अलकनंदा पाध्ये , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मळलेली पायवाट सोडून आदिवासी, मतिमंद मुलांसाठी जव्हार-मोखाडा यासारख्या अविकसित प्रदेशाकडे वळणाऱ्या आणि या मुलांनाही समृद्ध आयुष्य जगण्याचे बळ देणाऱ्या प्रमिलाताई कोकड यांच्याविषयी.. ‘‘स्व त:च्या सुखासाठी प्रत्येक माणूस धडपडतच असतो, पण दुसऱ्यांच्या सुखासाठी काही करण्यातला आनंद बहुमोल असतो,’’ असे प्रमिलाताई कोकड आपल्याला सांगतात तेव्हा त्यांच्याबद्दल कुतूहल दाटून आलं आणि त्यांचा जीवनप्रवास जेव्हा ऐकला तेव्हा तर थक्कचव्हायला झालं. पाच भावंडांतील सर्वात वडील असलेल्या प्रमिलाताईंना पहिल्यापासून कर्णबधिर मुलांबद्दल कायम उत्सुकता वाटे. ते अभ्यास कसा समजून घेतात? समजलेले व्यक्त कसे करतात वगैरे.. त्या दृष्टीने त्यांनी पुण्याच्या टिळक महाविद्यालयात कर्णबधिर शिक्षकांचा अभ्यासक्रम शिकून घेतला. |
नवदुर्गा : |
|
|
शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
नवरात्र, अर्थात दुर्गोत्सव. नवरात्रींच्या या नऊ दिवसांत ही आदिशक्ती नऊ रूपांत प्रकटून दुष्ट प्रवृत्तीचा नाश करते असे मानले जाते. या दुर्गेचे मानवी शक्तिरूप असलेल्या अनेक स्त्रिया आज समाजातल्या दुष्ट प्रवृत्तीविरुद्ध वा व्यवस्थेच्या विरोधात लढत आहेत. त्यांचा हा लढा समाजाच्या भल्यासाठी आहे. असंख्यांसाठी आदर्शवत ठरणाऱ्या देशभरातल्या नवदुर्गाच्या या प्रेरणादायी कहाण्या.. त्या आहेत - डॉ. सुनीता कृष्णन, बीणालक्ष्मी नेप्राम, बीना कालिंदी, अॅड. पल्लवी रेणके, रोशनी परेरा, प्रीती सोनी, सोनी सोरी, तेरेसा रहमान व कौसल्या पेरीयास्वामी.. |
आरती कदम ,शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
वयाच्या पंधराव्या वर्षी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला, पण त्याने उद्ध्वस्त न होता त्यातल्या विखारालाच हत्यार बनवत हैदराबादच्या डॉ. सुनीता कृष्णन यांनी संघटना स्थापन केली ‘प्रज्वला’. वेश्याव्यवसायातल्या ३२०० मुलींना बाहेर काढणाऱ्या आणि वेश्यांच्या ५००० मुलांसाठी शाळा उघडणाऱ्या डॉ. सुनीता यांचा लढा सुरू आहे तो लैंगिक गुलामगिरीविरुद्धचा. दररोज मृत्यूला सामोरं जाणाऱ्या सुनीताच्या या लढय़ाची ही दास्तान..
|
स्वरूप पंडित, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मृत्यूच्या छायेत कुंथत जगण्यापेक्षा धमक्यांना न जुमानता तेजस्वितेचा एकच क्षण जगावा या विचारातूनच जन्माला आलेल्या ‘मणिपूर विमेन गन सव्र्हायवर्स नेटवर्क’ची स्थापना करणाऱ्या बीणालक्ष्मी आता इथल्या हिंसाचाराला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वाचा फोडतात. आपल्या लेखांमधून-भाषणांमधून अगदी संयुक्त राष्ट्रांच्या सभेसमोरही त्या धाडसीपणे राष्ट्रनिहाय आकडेवारी सादर करीत शस्त्रसंधीसाठी आवाहन करतात. त्या मणिपूरच्या बीणालक्ष्मी नेप्राम यांच्या लढय़ाची ही कहाणी.. |
मनीषा सबनीस ,शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पश्चिम बंगालमधल्या पुरुलिया या छोटय़ाशा गावातील शेतमजुराची अकरा वर्षांची मुलगी, बीना. स्वत:च्या बालविवाहाविरुद्ध सुरू झालेला तिचा लढा आता गावातल्या मुलींसाठीही सुरू झाला आहे. एका लढाईचं आंदोलनात रूपांतर करणाऱ्या बीनाच्या लढय़ाची ही गोष्ट. बीना कालिंदी- अकरा वर्षांची साधीसुधी मुलगी. |
मेधा सोमण ,शनिवार,२० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दुर्गापूजा म्हणजे श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती यांची पूजा! श्री महाकाली ही शरीरसामर्थ्यांची देवता आहे. श्री महालक्ष्मी ही धन-धान्य-धैर्य व शौर्य लक्ष्मी आहे, तर महासरस्वती ही विद्येची देवता आहे. घरच्या स्त्रीमध्ये या तिन्ही देवतांचे गुण असायला हवेत. त्यासाठी प्रयत्न करणे हीच दुर्गापूजा. |
शैलजा शेवडे ,शनिवार,२०ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
हे कमलवासिनी, हातात कमल धारण केलेली, अति शुभ्र वस्त्र परिधान केलेली, गंध पुष्पमाला विभूषित आणि सर्व त्रिभुवनाला वैभवसंपन्न करणाऱ्या भगवती विष्णुवल्लभे, तू माझ्यावर प्रसन्न हो.. आई मला शक्ती हवी गं.. आई, जगदंबे, इतके दिवस कसं तुझं साधं, ओळखीचं रूप माझ्या मनात होतं. बुट्टेदार शालू नेसलायस. त्यावर हिरवी चोळी घातलीय. रत्नजडित हार गळ्यात आहे. |
अमिता बडे ,शनिवार,२०ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या भटक्या विमुक्तांना एकत्र आणण्याचं काम ‘लोकधारा’ संस्थेच्या माध्यमातून अॅड. पल्लवी रेणकेने सुरू केलं आहे. आज अठरा राज्यांत सुरू झालेल्या या संस्थेची ती राष्ट्रीय समन्वयक म्हणून काम पाहते. कोल्हाटी समाजासाठी तिनं केलेल्या संघर्षांतूनच महाराष्ट्रात आईच्या नावाने जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेण्यात आला. भटक्या विमुक्तांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या पल्लवीची ही कहाणी.. |
भारती भावसार ,शनिवार, २०ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अनेक घटस्फोटित पुरुषांना केवळ ते वडील आहेत म्हणून मुलांचा ताबा मिळत नाही. मुलांना आईइतकीच वडिलांचीही गरज असते. म्हणूनच पुरुषांचा वडीलपणाचा हक्क अबाधित राहावा आणि मुलांना अस्थिर बालपण मिळू नये म्हणून लढणाऱ्या तसेच घटस्फोटित दांपत्यांच्या मुलींना त्यांचे हक्क मिळवून देणासाठी ‘ऑल इंडिया डॉटर्स प्रोटेक्शन फोरम’ची स्थापना करणाऱ्या बंगळुरूच्या रोशनी परेरा यांच्या लढय़ाची ही गोष्ट.. |
वंदना अत्रे ,शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
स्थानिक भाषा, कला आणि कलाकार पुढील पिढीला माहीत व्हावेत. आपल्या संस्कृतीचं रेडियोच्या माध्यमातून संवर्धन व्हावं यासाठी १४ वर्षे लढा देणारी गुजरातच्या कच्छ मधील प्रीती सोनी. सातवीनंतर शाळा सोडायला लागूनही अथक प्रयत्नाने स्वत:ला ‘सुशिक्षित’ करणारी, पत्रकार होऊन स्थानिक महिलांना त्यांच्या अधिकारांसंबंधी जागरूक करणारी. महिला विकास संघटनेची कार्यकारी संचालिका असणाऱ्या प्रीतीचा हा लढा. |
देवेंद्र गावंडे ,शनिवार,२०ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
छत्तीसगडमधल्या आदिवासींसाठी लढणारी सोनी सोरी पोलिसांच्या लेखी नक्षलवादी आहे. नक्षलवाद्यांच्या वर्तुळात ती पोलिसांची खबरी म्हणून ओळखली जाते तर मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या लेखी सोनी शिक्षिका व समाजसेविका आहे. आज सोनी तुरुंगात आहे, पण एक दिवस बाहेर येऊन आदिवासींसाठीचा आपला लढा चालूच ठेवणार हा तिचा आशावाद पक्का आहे.. |
स्वानंद ओक ,शनिवार,२०ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
वस्तीत शौचालयच नसणे असो की मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी घडवलेलं बनावट हत्याकांड असो, त्याला पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडून जगभरात खळबळ माजवणारी आसाममधील तेरेसा रहमान पूर्वाचलांतील लोकांबाबत, त्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनक्षम आहे. पूर्वाचलाबाबत देशातील लोकांमध्ये असलेले गैरसमज धुऊन काढण्यासाठी आणि त्याच वेळी पूर्वाचलालाही अन्य देशांची ओळख करून देण्यासाठी लेखणीच्या ताकदीने लढणाऱ्या तेरेसा रहमानचा हा लढा.. |
|
|