मुंबई, २ नोव्हेंबर २०१२ आज बॉलीवुडचा बादशाह शाहरूख खान याचा सत्तेचाळीसावा वाढदिवस आहे. दरवर्षी शाहरूख खान आपला वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतो, मात्र यावेळी यश चोपड़ा यांचे निधन झाल्यामुळे शाहरुखने वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. |
ऐश्वर्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
 |
सुनील नांदगावकर, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मॅड कॉमेडी प्रकारातले चित्रपट अलीकडे मोठय़ा प्रमाणात बॉलीवूडमध्ये येतात. म्हटले तर निव्वळ बाष्कळ विनोदी, थोडेसे अॅक्शनपट या स्वरूपाचे चित्रपट कधी रोमॅण्टिक कॉमेडीची सरमिसळ करत पडद्यावर येतात. मॅड कॉमेडीचा प्रेक्षकवर्ग तयार होताना दिसतोय. परंतु, त्याच्या नावाखाली काहीही खपविण्याचे प्रकार जास्त आहेत. |
‘फिल्मालय स्टुडिओचे तेच गेट आणि त्या गेटमागचे तेच चेहरे.. कामाच्या शोधात फिरणारा मी या मोठमोठय़ा दारांमधून कित्येकदा निराश परतलोय.. मला अडवणारे हेच ते चेहरे आज वयामुळे ओळखण्यापलीकडे गेलेत.. तरीही ओळखीचे आहेत ते माझ्या, मी अजूनही या दरवाज्यांमधून ये-जा करतो फरक इतकाच आहे की आज हे चेहरे माझं स्वागत करतात, कधीकधी माझ्या येण्याने ते संकोचतात फार साधी माणसं आहेत ती...त्यांचा साधेपणा हीच त्यांची खरी ताकद आहे जी मला सगळ्यात जास्त भावते’, हे उद्गार आहेत दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांचे.
|
मुंबई, १० ऑक्टोबर २०१२ ख्यातनाम बॉलीवूड अभिनेत्री आज वयाची ५८ वर्षे पूर्ण करत आहे. रेखा आता मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करत असली तरी आजही रेखाची मोहिनी तिच्या चाहत्यांवर कायम आहे. भानुरेखा गणेशन हे मूळ नाव असलेली ही अभिनेत्री भारतीय चित्रपटसृष्टीत रेखा याच नावाने परिचित आहे. रेखाचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ ला झाला.
|
जेम्स बॉन्डच्या चित्रपटांना पन्नास वर्षे पूर्ण मुंबई, ५ ऑक्टोबर २०१२ गुप्तहेर म्हणजे बॉन्ड.. जेम्स बॉन्ड.. असे समीकरण असणा-या जेम्स बॉन्डच्या चित्रपटांना आज पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. चित्रपटांमध्ये हेरगिरी करत शत्रूंच्या नाकीनऊ आणणा-या आणि सुंदर तरूणींना आपल्या चलाखीने, स्मार्ट लूकने वेड लावणा-या बॉन्डची भूमिका साकरणा-या कलाकारांनी ख-या आयुष्यातही जगभरातील तरूणींना घायाळ केले आहे. |
रवींद्र पाथरे - रविवार, १६ सप्टेंबर २०१२
नाटककार अण्णासाहेब किलरेस्करांचं १८८२ साली रंगभूमीवर आलेलं ‘संगीत सौभद्र’ हे नाटक आज तब्बल १३० वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटूनही तितक्याच आवडीनं रसिक उचलून धरतात यातच या नाटकाची अभिजातता दडलेली आहे. कलावंतांच्या अनेक पिढय़ांनी आपल्या गान-अभिनयानं हे नाटक तोलून धरलं, त्यात आपले रंग मिसळले आणि तरीही ‘संगीत सौभद्र’ची जादू कधीच ओसरली नाही. ‘संगीत सौभद्र’मध्ये सुरुवातीला साकी, दिंडय़ांसह १४५ हून अधिक पदं होती. |
अनिरुद्ध भातखंडे - रविवार, १६ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मोरगाव येथील मोरेश्वराच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर एका साधुपुरुषाचे देहभान हरपले. महाराष्ट्राच्या निद्रिस्त समाजपुरुषाच्या अंगी क्षात्रतेज यावे, यासाठी बलोपासनेच्या प्रसाराचा वसा घेतलेल्या त्या साधूने गणेशाचे ते रूप पाहून तत्क्षणी एक सुंदर शब्दकळा असलेली आरती रचली.. विठ्ठलभक्तीत आकंठ बुडालेल्या एका संतानेही याच सुमारास गणेशतत्त्वाचे सार्थ वर्णन करणारी एक रचना केली. |
अय्या’च्या गाण्यात दाक्षिणात्य पेहेरावात दिसणार रानी प्रतिनिधी, मुंबई ‘बॉलिवूडची क्वीन’ म्हणून मिरवत आलेली रानी मुखर्जी तिच्या आगामी ‘अय्या’ या चित्रपटात चक्क ‘डर्टी’ लूकमध्ये दिसणार आहे. एका मराठी मुलीची भूमिका साकारणाऱ्या रानीने या चित्रपटात थेट डर्टी पिक्चरमधील विद्या बालनच्या धाटणीच्या पेहेरावात एक गाणे चित्रित केले आहे. |
कोपेनहेगेनमधील भारतीय चित्रपट महोत्सवात दाखवलेला पहिला मराठी चित्रपट प्रतिनिधीं, मुंबई मराठी चित्रपटांच्या इतिहासातील आणखी एक सोनेरी पान ‘देऊळ’ या चित्रपटाने लिहिले आहे. डेन्मार्कमधील कोपेनहेगेनयेथे झालेल्या भारतीय चित्रपट महोत्सवात ‘देऊळ’चा खास शो दाखवण्यात आला असून त्या निमित्ताने दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनाही या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. |
- झी टीव्हीवरील ‘हिटलर दीदी’मध्ये नवीन पात्र
- महिला स्वयंसेवी संस्थांचा विरोध होण्याची शक्यता
प्रतिनिधी हिंदी मालिका अत्यंत बोल्ड होत चालल्याची टीका होत असतानाच आता थेट एका पॉर्न कॉमिकमधील पात्राशी साधम्र्य असलेले पात्र आपल्या मालिकेत आणण्याचा बोल्ड निर्णय झी टीव्ही या हिंदी वाहिनीने घेतला आहे. या वाहिनीवरील ‘हिटलर दीदी’ या मालिकेत आता ‘सविता भाभी’ नावाचे एक पात्र शिरकाव करणार आहे. |
प्रतिनिधी ,३१ ऑगस्ट २०१२
‘आजची मराठी चित्रपटसृष्टी’महेश मांजरेकर या ‘नाव-युक्ती व शक्ती’भोवती बरीचशी केंद्रित आहे..महेश मांजरेकरचे स्वत:चे एक‘कुटुंब’तयार झाले ही मोठीच वस्तुस्थिती. ‘आई’या १९९६ च्या चित्रपटापासून महेश मराठी चित्रपटाच्या निर्मिती-दिग्दर्शनात आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>
|
Page 1 of 3 |