लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


थर्टी फाइव्ह ऑस्टिन Print E-mail

alt

मोहिनी निमकर , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
लग्नानंतरचे ते मंतरलेले दिवस. नव्या नवलाईने मी अहमदाबादला पोहोचले. माझ्या तैनातीसाठी आली होती, ‘थर्टी फाइव्ह ऑस्टिन.’ तिचीच ही धमाल सत्यकथा दिवाळीनिमित्त खास..
१९ ५४ साली माझं मनोहर यांच्याशी लग्न झालं आणि त्यांच्या नोकरीच्या गावी मी पुण्याहून अहमदाबादला गेले. हे तेव्हा कॅलिको मिलमध्ये नोकरी करत होते. गुजरात प्रांत नवीन, त्यामुळे गुजराती भाषा नवीन, अहमदाबाद गाव नवीन. अशा वातावरणात संसार सुरू होणार होता. लग्न होऊन फक्त ८ दिवस झाले होते. आयुष्याचा जोडीदार बरोबर होता. अंगावरच्या कपडय़ांना आणि दागिन्यांना अजून कोरा वास येत होता आणि या सगळ्या कोरेपणाचा सुखद अनुभव घेत मी अहमदाबाद स्टेशनवर उभी होते. स्टेशनवर छोटी छोटी दुकानं होती. त्यावरच्या सगळ्या पाटय़ा गुजराथी भाषेत होत्या. काही वाचता येत नव्हतं. मनोहर ट्रेनमधून सामान काढून घेण्याच्या गडबडीत होते.
 
उत्सव दिव्यांचा : इवल्याशा पणतीचा .. Print E-mail

alt

शर्वरी जोशी , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
इवल्याशा पणतीचा इवलासा जीव, त्योच घेई परि समद्या  अंधाराचा ठाव..  अशा या छोटय़ाशा पणतीच्या जीवावर सुरू झालेला कुसुमदीदीचा व्यवसाय आता सर्वदूर, पार सातासमुद्रापार गेला आहे. स्वतबरोबर अनेकांच्या कुटुंबांत आर्थिक स्थैर्याचा प्रकाश पसरवणाऱ्या कुसुमदीदींमधल्या समर्थ स्त्रीची ही खास दिवाळी भेट..
‘‘मि ळवलेले ज्ञान, जोपासलेली कला-कौशल्ये ही जर व्यवसाय म्हणून स्वीकारली तर त्यातून मिळणारा आनंद द्विगुणित होतो. त्याचप्रमाणे आपल्यातली कला आणि कल्पकता जेव्हा आपल्याबरोबरच इतर दहा जणांचे संसार उजळून टाकते तेव्हा त्या आनंदाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.’’ गृहशास्त्र या विषयातून पदवी घेतलेली एक स्त्री जेव्हा तिच्या अनोख्या व्यवसायाबद्दल असे सांगते तेव्हा तिचे केवळ कौतुक वाटत नाही तर तिची ही भरारी अनेकांपर्यंत पोहोचवण्याचे मनोमन ठरवले जाते.

 
छंद रांगोळीचा Print E-mail

alt

संगीता अरबुने , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आयुष्याची रांगोळी रेखताना, काही कटू क्षण कुठेही न सांधता नुसतेच सोडून द्यायचे असतात- रांगोळीतल्या ‘सोडलेल्या’ ठिपक्यांसारखे. आयुष्याच्या रांगोळीची खुमारी त्यामुळेच वाढते! ..  रांगोळीचा छंद जोपासता जोपासता अचानक हाती गवसतो तो आनंदाचा घडा, दिवाळीचा आनंद  द्विगुणित करणारा.. आमच्या दोन वाचक मत्रिणींनी पाठवलेल्या या आठवणी.. रांगोळीच्या. खास दिवाळीनिमित्ताने तुमच्याही आठवणी ताज्या करणाऱ्या..
रां गोळी काढायचा माझा छंद बालवयातला. आलेखाच्या पेपरवर ठिपके काढून मी स्वत:च रांगोळी जुळवायचे. अशा किती तरी वह्य़ा मी बनवल्या होत्या. शेजारपाजारच्या मुलीच नाही तर बायकाही त्या घेऊन जायच्या. त्या वेळी सुचलं नाही, नाही तर कवितेऐवजी माझं पहिलं पुस्तक रांगोळीचं आलं असतं. आमच्या गल्लीत मी ‘रांगोळीपटू’ म्हणून प्रसिद्ध झाले होते, पण या रांगोळी काढण्यातला आनंद मात्र मला हवा तसा घेता आला नाही, कारण आमचं घर तसं बोळात. पायरीसमोरच रस्ता, जेमतेम दहा फूट रुंदीचा, त्यामुळे आजोबा दहादा बजावायचे, खूप फापटपसारा करू नका. नावाला रांगोळी घाला. अर्धा तासही राहणार नाही ती; पण आम्हा दोघी बहिणींचा उत्साह दांडगा. त्यांची सूचना डावलून आम्ही ३०-३० ठिपक्यांच्या रांगोळ्या काढायचो.
 
ठिपके रांगोळीचे Print E-mail

alt

डॉ. सुजाता जोशी-पाटोदेकर , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आयुष्याची रांगोळी रेखताना, काही कटू क्षण कुठेही न सांधता नुसतेच सोडून द्यायचे असतात- रांगोळीतल्या ‘सोडलेल्या’ ठिपक्यांसारखे. आयुष्याच्या रांगोळीची खुमारी त्यामुळेच वाढते! ..  रांगोळीचा छंद जोपासता जोपासता अचानक हाती गवसतो तो आनंदाचा घडा, दिवाळीचा आनंद  द्विगुणित करणारा.. आमच्या दोन वाचक मत्रिणींनी पाठवलेल्या या आठवणी.. रांगोळीच्या. खास दिवाळीनिमित्ताने तुमच्याही आठवणी ताज्या करणाऱ्या..
ब दलत्या काळानुसार, सणावाराचं रूपही झपाटय़ानं बदलत चाललंय. सणांचे आता ‘इव्हेंट’ झालेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये!.. प्रायोजित कार्यक्रम, शोभायात्रा, जाहिरातींनी खचाखच भरलेल्या दैनिकांच्या लठ्ठ आवृत्त्या आणि शुभमुहूर्त साधून, घराच्या भौतिक श्रीमंतीमध्ये पडणारी भर- वर्षांतील कुठल्याही महत्त्वाच्या सणाला प्राप्त झालेलं हे बाह्य़रूप. पण याखेरीजही सणासुदीचं अद्याप टिकून राहिलेलं मनोहर रूप म्हणजे, दारी उमटणारी प्रसन्न रांगोळी!.. इतर सर्व गोष्टींपेक्षा सणाचं रांगोळीशी जडलेलं विलोभनीय नातं मला नेहमीच मोहवून टाकतं.
 
उत्सव दिव्यांचा : फराळाची मांदियाळी Print E-mail

alt

सई कोरान्न्ो-खांडेकर , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आजच्या डाएट कॉन्शस वातावरणात दिवाळीचे पदार्थ खाणं अनेक तरुणींसाठी यक्षप्रश्न निर्माण करतात, पण ते खाल्ल्याशिवाय दिवाळीची गंमत ती काय! म्हणूनच आपल्या आधुनिक स्वयंपाकघरात आणि ‘डाएट’मध्ये बसणाऱ्या; लहान-मोठे सगळ्यांना आवडणाऱ्या सोप्या बेक्ड करंज्या आणि तिखट-मिठाचे नमकपारे. यंदाच्या दिवाळीतला हा डाएट फराळ..
मा झं लग्न दसऱ्याच्या दिवशी झालं. मधुचंद्राहून परत येईपर्यंत दिवाळी उजाडली. स्वयंपाकाची मला आधीपासूनच आवड होती. शिवाय रोजचे पदार्थ करायची सवय होतीच; थोडे-फार बेकिंगसुद्धा करून माहीत होते. परंतु दिवाळीचा फराळ कधीच केला नव्हता, किंबहुना फराळाचे पदार्थ करायला मला उगीच भीती वाटायची. घरातल्या स्त्रियांना विविध स्वरूपाचे पाक करताना मी पहिले होते आणि ‘एवढं अवघड काम आपल्याला नक्कीच जमणार नाही’ म्हणून त्याच्याकडे कधी लक्ष दिले नव्हते. सुरुवात कशी करायची आणि काय करायचे हे सुचेना. माझ्या सासूबाई ओल्या नारळाच्या अतिशय उत्कृष्ट करंज्या करतात- बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ आणि ओलसर.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 37