गैारी कानिटकर , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ही दिवाळी ‘चतुरंग’च्या समस्त सुजाण वाचकांच्या सक्षमीकरणाचा परीघ विस्तारणारी, आत्मभानाच्या तेजाने लखलखणारी, खूप खूप आनंदाची आणि भरभराटीची जावो, ही शुभेच्छा! दिवाळी हा नात्यांचा उत्सव. नातं जोपासण्याचा, नातं दृढमूल करण्याचा, नवीन नाती जोडण्याचा! कुणी नातं जोडतं इतरांशी, कुणी नातं जोडतं स्वत:च निर्माण केलेल्या विश्वाशी, कुणी संगीताशी, तर कुणी निसर्गाशी नातं जोडायची हौस या दिवसांत भागवून घेतो; तर सुजातासारखी माणसं वाचनाच्या निमित्ताने स्वत:शीच स्वत:चं असलेलं नातं अधिक दृढ करण्यात दंग होतात. या दिवाळीला तुम्हीही साजरा करा नात्यांचा उत्सव आणि कुटुंब करा अधिक विस्तारित.. ‘‘या वेळी मी दिवाळीला आपल्या सोसायटीमध्ये रांगोळी स्पध्रेत भाग घेणारेय आणि यावेळी ठिपक्यांची आणि कुंदन रांगोळी अशा दोन्ही विभागांत भाग घेणारेय. तू शिकवशील नं?’’ आठ-नऊ वर्षांची प्रांजली तिच्या आईला, रसिकाला विचारीत होती. |
मंगला गोडबोले , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२ दिवाळीचं शूटिंग संपलं. श्रावण, नवरात्र, दसरा, दिवाळी हे दिवस दूरचित्रवाणी मालिकेच्या पथ्यावर पडले होते. दिवाळीनं पुरता आठवडा घालवला होता. ‘सण इथले संपत नाही’ असं प्रेक्षकाला वाटावं इथपर्यंत एकेक सण तासणं सुरूच. पण आता पुढचा सण कोणता असणं अपेक्षित आहे हे कळेनासं झालं तेव्हा निर्माता गडबडला. आणि सण नाहीत म्हटल्यावर तर तो सणकळलाच. दि वाळीचं शूटिंग संपलं तशी ‘हे सुरांनो चंद्र व्हा..’ या मालिकेचा मालक चिंताक्रांत झाला. याच्या पुढचे एपिसोड भरवायचे कशानं? श्रावण, नवरात्र, दसरा, दिवाळी हे दिवस मालिकेच्या पथ्यावर पडले होते. दसरा तीन एपिसोड पुरला होता, दिवाळीनं पुरता आठवडा घालवला होता. असे सगळे महत्त्वाचे सण पुरवून पुरवून खाऊन झाले होते. तेही जिवाला फार त्रास न करता! सण कोणताही असो, ‘फॉरमॅट’ एकच! तो तो सण येण्यापूर्वी सुमारे महिनाभर मालिकेतल्या पात्रांनी त्याच्याविषयी चर्चा करायची, नवनव्या कल्पना काढायच्या, मग घराची सजावट, मग पात्रांची उत्सवी सजावट, मग गावाकडच्या एखाद्या उपटसुंभ म्हाताऱ्या पात्राचं आगमन, त्याच्या तोंडून त्या सणाचं सांस्कृतिक माहात्म्यकथन, तो ते रंगवून रंगवून सांगत असताना मागे त्या त्या कथाभागाचं नाटय़ीकरण (गोकुळाष्टमीला नायकाने कृष्ण होऊन पुठ्ठय़ाचा गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे, नवरात्रीत नायिकेने माँ दुर्गा होऊन थर्माकोलच्या परशूने दुष्ट खलनायकाला भोसकणे वगैरे वगैरे) मग कट टू डायरेक्ट सण! |
श्री श्री रविशंकर , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दिवाळी हा सण मागील वर्षभरात झालेल्या कुरबुरी आणि नकारात्मकता विसरण्याचा सण आहे. तुम्हाला प्राप्त झालेल्या विवेकावर प्रकाश टाकण्याची आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची, स्वागत करण्याची ही वेळ आहे. ते लाची पणती तेवण्यासाठी त्याची वात तेलात बुडालेली असावी लागते पण त्याचे टोक मात्र तेलाच्या बाहेर असावे लागते. जर वात पूर्णपणे तेलात बुडालेली असली तर ती प्रकाश देऊ शकणार नाही. आयुष्य हे दिव्यातल्या वातीसारखे आहे. तुम्हाला या जगात राहावे लागते, पण त्याच्यापासून अलिप्तही राहावे लागते. जर तुम्ही जगातल्या भौतिक गोष्टींमध्ये पूर्णपणे बुडून गेलात तर तुम्ही जीवनात आनंद आणि ज्ञान मिळवू शकणार नाही. जगात राहूनही त्यातल्या सांसारिक गोष्टीत बुडून गेला नाहीत तरच आनंदाचा आणि ज्ञानाचा प्रकाश पडू शकेल.. दिवाळी आणि प्रकाशाचं वेगळंच नातं आहे. दिवाळी हा पाच दिवसांचा उत्सव काíतक मासाच्या त्रयोदशीला सुरू होतो. पहिला दिवस धनत्रयोदशी, दुसरा दिवस नरक चतुर्दशीचा, तिसऱ्या दिवशी अमावास्येला लक्ष्मी पूजन केले जाते. चौथ्या दिवशी प्रतिपदा म्हणजेच पाडवा आणि त्यानंतर द्वितीयेला असते भाऊबीज. सारे लखलखते दिवस. |
सुचित्रा साठे , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘दीप्य ते दीपयति वा स्वं परं चेति इति दीप:’ स्वत: प्रकाशित होऊन दुसऱ्याला प्रकाशित करणारा दिवा आपल्या तेजाने एकटेपणाची, असाहायतेची, भीतीची जाणीव दूर करून मन प्रसन्न, उल्हसित करतो. कधी तो स्थापित दिवा असतो तर कधी शकुन दिवा, कधी नंदादीप तर कधी पीष्टदिवा, कधी लामणदिवा तर कधी सांज दिवा.. नानाविध नावं धारण करणारा हा दीप म्हणजे शुभशकुनाचं प्रतीक.. उदयाचली रवी आला, उजळत दाही दिशांना.. दिवसरात्रीच्या खोखोत सूर्य डोंगराआडून वर आला की दाही दिशा हलके हलके उजळून निघतात. सुवर्ण प्रकाशाचं साम्राज्य पसरतं. दिवसभर तळपून तो पश्चिम क्षितिजावर मावळतो आणि काळोखाची चादर आसमंतावर अंथरली जाते. या सीमारेषेवर, तिन्हीसांजेला देवापुढे दिवा लावला जातो. ‘तिमिर सरू दे ज्योत उजळू दे’ या भावनेने ‘शुभं करोति कल्याणम्’ अशी प्रार्थना करीत दीप ज्योतीला वंदन केले जाते. ही दीप ज्योत दिवसरात्र अहर्निश तेवून जगाला प्रकाश देत असते. |
प्रफुल्ला मोहिते , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
परदेशात दिवाळी साजरी करताना रक्ताच्या नातेवाईकांबरोबर इतर जातीधर्मांची, देशाची मित्रमंडळीही ही धमाल अनुभवतातच, पण एकटे राहणारे, विद्यार्थी यांनाही जाणीवपूर्वक सामील करून घेतल्याने ही सर्वसमावेशक दिवाळी सांस्कृतिकदृष्टय़ा अधिक प्रगल्भ होत जाते. उमाताईंची सकाळपासून लगबग चालू होती. दिवाळीचा पाडवा कालच झाला. आज भाऊबीज. रोहित-अनुयाचा पहिला दिवाळसण. कालपासूनच अनुयाची आई राहायला आलेली. सासूबाई तर केव्हापासून या मुहूर्ताची वाट पाहतायत, आपल्या नातवाला लाडकी नातसून कधी ओवाळतेय याची! मुहूर्त? भाऊबीजेला? चक्रावलात ना? अहो, उमाताईंचा रोहित राहतोय अमेरिकेत.. अन् हा दिवाळसणही साजरा होतोय तिकडेच. उमातरईच्या मुलीने बरोबर सात वाजता लॅपटॉप उघडला. वेबकॅम चालू केला. ठरलेच होते काल तसे! तिकडून रोहित बोलत होता. अनुयाची धांदल दाखवत होता. साडी नेसून छान सजलेली अनुया. सिल्कच्या शेरवानीतला रुबाबदार रोहित. अनुयाने रोहितला ओवाळले. हजारो मैल दूरच्या आजीने लॅपटॉपवर त्यांची दृष्ट काढली! |
मोहिनी निमकर , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
लग्नानंतरचे ते मंतरलेले दिवस. नव्या नवलाईने मी अहमदाबादला पोहोचले. माझ्या तैनातीसाठी आली होती, ‘थर्टी फाइव्ह ऑस्टिन.’ तिचीच ही धमाल सत्यकथा दिवाळीनिमित्त खास.. १९ ५४ साली माझं मनोहर यांच्याशी लग्न झालं आणि त्यांच्या नोकरीच्या गावी मी पुण्याहून अहमदाबादला गेले. हे तेव्हा कॅलिको मिलमध्ये नोकरी करत होते. गुजरात प्रांत नवीन, त्यामुळे गुजराती भाषा नवीन, अहमदाबाद गाव नवीन. अशा वातावरणात संसार सुरू होणार होता. लग्न होऊन फक्त ८ दिवस झाले होते. आयुष्याचा जोडीदार बरोबर होता. अंगावरच्या कपडय़ांना आणि दागिन्यांना अजून कोरा वास येत होता आणि या सगळ्या कोरेपणाचा सुखद अनुभव घेत मी अहमदाबाद स्टेशनवर उभी होते. स्टेशनवर छोटी छोटी दुकानं होती. त्यावरच्या सगळ्या पाटय़ा गुजराथी भाषेत होत्या. काही वाचता येत नव्हतं. मनोहर ट्रेनमधून सामान काढून घेण्याच्या गडबडीत होते. |
शर्वरी जोशी , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
इवल्याशा पणतीचा इवलासा जीव, त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव.. अशा या छोटय़ाशा पणतीच्या जीवावर सुरू झालेला कुसुमदीदीचा व्यवसाय आता सर्वदूर, पार सातासमुद्रापार गेला आहे. स्वतबरोबर अनेकांच्या कुटुंबांत आर्थिक स्थैर्याचा प्रकाश पसरवणाऱ्या कुसुमदीदींमधल्या समर्थ स्त्रीची ही खास दिवाळी भेट.. ‘‘मि ळवलेले ज्ञान, जोपासलेली कला-कौशल्ये ही जर व्यवसाय म्हणून स्वीकारली तर त्यातून मिळणारा आनंद द्विगुणित होतो. त्याचप्रमाणे आपल्यातली कला आणि कल्पकता जेव्हा आपल्याबरोबरच इतर दहा जणांचे संसार उजळून टाकते तेव्हा त्या आनंदाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.’’ गृहशास्त्र या विषयातून पदवी घेतलेली एक स्त्री जेव्हा तिच्या अनोख्या व्यवसायाबद्दल असे सांगते तेव्हा तिचे केवळ कौतुक वाटत नाही तर तिची ही भरारी अनेकांपर्यंत पोहोचवण्याचे मनोमन ठरवले जाते.
|
संगीता अरबुने , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आयुष्याची रांगोळी रेखताना, काही कटू क्षण कुठेही न सांधता नुसतेच सोडून द्यायचे असतात- रांगोळीतल्या ‘सोडलेल्या’ ठिपक्यांसारखे. आयुष्याच्या रांगोळीची खुमारी त्यामुळेच वाढते! .. रांगोळीचा छंद जोपासता जोपासता अचानक हाती गवसतो तो आनंदाचा घडा, दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा.. आमच्या दोन वाचक मत्रिणींनी पाठवलेल्या या आठवणी.. रांगोळीच्या. खास दिवाळीनिमित्ताने तुमच्याही आठवणी ताज्या करणाऱ्या.. रां गोळी काढायचा माझा छंद बालवयातला. आलेखाच्या पेपरवर ठिपके काढून मी स्वत:च रांगोळी जुळवायचे. अशा किती तरी वह्य़ा मी बनवल्या होत्या. शेजारपाजारच्या मुलीच नाही तर बायकाही त्या घेऊन जायच्या. त्या वेळी सुचलं नाही, नाही तर कवितेऐवजी माझं पहिलं पुस्तक रांगोळीचं आलं असतं. आमच्या गल्लीत मी ‘रांगोळीपटू’ म्हणून प्रसिद्ध झाले होते, पण या रांगोळी काढण्यातला आनंद मात्र मला हवा तसा घेता आला नाही, कारण आमचं घर तसं बोळात. पायरीसमोरच रस्ता, जेमतेम दहा फूट रुंदीचा, त्यामुळे आजोबा दहादा बजावायचे, खूप फापटपसारा करू नका. नावाला रांगोळी घाला. अर्धा तासही राहणार नाही ती; पण आम्हा दोघी बहिणींचा उत्साह दांडगा. त्यांची सूचना डावलून आम्ही ३०-३० ठिपक्यांच्या रांगोळ्या काढायचो. |
डॉ. सुजाता जोशी-पाटोदेकर , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आयुष्याची रांगोळी रेखताना, काही कटू क्षण कुठेही न सांधता नुसतेच सोडून द्यायचे असतात- रांगोळीतल्या ‘सोडलेल्या’ ठिपक्यांसारखे. आयुष्याच्या रांगोळीची खुमारी त्यामुळेच वाढते! .. रांगोळीचा छंद जोपासता जोपासता अचानक हाती गवसतो तो आनंदाचा घडा, दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा.. आमच्या दोन वाचक मत्रिणींनी पाठवलेल्या या आठवणी.. रांगोळीच्या. खास दिवाळीनिमित्ताने तुमच्याही आठवणी ताज्या करणाऱ्या.. ब दलत्या काळानुसार, सणावाराचं रूपही झपाटय़ानं बदलत चाललंय. सणांचे आता ‘इव्हेंट’ झालेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये!.. प्रायोजित कार्यक्रम, शोभायात्रा, जाहिरातींनी खचाखच भरलेल्या दैनिकांच्या लठ्ठ आवृत्त्या आणि शुभमुहूर्त साधून, घराच्या भौतिक श्रीमंतीमध्ये पडणारी भर- वर्षांतील कुठल्याही महत्त्वाच्या सणाला प्राप्त झालेलं हे बाह्य़रूप. पण याखेरीजही सणासुदीचं अद्याप टिकून राहिलेलं मनोहर रूप म्हणजे, दारी उमटणारी प्रसन्न रांगोळी!.. इतर सर्व गोष्टींपेक्षा सणाचं रांगोळीशी जडलेलं विलोभनीय नातं मला नेहमीच मोहवून टाकतं. |
सई कोरान्न्ो-खांडेकर , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आजच्या डाएट कॉन्शस वातावरणात दिवाळीचे पदार्थ खाणं अनेक तरुणींसाठी यक्षप्रश्न निर्माण करतात, पण ते खाल्ल्याशिवाय दिवाळीची गंमत ती काय! म्हणूनच आपल्या आधुनिक स्वयंपाकघरात आणि ‘डाएट’मध्ये बसणाऱ्या; लहान-मोठे सगळ्यांना आवडणाऱ्या सोप्या बेक्ड करंज्या आणि तिखट-मिठाचे नमकपारे. यंदाच्या दिवाळीतला हा डाएट फराळ.. मा झं लग्न दसऱ्याच्या दिवशी झालं. मधुचंद्राहून परत येईपर्यंत दिवाळी उजाडली. स्वयंपाकाची मला आधीपासूनच आवड होती. शिवाय रोजचे पदार्थ करायची सवय होतीच; थोडे-फार बेकिंगसुद्धा करून माहीत होते. परंतु दिवाळीचा फराळ कधीच केला नव्हता, किंबहुना फराळाचे पदार्थ करायला मला उगीच भीती वाटायची. घरातल्या स्त्रियांना विविध स्वरूपाचे पाक करताना मी पहिले होते आणि ‘एवढं अवघड काम आपल्याला नक्कीच जमणार नाही’ म्हणून त्याच्याकडे कधी लक्ष दिले नव्हते. सुरुवात कशी करायची आणि काय करायचे हे सुचेना. माझ्या सासूबाई ओल्या नारळाच्या अतिशय उत्कृष्ट करंज्या करतात- बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ आणि ओलसर. |
अभिजीत घोरपडे , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दिवाळीची परिमाणं बदललेली असताना आपणसुद्धा त्यानुसार काही बदल करणार का? निदान आवाज आणि मोठय़ा प्रमाणात धूर करणाऱ्या फटाक्यांना तरी आपण फाटा देणार का? हा महत्त्वाचा सवाल आपल्या सगळ्यांच्याच समोर ठाकलेला आहे.. करा विचार. दि वाळीचा सण आता पूर्वीचा उरलेला नाही. पंचवीस-तीस वर्षांपूर्वीचा विचार केला तर दिवाळीत रोषणाईची आणि उत्सव साजरा करण्याची साधनं मर्यादित होती. त्यामुळे फटाके आणि दिवाळी यांचा घट्ट संबंध होता. म्हणून तर इवलीशी टिकली आणि लवंगी फटाका यांच्यातही मोठा आनंद होता. पण आता सारीच परिमाणं बदलली आहेत. फटाक्यांची सुरुवातच होते- हजाराच्या लडी, अतिशय आकर्षक बाण, अॅटम बॉम्बपासून. त्यांचा शेवट कुठे होतच नाही. त्याचा परिणाम म्हणजे कानठळ्या बसविणाऱ्या आवाजापासून ते गुदमरून टाकणाऱ्या हवेच्या भयंकर प्रदूषणापर्यंत समस्यांची वाढच झाली आहे.
|
माधुरी ताम्हणे , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२ अंधार-प्रकाशाच्या खेळाला लोकांनी धर्म आणि अधर्म, दुष्ट आणि सुष्ट प्रवृत्ती यांचे प्रतीक बनवले. दुष्ट प्रवृत्तींचा पराजय होऊन सुष्ट, सात्त्विक प्रवृत्तींचा जय होतोच ही संकल्पना रुजवण्यासाठी त्यांनी प्रकाशाला विजयाचे, पावित्र्याचे आणि मांगल्याचे प्रतीक बनवले. म्हणूनच पृथ्वीतलावावरील देशोदेशी तेजाचा हा वैश्विक उत्सव उत्साहाने साजरा होतो. जगभरात कुठे कुठे आणि का साजरा केला जातो दीपोत्सव.. सू र्यचंद्राच्या दीप्तिमान प्रकाशाने उजळलेल्या पृथ्वीतलावावरील लोकांना या तेजाचे अप्रूप अतिप्राचीन आहे. खंड कोणताही असो, देश कोणत्याही खंडातील असो, त्या तेजाच्या प्रभेला त्यांनी उत्सवी रूप दिले आणि तेजाने तेजाची आरती करावी, तशी पणत्या, मेणबत्त्यांनी त्यांनी या तेजाला वंदन केले.
|
|
|