शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२ दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास.. प्रत्येक जण दिवाळीनिमित्त घराची सजावट करण्यासाठी बाजारात काय नवीन आले आहे याची आतुरतेने वाट पाहत असतो. तसेच शुभमुहूर्तावर गृहप्रवेश करणाऱ्यांना काय भेट द्यावी, भाऊबिजेसाठी भावाला वा बहिणीला कोणती वस्तू द्यावी याचे आडाखे बांधले जातात. निर्मिती आर्ट्सने तुमच्यासाठी खास पर्याय उपलब्ध केले आहेत. विशेष म्हणजे या वस्तू पर्यावरणपूरक आहेत. बांबू, टेराकोटा, नारळाच्या करवंटय़ा, झाडांच्या शेंगा यांपासून तयार केलेल्या वस्तू घराच्या सजावटीत भर घालतील. |
शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२ बंगाल, ओरिसा, मध्य प्रदेशमधील कलाकारांनी डोक्रा क्राफ्टमधील तयार केलेले दिवे बाया डिझाइनने आणले आहेत. हे दिवे घरसजावटीसाठी व दिवाळीत भेटवस्तूंसाठी खूप उपयुक्त आहेत. या दिव्यांची किंमत एक हजारापासून ते आठ हजारांपर्यंत आहे. हे दिवे बाया डिझाइन, रघुवंशी मिल्स कम्पाऊंड, सेनापती बापट मार्ग, फिनिक्स मिल्स, लोअर परेल, मुंबई येथे उपलब्ध आहेत. |
प्रणोती प्रकाश , शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दिवाळी आणि दीप यांचं अतूट नातं.. त्यामुळे दिवाळीत दारात दीप तेवत ठेवण्यालाही खूप महत्त्व आहे. एक छोटासा तेवत राहणारा दिवा सारं वतावरण मंगलमय करून टाकतो. यंदा दिवाळीसाठी बाजारात विविध प्रकारचे दिवे आले आहेत, त्याविषयी.. दीपावली.. मांगल्याचा, आनंदाचा सण! अंध:काराला नष्ट करून सर्वत्र चतन्यदायी आशेचा प्रकाश पसरविणारा सण! दिवाळी म्हणजे उत्साह, आनंद, चविष्ट फराळ, नानाविध नवीन वस्तू, प्रेमाच्या भेटी, नवीन कपडे, फटाके आणि अर्थातच पणत्यांचा तेजोमयी प्रकाश! कारण छोटय़ाशा, नाजुकशा पणत्यांशिवाय हा सण पूर्ण होऊच शकत नाही. |
संज्योत दुदवडकर , शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२ इंटीरिअर डिझायनर नावीन्याच्या ध्यासातून घर आकर्षक, दर्जेदार करण्याकडे अधिक कल असतो. या ध्यासातूनच मग अनेक संकल्पना, कल्पनाविष्कार आकाराला येतात. मॉडय़ुलर किचन हासुद्धा असाच एक गृहसजावटीतला सुंदर, उत्कृष्ट आविष्कार आहे.. मनुष्याला सतत नावीन्याचा ध्यास असतो. नवनवीन, चांगलं, दर्जेदार करून, शोधून त्याचा आपल्या जीवनात समावेश करण्याची त्याला आस असते. हे सूत्र त्याने स्वत:च्या घराच्या बाबतीतही चपखल अवलंबलेलं आहे. |
शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२ वाचकांना भावलेलं घर ‘वास्तुरंग’ पुरवणीतील (६ ऑक्टोबर) वासुदेव कामत यांचा ‘आठवणीतलं घर’ सदराअंतर्गत ‘घर.. मनातलं आणि मनासारखं’ हा लेख वाचताना मी मनानेच त्यांच्या घरी पोहोचले होते. बंगल्याच्या नावापासूनच आपण त्यात गुंतत जातो. बागेपासून संपूर्ण घरात फेरफटका मारल्याचं नव्हे रेंगाळल्याचं समाधान मिळतं.
|
अरुण मळेकर , शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२ ब्रिटिश काळात जनतेच्या दैनंदिन गरजेसाठी बांधल्या गेलेल्या ज्या ठराविक टोलेजंग इमारती आहेत; त्यातील क्रॉफर्ड मार्केट (आता म. जोतिबा फुले मंडई)चे स्थान वरच्या श्रेणीतील आहे. प्रशासकीय कामाची उत्तम जाण असलेले ऑर्थर क्रॉफर्ड हे मुंबई महापालिका आयुक्त असताना इ. स. १८६५ ते ७१ या काळात ही इमारत बांधली गेली. गॉथिक शैलीच्या या इमारतीच्या बांधकामातून ब्रिटिश प्रशासकांच्या दूरदृष्टीसह कलात्मकता तसेच त्यांनी केलेल्या पर्यावरणाचा विचार याची कल्पना येते. पुरातत्त्व वारसा यादीत या इमारतीचा समावेश आहेच. आता या इमारतीचा पुनर्विकास जरी करण्यात आला असला तरी मूळ इमारतीच्या सौंदर्याला बाधा आलेली नाही. |
सुचित्रा साठे , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ऋतुबदलाची जाणीव करून देत ‘ऋतुरंग’ दाखवणाऱ्या या ‘हिरव्या’ खिडक्यांशी आता माझी चांगलीच मैत्री झाली आहे. त्यासाठी माझ्या मैत्रिणीला मी मन:पूर्वक धन्यवाद देते. कारण तिच्यामुळेच हिरव्या आसमंताचा मला लळा लागला. प्रत्येक घराला अशा ‘हिरव्या’ खिडक्या लाभल्या तर..! ‘‘ए, तुझं सीताफळाचं झाड अगदी छान वाढलंय, नाही! आणि हा रॉयल पाम तर अगदी रॉयल दिसतो आहे.’’ बरेच दिवसांनी घरी आलेली माझी मैत्रीण मोकळेपणी घरभर फिरत प्रत्येक खोलीच्या खिडकीतून उत्सुकतेने बाहेर डोकावत होती. खिडकीबाहेरच्या हिरव्या पसाऱ्यात झालेला बदल तिच्या डोळ्यांना जाणवत होता.
|
शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२ मुंबईचा परीघ दिवसोंदिवस वाढतोच आहे. उपनगरी रेल्वे जिथपर्यंत जाते तिथपर्यंत बांधकाम व्यावसायिकांची नजर गेलेली आहे. त्यामुळे एकेकाळी फक्त ‘उभी’ वाढणारी मुंबई आता ‘आडवी’सुद्धा वाढू लागली आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील ग्राहकांची क्रयशक्ती, मुंबईतील जमिनींच्या किमती, नव्याने विकसित होणारे विभाग, तरुणांची बदलती मानसिकता यामुळे मुंबईतील ‘रिअल इस्टेट’ बाजारपेठेत काही विशिष्ट ट्रेंड्स दिसून येत आहेत.
|
शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२ ई-कारभार महत्त्वाचाच! किरण चौधरी यांचा (६ ऑक्टोबर) ‘ई- गृहसंस्था कारभार’ हा लेख उल्लेखनीय आहे. ई-गृहसंस्था सद्य काळाची गरज बनलेली आहे. कारण सहकारी गृहसंस्थांचा पसारा वाढत चाललेला आहे; तसेच जागांचे भावही वेगाने वाढताहेत. १५-२० मजली व त्याहून जास्त अशा गगनचुंबी इमारतीत राहणाऱ्या सभासदांना याची जास्त गरज आहे आणि त्यात भर म्हणजे ३-४ विंग्स असल्यावर तर अधिकच!
|
प्रणोती प्रकाश, शनिवार २० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा.. या दसऱ्याला आपलं घर अधिक नाविण्यपूर्ण पद्धतीनं सजविण्यासाठी हा खास लेख.. दसरा-दिवाळी हे सण जवळ यायला लागले की सगळं वातावरण चतन्यमय होऊन जातं. बाजारपेठा नावीन्यपूर्ण वस्तूंनी सजतात, तर घराघरात खरेदीचे बेत आखले जातात. |
मेधा सोमण ,शनिवार २० ऑक्टोबर २०१२
दसरा हा भारतातील सार्वत्रिक-सांस्कृतिक सण आहे. दसरा हा पराक्रमाचा, विजयाचा, यशाचा मंगल दिवस असल्याने या दिवशी वास्तुप्रवेश करण्याची प्राचीन परंपरा आहे. आश्विन शुक्ल प्रतिपदेला नवरात्राचा पहिला म्हणजे घटस्थापनेचा दिवस असतो. घटस्थापनेच्या दिवशी मातीच्या घटामध्ये नऊ धान्याची पेरणी करतात. मातीमध्ये पाणी घालतात आणि घटाची पूजा करतात. |
नंदकुमार रेगे ,शनिवार २० ऑक्टोबर २०१२
अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी सदनिका हस्तांतरणाच्या वेळी बिल्डरच्या ना-हरकत प्रमाणपत्राची अर्थात एनओसी जरूर नाही, असा आदेश दिला. परंतु यात नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत. तसेच त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला मिळण्यासाठी काय बदल अपेक्षित आहेत, यांचा आढावा घेणारे लेख. |
|
|