पूर्वी कमानी , शनिवार , २८ जुलै २०१२ ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ
माझ्या वडिलांनी खरेदी केलेल्या फ्लॅटसाठी आईला वारसदार म्हणून नेमले होते. त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर सोसायटीने हा फ्लॅट आईच्या नावे केला. त्यानंतर माझ्या आईने माझे व माझ्या दोन भावांचेही नाव लावले. तिचेही काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर सोसायटीने आम्हा तिघांच्या नावे फ्लॅट हस्तांतरित केला. |
नयना सहस्रबुद्धे , शनिवार , २१ जुलै २०१२
पिंकी प्रामाणिक या राष्ट्रीय खेळाडूवरचा आरोप सिद्ध होण्यापूर्वी तिला देण्यात आलेली वर्तणूक निषेधार्ह होती. ती स्त्री आहे म्हणून तिच्यावर हा अन्याय झाला का? हा प्रश्न तपासून पाहण्याबरोबरच आजच्या वाढत्या युनिसेक्स संकल्पनेच्या जमान्यात स्त्री-पुरुष भेदभाव खऱ्या अर्थाने कधी संपणार, लिंगभेदाच्या पलीकडे आपण कधी जाणार ? त्यासाठी लिंगभाव जाणीव आपण कधी तपासणार आहोत? या प्रश्नांचीं उत्तरं शोधण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचं गांभीर्यही अधोरेखित होत आहे.
|
छाया दातार , शनिवार , २१ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पूर्वी ज्या गोष्टी कुटुंबातलेच लोकप्रेमासाठी, नात्याच्या घनिष्ठतेसाठी करत होते त्या आता वेळेअभावी किंवा विभक्त कुटुंबपद्धतीमुळे करणे शक्य होत नाही. या गोष्टी आता सेवा या स्वरूपात बाजारात मिळू लागल्या आहेत, थेट सरोगेट मदरपासून पाळणाघरापर्यंत. ‘पैसे फेका सेवा मिळवा’ हे आम होऊ लागलंय, पण भावनिक नात्याचं काय? सेवा मिळतील पण त्यामागचा ‘भाव ’ कुठून आणायचा ? का पुढे आपणही रोबोचं जीवन जगणार आहोत ? हो, प्रेम बाजारातूनच विकत घ्यायची वेळ आली आहे. अजून भारतात नाही, पण अमेरिकेत नक्कीच. हे मी म्हणत नाहीये, तर होस्चाइल्ड नावाची लेखिका तिच्या पुस्तकात म्हणतीय.
|
डॉ. मंगला आठलेकर , शनिवार , २१ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
जन्माला येणाऱ्या मुली भाग्यवान म्हणायच्या की गर्भातच मारल्या गेलेल्या भाग्यवान म्हणायच्या, असा प्रश्न पडावा इतकं आजचं वर्तमान भयानक आहे. हे सगळं थांबवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन त्या विरोधात रान उठवायला हवंय.. र. धों. कर्वे स्त्री-स्वातंत्र्याबद्दल, स्त्री-पुरुष समानतेबद्दल आणि प्रामुख्यानं ‘सुखानं जगणं’ हा पुरुषाप्रमाणेच स्त्रीचादेखील हक्क आहे. याविषयी ‘समाजस्वास्थ्या’तून लिहीत होते.स्त्रीच्या स्वास्थ्याविषयी तळमळीनं लिहिणाऱ्या आणि बोलणाऱ्या र. धों.च्या काळात या प्रश्नाला जितके कंगोरे होते, त्यापेक्षा आज हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.
|
अनुराधा गांगल , शनिवार , २१ जुलै २०१२
वैद्यकशास्त्रात भरपूर पैसे मिळवून देणाऱ्या अनेक शाखा असताना त्यांनी निवड केली वेगळ्या शाखेची. पक्षाघात झालेल्यांना, सेरिब्रल पाल्सीने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी त्या ठरल्या आहेत आशेचा किरण. डॉ. राजुल वासा यांची रुग्णांविषयीची तळमळ इतकी प्रामाणिक आहे की या जोरावर त्यांनी ‘असाध्य ते साध्य’ असा पल्ला गाठला आहे. मेंदूच्या आजारानं सामान्य जगण्याला मुकलेल्या अनेकांसाठी डॉ. राजुल वासा यांचा हस्तस्पर्श जणू परीसस्पर्श ठरतो आहे.अ लीकडे चाळिशीतही पक्षाघाताला बळी पडलेल्यांची उदाहरणे कानावर पडतात. बदलत्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे स्ट्रोक पेशंटची संख्याही वाढू लागली आहे.
|
शनिवार , २१ जुलै २०१२ तुम्ही घडवलाय असा बिघडलेल्या पदार्थातून चविष्ट पदार्थ? काय झालं आणि कसं घडवला नवीन पदार्थ? चटकदार माहितीसह कळवा आम्हाला. आमचा पत्ता- लोकसत्ता, चतुरंग, प्लॉट क्र . ईएल १३८ टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई ४००७१० आमचा ई-मेल
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
|
अनिल हर्डीकर , शनिवार , १४ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आजच्या काळात एकत्र कुटुंबात राहणं, तेही गुण्यागोविंदाने ही काहीशी ‘हटके’ गोष्ट, विशेषत: मुंबई किंवा परिसरातील कमी जागेत राहताना! आम्हाला भेटली अशी कुटुंबं, छोटय़ा असो वा मोठय़ा घरात असणारी, पण आनंदाने एकमेकांना सांभाळून राहणारी, नकारात्मक गोष्टींनाही सकारात्मकतेने पाहणारी. |
डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या पत्नी ही डॉ. नागेश टेकाळे , शनिवार , १४ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
डॉ. गुओ यांची एक ओळख. परंतु आयुष्यभर म्हणजे ९६ वर्षांपर्यंत गरिबांची डॉक्टर म्हणूनच त्या कार्यरत राहिल्या. डॉ. गुओ यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्याविषयी.. व्यवसायाने परिचारिका, पण शेवटपर्यंत डॉ. कोटणीसांची पत्नी आणि गरिबांच्या डॉक्टर म्हणून स्वत:ची ओळख जपणाऱ्या श्रीमती गुओ क्विंग्लान-कोटणीस यांचे नुकतेच २८ जूनला चीनमधील शांक्सी प्रांतामधील दलियन या शहरात वयाच्या ९६ व्या वर्षी वृद्धापकाळामुळे निधन झाले. |
अनिरूध्द भातखंडे , शनिवार , १४ जुलै २०१२
‘बाया कर्वे पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलेल्या १५ जणींच्या कार्याची ओळख करुन देणारं ‘कर्त्यां-करवित्या’ हे पुस्तक नुकतंच मेनका प्रकाशनने प्रकाशित केलं आहे. त्याची ही ओळख. ‘जि च्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’ अशी एक म्हण रूढ आहे. ‘माझं घर, माझा संसार’ ही संकुचित वृत्ती सोडून निरपेक्षपणे जगाचा उद्धार करण्यास निघालेल्या अनेक स्त्रिया आज समाजात कार्यरत आहेत. |
डॉ. आशुतोष माळी , शनिवार , १४ जुलै २०१२ (जनरल सर्जन)
तातडीचे उपचार करून तिला मरणाच्या दारातून वाचवलं. त्यासाठी तिची गर्भपिशवी काढावी लागली. पण आता मुलगा होणार नाही, या रागाने तिचा नवरा सरळ निघूनच गेला. तिच्या आईने मात्र ऋण फेडले.. मी व माझी स्त्रीरोगतज्ज्ञ पत्नी डॉ. अर्चना. आम्ही एकत्रितपणे संगमनेर येथे प्रॅक्टिस सुरू केली. ते साल होतं १९९५. जवळच्या अकोले तालुक्यातून खूप अवघड केसेस यायच्या. पण ती केस मनात अडकून राहिली. |
सुचेता पावसकर , शनिवार , १४ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पावसाला सुरुवात झाल्यानंतर भारंगीची भाजी मिळू लागते. ही भाजी तशी खटपटीची. थोडी कडूसर चवीची, पण पावसाळ्यात किमान एकदा तरी खावीच. अतिशय चविष्ट! एकदा मी माझ्या मुंबईच्या भाच्याला बोलले की, भारंगीची भाजी पुण्याला मिळत नाही. त्याने कुरिअरसाठीे ४० रुपये खर्च करून ही भाजी मला पाठविली.. आज तो नाही पण ती आठवण कायम राहिली.. |
आई - बाबा तुमच्यासाठी अनघा सांगेलकर , शनिवार , १४ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मला दोन मुली. त्यांना वाढवताना जाणीवपूर्वक त्यांच्या आवडीच्या गोष्टींना खतपाणी देत गेले. अभ्यासाबरोबर इतर छंदानांही वाव देत गेले. म्हणूनच करिअरमध्येच नव्हे तर आयुष्यही त्या समृद्धपणे जगत आहेत. माझ्या दोन कन्यांपैकी मोठी मृण्मयी आणि धाकटी श्रद्धा. मृण्मयी सातव्या महिन्यात जन्मलेली. खूप अशक्त, एक किलो वजनाची होती. खूप काळजी घ्यावी लागायची. |
|
|