पूर्वी कमानी , शनिवार , २ जून २०१२ ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
माझे वय ५८ असून मी एका निमसरकारी कार्यालयात नोकरी करते. माझा नवरा एका राष्ट्रीयीकृत बँकेत असून दारूचे व्यसन, बाहेरख्यालीपणा या वाईट सवयींमुळे तो गेली चार वर्षे कामाला जात नाही. |
मंगला आठलेकर , शनिवार, २६ मे २०१२ ‘समिलगी संबंध’ ही मूलत: काही भयानक किंवा सर्वनाश ओढवणारी गोष्ट नसावी. तशी ती असती तर सर्वनाश झाला असता. कारण जगाच्या आरंभापासून समिलगी संबंध अस्तित्वात असल्याची साक्ष देशोदेशींच्या इतिहासात आणि पुराणग्रंथात पाहायला मिळते. पाश्चात्त्य देशांनी सादर केलेले जे पाहणी निष्कर्ष आहेत ते पाहिले असता असं लक्षात येतं की एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के लोक हे समिलगी आकर्षण असलेले असतात. |
संदीप आचार्य , शनिवार, २६ मे २०१२ लिंगबदल शस्त्रक्रियेला शास्त्रीय बैठक आहे. मूल जन्माला येताना काही व्यंग राहू शकतात आणि मग त्यांना मुलगा की मुलगी, कोण म्हणून वाढवावं हा प्रश्न त्यांच्या पालकांसमोर उभा राहतो. म्हणूनच ज्या व्यक्तीला जसं जगायचं आहे तसं जगता आलं पाहिजे, अन्यथा त्या मुलांचा कोंडमारा होतो. काही वेळा ते आत्महत्याही करतात. म्हणूनच हा सामाजिक प्रश्न म्हणून हाताळला गेला पाहिजे. |
शनिवार, २६ मे २०१२ २८ एप्रिलच्या अंकातील कन्या सासुरासी जाए मागे परतोनी ‘न’ पाहे या उज्ज्वला रानडे यांच्या लेखाच्या निमित्ताने वाचकांनी भरभरून दिलेला प्रतिसादच या विषयाची पसंती दर्शवणारा होता. अनेक आयांनी थेट दूरध्वनीवरून ‘आमच्या मनातील विचार मांडलेत’ अशी पावती दिली तर काही कन्यकांनी ऑनलाइन आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. वाचकांच्या पत्रातून असा सूर प्रकर्षांने जाणवला की मुली आत्मकेंद्रीत, हिशेबी होण्यापेक्षा व्यवहारी झाल्या आहेत. आणि हा बदल काळानुरूप होत असल्याने स्वाभाविक आहे.
|
प्रा. देवेंद्र इंगळे , शनिवार , १९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सामाजिक पातळीवर किंवा जातबिरादरीमध्ये बेअब्रू होऊ नये म्हणून जेव्हा ‘ऑनर किलिंग’चे कृत्य घडते तेव्हा त्या हिंसक कृत्यात प्रत्यक्ष जे सहभागी असतात त्यांच्या बरोबरीनेच तितकीच क्रियाशील भूमिका बजावणारे काही बाह्य़ घटकही सहभागी असतात. ते बाह्य़ घटक म्हणजे समाज, जातबिरादरी व जातीव्यवस्था. म्हणूनच मनीषाच्या हत्येत जितका सहभाग तिच्या कुटुंबीयांचा आहे तितकाच सहभाग सभोवतालचा समाज, जातबिरादरी आणि जातीव्यवस्थेचाही आहे. ऑनर किलिंगच्या नावाखाली अशा किती तरुणी बळी जाणार आहेत? आणि किती काळ? |
डॉ. शुभा थत्ते , शनिवार , १९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आज तरुण असणारे उद्या वृद्ध होणारच आहेत. काय आहे त्यासाठीचं नियोजन? सक्षम असलेल्या या वृद्धांनी आत्मसन्मानाने जगायला हवं.. त्यासाठी आपल्यातल्या कलागुणांचा त्यांनी वापर करायला हवा. नुकत्याच झालेल्या कुटुंब दिनानिमित्त खास लेख.. सं ख्याशास्त्राच्या आडाख्यांनुसार २०१५ च्या सुमारास भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ९ टक्के लोकसंख्या साठीच्या पुढच्या वृद्धांची असेल व ती दर दशकात वाढत जाईल. १९७० च्या उत्तरार्धात वैद्यकशास्त्रात एक नवी शाखा Geriatrics ही गरजेनुसार सुरू झाली व वयपरत्वे येणाऱ्या बऱ्याच वेगवेगळ्या रोगांचा अभ्यास सुरू झाला. |
आई - बाबा तुमच्यासाठी उषा गिंडे , शनिवार , १९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मराठी माध्यमातील मुले मागे राहतात हा समज खोटा आहे. कठोर परिश्रमाला पर्याय नाही हे बाळकडू मुलांना द्यायला हवे. पाच वर्षांपर्यंत मुलांचे लाड, पुढे १० वर्षे जरूर पडल्यास मुलांना मारायलाही हरकत नाही. मात्र १६ वर्षे होताच मुलांशी मित्रांप्रमाणे वागावे. जेवण, खाणं, कपडेलत्ते यात लाड जरूर करावेत, पण अभ्यासात लाड करून कसे चालेल? मात्र, आपली मुले आदर्श व्हावी असं वाटत असेल तर आपणही आदर्श होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. |
मेघा वैद्य , शनिवार , १९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
स्वच्छतेसाठी लढणाऱ्या नलिनीताई स्वच्छता ही कलाच असल्याचं मानतात. जगात कोणतीही गोष्ट टाकाऊ नसल्याच्या ठाम विश्वासावर त्यांची निर्मल ग्राम संस्था गेल्या ३७ वर्षांपासून कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी झटते आहे. सफाईसाठीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचं मोलाचं कामही नलिनीताई निष्ठेने करत आहेत. सफाईचे संस्कार रुजवण्यासाठी क्षणोक्षणी झटतायत. |
अलकनंदा पाध्ये , शनिवार , १९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपला एखादा दात ठणकत नाही तोपर्यंत त्याचे अस्तित्व आपल्याला कळत नाही. तसेच या बांगडय़ांचे झाले होते. कायम हातात असणाऱ्या बांगडय़ांपैकी एक गायब झाल्यावर हाताकडेच सारखे लक्ष जाऊ लागले. पण डोक्यात प्रश्नकल्लोळ चालूच. अशी कशी हातातील बांगडी जाईल? सिंकमध्ये भांडी धुताना उजव्या हाताकडे माझे लक्ष गेले आणि एकदम दचकले. हातात चार ऐवजी तीनच सोन्याच्या बांगडय़ा दिसल्या. चौथी बांगडी गेली तरी कुठे? वाहत्या नळाखाली हात ठेवून विचारात गढले. |
पूर्वी कमानी , शनिवार , १९ मे २०१२ ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ’ आम्ही आंतरजातीय रजिस्टर लग्न केले. लग्नानंतर मी नोकरी करत होते आणि एक वर्षांनंतर त्याला सरकारी नोकरी लागली. मुले मोठी झाल्यावर मी माझे करियर करावे असे दोघांच्या मते ठरले. मात्र आता मला उमगते आहे, मी त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला. स्वत:चे सेव्हिंग केले नाही. तो मला सध्या वरखर्चालाही पैसे देत नाही. |
शनिवार , १२ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘‘मसाबा शाळेत असतानाही, तिला खवचटपणे विचारणारे कमी नव्हते. तुझ्या आईचे केस सरळ तुझे केस असे का? अशासारख्या प्रश्नांकडे आणि सगळ्याच कुचेष्टांकडे तिने दुर्लक्ष केलं, पण मला, आईच्या हृदयाला ते कायमच जाणवलं. तिचं मन सतत दुखरं व्हायचं. त्या अजाण वयात काय-काय टक्केटोणपे सहन केले असतील हे जाणवून मी आजही खूप दु:खी होते.. माझ्या निर्णयाची झळ तिने सहन केलीय..’’ सांगतेय नीना गुप्ता. माझं पालनपोषण तसं भारतीय पारंपरिक पद्धतीने झालं, पण शिक्षणासाठी मला माझ्या बाबुजींनी सनावर येथील लॉरेंस स्कूलमध्ये पाठवलं. तिथल्या श्रीमंत-गर्भश्रीमंत मुलांमुळे हळूहळू माझी विचारसरणीही थोडीशी आधुनिक म्हणावी अशी होत गेली. |
शनिवार , १२ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
बिलकूल खानाबदोश जिंदगी जगलेल्या शाहीद कपूर आणि त्याची आई नीलिमा अझीम यांनी त्यासाठी प्रचंड संघर्ष केला. नीलिमा यांनी आई म्हणून आपलं कर्तव्य केलं आणि त्याचंच ऋण मानून शाहीद आधुनिक श्रावणबाळ होऊन आता पुत्र कर्तव्य निभावतो आहे.. मैं अपने खयालातों का कहां से आगाज (आरंभ) करूं यह मैं समझ नहीं पा रही हूं..। मातृत्व म्हणजे काय, ते मी कितपत समर्थपणे पेलू शकले.. |
|
|
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 Next > End >>
|
Page 14 of 16 |