श्रीनिवास घैसास ,शनिवार २० ऑक्टोबर २०१२ नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. तो थोडक्यात असा की, यापुढे एखादी मालमत्ता (सदनिका, गाळा, दुकान, गोडाऊन, इ.) हस्तांतरण करताना म्हणजेच त्यासंबंधीचे कागदपत्र नोंद करताना बिल्डरच्या ना हरकत प्रमाणपत्राची म्हणजेच एनओसीची जरुरी नाही. |
मोहन गद्रे, शनिवार २० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुंबई बेटावरील त्यातल्या त्यात दक्षिण मुंबईतील म्हणजे कुलाब्यापासून माहीमपर्यंत हजारो चाळी आहेत. त्यात लक्षावधी भाडेकरू राहत आहेत. यातल्या कित्येक चाळींनी शंभरी पार केली आहे, तर काही शंभरी गाठण्याच्या मार्गावर आहेत. यातील बऱ्याच चाळी आता मोडकळीस आल्या आहेत. |
संज्योत दुदवडकर ,शनिवार २० ऑक्टोबर २०१२ इंटिरिअर डिझायनर
संपूर्ण सजावटीत अगदी नखशिखांत एकसंधपणा असावा लागतो, तर ती सजावट जास्त आकर्षक, प्रभावी ठरते. म्हणजे काय तर घराच्या फॉल सीलिंगपासून ते अगदी फ्लोअरिंगपर्यत सगळ्याच गोष्टी छान जमून आल्या पाहिजेत. असं जर झालं तर घर अधिक आकर्षक दिसतं. |
मीनाराणी प्रमोद ,शनिवार २० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ही गोष्ट आहे अशा घराची, जे मला मनापासून खूप आवडलं होतं आणि ते विकत घेण्याचं ठरलंही होतं. परंतु व्यावहारिक कारणांमुळे ते शक्य झालं नाही. मात्र ते आजही माझ्या मनात घर करूल राहीलं आहे. दसरा आला की या घराची हटकून आठवण होते आणि मन त्या घराकडे धाव घेतं. आम्हाला गावंच नाही. मुंबईच आमचं आजोळ! इथलंही आणि तिथलंही. |
उदयकुमार पाध्ये, शनिवार २० ऑक्टोबर २०१२
वैथिश्वरन कोईल मंदिर हे मंगळ, विनायकाचे जागृत स्थान मानले जाते. या मंदिराचं धार्मिक महत्त्व बाजूला सारून त्याचा वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून विचार केला, तर आपल्याकडील वास्तुकलेच्या भव्यतेची प्रचीती येते. |
डॉ. कांचनगंगा गंधे, शनिवार २० ऑक्टोबर २०१२
लिव्हिंग रूम किंवा हॉलमधलं फर्निचर कधीकधी एकसुरी वाटायला लागतं, ते बदलावंसं वाटतं, पण ते नेहमी शक्य होतंच असं नाही. कुंडीत वाढणारे, वेगवेगळे पण मनाला भुरळ पाडणारे ‘इनडोअर प्लँट्स’ हॉलमध्ये ठेवले तर एकसुरीपणा कमी होईल आणि नावीन्य जाणवेल. अशाच काही प्लँट्सपैकी ‘पेप्रोमिया’ आणि त्याच्या जाती. |
हेमंत साठय़े, शिरीष केंभावी ,शनिवार २० ऑक्टोबर २०१२
आपल्या राज्यातल्या आणि देशातल्या कोणत्याही शहरात किंवा शहराच्या भोवताली नियमबाह्य़ किंवा पूर्व परवानगीशिवाय बांधकाम होण्याचं प्रमाण घटण्याऐवजी गेल्या काही काळात खूप मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचं दिसून येतं. त्यांच्यावर कोणालाही कोणत्याही प्रकारचा अंकुश ठेवणं शक्य झालेले नाही. |
सुधीर मुकणे ,शनिवार २० ऑक्टोबर २०१२
गावी घर बांधताना बांधकामाविषयी आपल्या मनातील अनेक गैरसमजांच्या आधारावर उभे राहात असते, त्या विषयी.. से वानिवृत्त झाल्यावर आपले एक मन आपल्या जन्मगावी घेऊन जातं ते गावाकडे घर बांधण्यासाठी.. आयुष्यात कधीही बांधकामाचा संबंध नसलेले लोक जेव्हा स्वत:चे घर बांधण्यास घेतात त्या वेळी त्यांच्या डोक्यात शंकांचे काहूर उठते. |
अॅड.वि.शं.गोखले,शनिवार २० ऑक्टोबर २०१२
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबईचा चेहरामोहरा पालटून गेला. मुंबईची हद्द विस्तारली. पूर्व-पश्चिम उपनगरांनी मूळ मुंबई शहराला जणू विळखाच घातला. बिल्डर्स लॉबीने मोकळे भूखंड खरेदी करून बंगले बांधले. तसेच गृहसंकुले (हाऊसिंग सोसायटीज) उभारली. |
मीना गुर्जर, शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अनेक कथा-पुराणांतून पार्वतीचं तेजस्वी उग्र रूप, तिची तपस्या, तिचं देवतापण ठळकपणे सामोरं येतं. पण प्रवाहाखालून एक अंतस्थ प्रवाह वाहत असावा तसं तिचं कुटुंबातील गृहिणी हे घरघुती रूपही जरा पलीकडे नजर रोखली तर दिसतं. आणि त्यातून उलगडत जातं बिनभिंतींचं घरकुल पार्वतीचं! नवरात्रीनिमित्त तिच्या या अनोख्या रूपाविषयी.. |
चंद्रशेखर बुरांडे, आर्किटेक्ट ,शनिवार ’ ६ ऑक्टोबर २०१२
मुंबईत मोठय़ा संख्येने माणसांचे लोंढे येतच आहेत. विकासाच्या नावाखाली मुंबईत मोठमोठे टॉवर उभारले जात आहेत. मॉलच्या संख्येत भर पडते आहे. परंतु या विकासाच्या परिणामी इथली वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था बाधित होत आहे, त्याविषयी.. देश व मुंबई शहराच्या सद्य परिस्थितीचे वर्णन करावयाचे झाले तर महासत्तेचे गणित घोडागाडीतून प्रवास करत सोडविण्याचा प्रयत्न करण्यासारखे झाले आहे. घोडागाडीचा मालक चाबूक उगारून घोडा तात्पुरता धावेल हे पाहतोय. |
किरण चौधरी ,शनिवार ’ ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सर्व क्षेत्रांत होणाऱ्या ‘ई-कारभार’च्या धर्तीवर सहकारी गृह संस्थांचाही ई-कारभार व्हावा ही कालानुरूप अपरिहार्य बाब होय. साधारणत: बहुतेक गृहसंस्था देखभाल इत्यादी आकारांची संगणकीय देयके देण्यामार्फत सभासदनिहाय जमा रकमेचा तपशील संगणकात जनरेट करीत असतात, ज्याचा उपयोग मासिक-वार्षकि ताळेबंदात केला जातो. तर मान्यताप्राप्त लेखा परीक्षकांमार्फत खर्चाच्या तपशिलाचे परीक्षण करीत जमा-खर्चाचा एकत्रित हिशेब वार्षकि अहवालामार्फत सर्वसाधारण सभेपुढे ठेवला जातो. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>
|
Page 3 of 5 |