने हळूहळू कात टाकायला सुरुवात केली आहे. काळाच्या ओघात जुन्या वाडय़ांच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. मुंबई-ठाण्यातील जागांचे वाढते दर यामुळे अनेक जण कल्याणचा पर्याय निवडत आहेत. एकीकडे या शहराने आपला ऐतिहासिक-चेहरा जपला आहे. दुसरीकडे लोकांचा राहण्यासाठी या शहराकडे कल वाढत असल्याने आधुनिक सुनियोजित इमारतींच्या गृहप्रकल्पांची संख्याही येथे वाढत आहे. मुंबईतील सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या, उपक्रमांमध्ये काम करणारा मोठा नोकरदार कल्याणमध्ये राहतो. आधुनिक शहराला साजेसे मॉल्स, मोठमोठी हॉटेल्स, फ्रॅन्चायजी आता कल्याणात दिसू लागल्या आहेत. कल्याणमध्ये होत असलेल्या आधुनिक सुविधांमुळे अनेक विकासकही कल्याणमध्ये गृहप्रकल्प उभारण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे इथल्या जमिनीचे भावही वाढले आहेत. |
शनिवार , १० नोव्हेंबर २०१२ ‘वास्तुरंग’ पुरवणी परिपूर्ण बनविण्यात अत्यंत माहितीप्रद अशा लेखांचा मोठा वाटा आहे. त्यातील ‘वैथिश्वरनकोईल’ हा लेख विशेष वाटतो. दक्षिण भारतीयांचे धर्म वा संस्कृतीचे प्रेम तसेच विविध ज्ञानशास्त्रांचे जतन व त्यात वाढ करण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या हे या लेखावरून स्पष्ट होते. लेख वाचून तेथे जाऊन आल्यासारखे वाटते, तरी एखाद्या वेळी अशा स्थानांना भेट अवश्य द्यावी असे वाटते. पर्यटन संस्था मात्र अशा गोष्टींची ओळख का करून देत नाहीत? लेख उपयुक्त वाटला. - समीधा मराठे, ठाणे. |
वीरेंद्र तळेगावकर , शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दिवाळीचे निमित्त साधून विकासकांनी ग्राहकांना घरखरेदीला उद्युक्त करण्यासाठी विविध सवलींचा वर्षांव केला आहे. वर्षभरात गृहउद्योगाने फारशी उभारी घेतलेली नाही. परंतु दिवाळीचे निमित्त साधून वर्षांच्या शेवटीतरी गृहउद्योगाला उभारी येईल, अशी आस विकासकांना आहे. देशातील बांधकाम उद्योगाला आताच काय तो उभारीचा दिलासा आहे. निमित्त आहे दिवाळी.. दुसरे म्हणजे प्रशासकीय पातळीवरील मंजुरी आदींसाठी शिथिलता, सीमेंट- स्टील- वाळू- कामगार यांची उपलब्धता आणि अद्यापही वार्षिक १० टक्क्यांच्या उंबरठय़ावर असलेले गृहकर्जाचे व्याजदर.. हे सारे काही यंदाच्या सणांच्या मोसमात जुळून आले आहे. |
अर्चना जोशी , शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२ दिवाळी आली की घरसजावटीचे वेध लागतात. कल्पक सजावटीने आपलं घर अधिक सुंदर करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे आडाखे बांधत असतो. अशा वेळी मात्र घराची कशा पद्धतीने सजावट करावी याबाबत मनात पुरता गोंधळ उडतो. यासाठी घरसजावटीसाठी सहजसोप्या युक्त्या करता येतील. |
मनोज अणावकर , शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
फटाक्यांच्या आतषबाजीशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत नाही. परंतु आनंदाच्या भरात फटाके वाजवताना त्याचा आपल्या इमारतीला धोको पोहचू नये, याबाबतही काळजी घेणं आवश्यक आहे. आपण दिवाळी आली की, घराची झाडलोट करतो, कधीकधी रंगरंगोटीही करतो, पडदे बदलतो तसंच गृहसजावटीच्या नवनवीन वस्तू खरेदी करतो. या सर्वामागे आपल्या घराविषयीचा आपल्याला वाटणारा जिव्हाळा असतो. सणाला घरी येणाऱ्या पाहुण्यांना आपलं घर अधिक सुंदर आणि नीटनेटकं दिसावं, हा यामागचा हेतू असतो. पण हे सर्व करत असताना घराची सुरक्षितता बघणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. |
|
|