लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

लेख


न्यारी दुनिया! Print E-mail

alt

अनुश्री हर्डीकर , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आज प्रत्येक क्षेत्रात बाजारपेठ काबीज करण्यासाठी नवनवीन युक्त्यांचा वापर केला जात आहे. यात दिसून येणारा समान घटक म्हणजे लहान मुलांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. अगदी खाद्यपदार्थापासून ते कपडय़ांपर्यंत आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंपासून ते घरापर्यंत प्रत्येक बाबतीत मुलांना महत्त्व दिले जाते. त्यांना आकर्षति करून घेतले जाते. मग ती व्यक्ती गरीब असो की अतिश्रीमंत. आपल्या मुलांना हवे ते देण्याची तळमळ सर्वामध्येच असते. याचेच प्रतििबब आजच्या बांधकाम क्षेत्रातही पडलेले दिसून येते. ‘सनटेक रिअल्टी लिमिटेड’च्या वतीने सनटेक सिटी हा गृहनिर्माण प्रकल्प याचेच उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल.
या गृहप्रकल्पात जागतिक दर्जाच्या सुविधा आपल्या ग्राहकांना देतानाच खास मुलांकरता डिस्नीतील पात्रांचा समावेश केला आहे.
सहा ते अकरा या वयोगटातील मुले संपूर्ण जगाकडे नावीन्यपूर्ण नजरेने पाहात असतात. मुलांचं भावविश्व समृद्ध करण्यासाठी या गृहप्रकल्पात अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत. मुलांमधील जिज्ञासेला चालना देण्याच्या कामात मुलांची सजवलेली खोली तुम्हाला साथ देऊ शकेल. थोडय़ा मोठय़ा मुलांमध्ये दोन्ही वयोगटांचे मिश्रण आढळून येते.
 
नेबरहूड वॉच Print E-mail

alt

डॉ मुकुंद नवरे , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
अमेरिकेत ‘नेबरहूड वॉच’ ही एक गुन्हे-प्रतिबंधक व्यवस्था आहे. यात घरी किंवा इतर कुठेही आपल्याला लक्ष्य केले जाऊ नये, यासाठी स्थानिक नागरिकांना शिक्षित केले जाते. तसेच कुठेही संशयास्पद कृत्य होत असल्यास त्याची सूचना नागरिकांनी पोलिसांना देणे महत्त्वाचे आहे.
शेजाऱ्याने तुमच्या घरात लक्ष घालणे म्हणजे तुमच्या खासगी आयुष्यात नाक खुपसण्याचा एक प्रकार, असंच कुणीही म्हणेल. असं असतानाही ‘नेबरहूड वॉच’ या विषयावर असोसिएशननं एक मीटिंग ठेवली आहे, तर आपण जाऊ या का?’ असं माझ्या मुलानं विचारलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं आणि त्याच वेळी मनात उत्सुकता निर्माण झाली.
जुलै महिन्यात आम्ही अमेरिकेत न्यू जर्सीमधील पार्सिपनी या गावी मुलाकडे राहायला गेलो तेव्हाची ही गोष्ट!  तेथील हंटिंग रिज नावाच्या वसाहतीत त्यानं काही महिन्यांपूर्वी घर घेतलं. या वसाहतीत एकूण दोनशे दहा घरं आणि तिथल्या सर्व रहिवाशांची असोसिएशन आहे. बहुतेक घरं एकमेकांना रो -हाऊसप्रमाणे लागून तर काही स्वतंत्र, पण दोन मजली. शिवाय गराज, बेसमेंट (तळघर) असलेली ऐसपस. छान रस्ते, नीटनेटकी झाडे, सर्वत्र हिरवळ, पोहण्याचा सामूहिक तलाव शिवाय रहिवाशांनी आपापल्या घरासमोर लावलेली किंवा कुंडय़ांमध्ये ठेवलेली फुलझाडे, असा नीटनेटका परिसर.

 
ऐतिहासिक शहराचा कॉपरेरेट लुक Print E-mail

alt

भगवान मंडलिक , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुंबईपासून तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर असलेली कल्याण-डोंबिवली शहरं, ही राहण्यासाठी मुंबईकरांची नेहमीच पसंतीची ठिकाणं राहिली आहेत. कारण इथून मुंबईत जाणं अन्य शहरांच्या तुलनेत सोपं आहे. तसेच या शहरांनी आपला सांस्कृतिक वारसाही जीवापाड जपला असल्याने अनेक मुंबईकर जेव्हा येथे राहायला गेले, तेव्हा त्यांना या शहरांमध्ये उपरेपण जाणवलं नाही.
कल्याण हे एक ऐतिहासिक खाणाखुणा जपणारं शहर. कला-संस्कृतीचं हे माहेरघर. या शहराने अनेक कलावंत दिले. आपलं पारंपरिक रूप मोठय़ा आनंदानं मिरवणाऱ्या या शहराने हळूहळू कात टाकायला सुरुवात केली आहे. काळाच्या ओघात जुन्या वाडय़ांच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत.
मुंबई-ठाण्यातील जागांचे वाढते दर यामुळे अनेक जण कल्याणचा पर्याय निवडत आहेत. एकीकडे या शहराने आपला ऐतिहासिक-चेहरा जपला आहे. दुसरीकडे लोकांचा राहण्यासाठी या शहराकडे कल वाढत असल्याने आधुनिक सुनियोजित इमारतींच्या गृहप्रकल्पांची संख्याही येथे वाढत आहे. मुंबईतील सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या, उपक्रमांमध्ये काम करणारा मोठा नोकरदार कल्याणमध्ये राहतो. आधुनिक शहराला साजेसे मॉल्स, मोठमोठी हॉटेल्स, फ्रॅन्चायजी आता कल्याणात दिसू लागल्या आहेत. कल्याणमध्ये होत असलेल्या आधुनिक सुविधांमुळे अनेक विकासकही कल्याणमध्ये गृहप्रकल्प उभारण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे इथल्या जमिनीचे भावही वाढले आहेत.
 
वास्तुप्रतिसाद : वैशिष्ट्यपूर्ण वैथिश्वरनकोईल Print E-mail

शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
‘वास्तुरंग’ पुरवणी परिपूर्ण बनविण्यात अत्यंत माहितीप्रद अशा लेखांचा मोठा वाटा आहे. त्यातील ‘वैथिश्वरनकोईल’ हा लेख विशेष वाटतो. दक्षिण भारतीयांचे धर्म वा संस्कृतीचे प्रेम तसेच विविध ज्ञानशास्त्रांचे जतन व त्यात वाढ करण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या हे या लेखावरून स्पष्ट होते. लेख वाचून तेथे जाऊन आल्यासारखे वाटते, तरी एखाद्या वेळी अशा स्थानांना भेट अवश्य द्यावी असे वाटते. पर्यटन संस्था मात्र अशा गोष्टींची ओळख का करून देत नाहीत? लेख उपयुक्त वाटला.
- समीधा मराठे, ठाणे.

 
एक आस.. उभारीची! Print E-mail

alt

वीरेंद्र तळेगावकर , शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दिवाळीचे निमित्त साधून विकासकांनी ग्राहकांना घरखरेदीला उद्युक्त करण्यासाठी विविध सवलींचा वर्षांव केला आहे. वर्षभरात गृहउद्योगाने फारशी उभारी घेतलेली नाही. परंतु दिवाळीचे निमित्त साधून वर्षांच्या शेवटीतरी गृहउद्योगाला उभारी येईल, अशी आस विकासकांना आहे.
देशातील बांधकाम उद्योगाला आताच काय तो उभारीचा दिलासा आहे. निमित्त आहे दिवाळी..  दुसरे म्हणजे प्रशासकीय पातळीवरील मंजुरी आदींसाठी शिथिलता, सीमेंट- स्टील- वाळू- कामगार यांची उपलब्धता आणि अद्यापही वार्षिक १० टक्क्यांच्या उंबरठय़ावर असलेले गृहकर्जाचे व्याजदर.. हे सारे काही यंदाच्या सणांच्या मोसमात जुळून आले आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 11