सुहास सरदेशमुख , औरंगाबाद - शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
य माई, येडाई, सटवाई, यल्लम्मा, यल्लुआई, येडेश्वरी, रेणुका अशी देवीची अनेक रूपे. दर्शन साधारण दोन प्रकारे होते. काही ठिकाणी देवीची अष्टभूजा मूर्ती असते, तर काही ठिकाणी तांदळा रूपात दर्शन होते. असे का? मूर्ती किंवा तांदळा, असा एकच प्रकार देवींच्या मंदिरांमध्ये का दिसून येत नाही? देवीचरणी हजेरी लावणाऱ्या भक्तांच्या मांदियाळीत काही प्रश्नांची उत्तरे मिळतात, तर काही प्रश्नांची उत्तरे इतिहासकारांनी भाषिक अंगाने पूर्वीच सोडवून ठेवली आहेत. नवरात्रात तृतीयपंथी जोगते महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांची यात्रा करतात, तर मुंबईतील ग्रँटरोड भागातील महिलांचीही मोठी गर्दी असते. असे का? याचे उत्तर नवनिर्माणाच्या शक्तीत दडले आहे. रेणुकेची आख्यायिका बऱ्याच गोष्टी अधोरेखित करते.
|
शनिवार, २० ऑक्टोबर २०१२ ब्रिटिश लेखिका हिलरी मँटेल यांनाच दुसऱ्यांदा ‘बुकर पारितोषिक’ मिळाल्याचे गेल्या मंगळवारी जाहीर झाले, तेव्हा अनेक भारतीय वाचकांच्या भुवया उंचावल्या. याचे एक कारण म्हणजे, एकाच लेखिकेच्या कादंबरी-त्रयीपैकी पहिल्या कादंबरीला (वूल्फ हॉल) बुकर पारितोषिक मिळाले असताना दुसऱ्याही कादंबरीला मिळणे, हा प्रकार विक्रम वगैरे खुशाल ठरो, पण तो औचित्याला धरून नाही. या औचित्यभंगाची चर्चा तर ब्रिटिश वाचकांमध्येही आहे.
|
सुहास सरदेशमुख , औरंगाबाद - शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२
आईच्या दरबारात आल्यावर ‘राजा असो वा रंक’ जोगवा मागतोच. ‘पाच घरी मीठ-पीठ मागून त्या शिध्यातून चरितार्थ भागविण्याची तयारी असावी एवढी लीनता अंगी दे,’ अशी प्रार्थना करतो. ज्या पात्रात जोगवा मागायचा ते पात्र म्हणजे परडी. बांबूच्या कामठीची वीण घट्ट बांधणाऱ्या नागनाथ सावंतांचा भाव नवरात्रात चांगलाच वधारलेला असतो, कारण परडी बनविणारे कुशल कारागीर आता फारसे राहिले नाहीत. सावंतांच्या घरी आता हिरवे बांबू भिजत घातलेले असतात, कारण बांबूच्या कामटय़ा कराव्या लागतात. त्यासाठी घरातील इतर सदस्यही मदत करतात. नवरात्रात परडीची विक्री मोठय़ा प्रमाणात होते. |
सुहास सरदेशमुख, औरंगाबाद, गुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२
कवडी हे देशभर मातृदेवतेचे प्रतीक म्हणून मिरविले जाते, मग देवीचे ठाणे कोणतेही असो. कवडीची लाखोंची उलाढाल होते. पण या कवडीच्या व्यवसायात असणाऱ्यांची मात्र बऱ्याचदा फरफट होते. तुळजापुरात पापनाशनगर ही झोपडपट्टी. शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला. सिमेंटच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसक्या घरांची रांग. खातूनबी आणि नाजूरबी तेथे राहतात. खातूनबीचे वय डोळ्यांतील मोतीबिंदूंचा हिरवा रंग सांगून जातो. |
सुहास सरदेशमुख , औरंगाबाद
तुळजापूरच्या पायथ्याशी असणाऱ्या सिंदफळ गावात राहणारे मेंढपाळ गजेंद्र लांडगे यांचे घर कुडाचे. घरातील पाटी कोणाचेही सहज लक्ष वेधून घेते - ‘बिनडागाचा अजाबळी’! महानवमी दिवशी त्यांच्या घरातून बळीचा बकरा वाजत-गाजत जातो. त्याला कोणतीही जखम होऊ नये म्हणून घरातील सर्व सदस्य काळजी घेतात. बळीचा बकरा बिनडागाचा असावा, व्यंग असू नये यासाठी वयाच्या पंचाहत्तरीत लांडगे विशेष लक्ष देतात. नुकतेच त्यांनी पोलीस ठाण्यात अर्ज करून अजाबळीच्या मिरवणुकीची परवानगी मागणाऱ्या अर्जावर अंगठा उठविला.
|
भीष्मराज बाम
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुलगी, बहीण, आई, पत्नी.. स्त्रीशी असलेल्या अशा साऱ्या नात्यांचा पदोपदी अपमान करण्यासाठी धार्मिक श्रद्धांवर आधारलेल्या रूढींचा वापर सर्रास होत राहातो. काहीजण तर याही पुढे जाऊन स्त्रीचे अस्तित्वच संपवू पाहणारे. देवीने आपले बळ अशांविरुद्ध वापरले पाहिजे.. |
सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२
‘इंडिया टुडे’च्या इंग्रजी वेबसाइटवर १५ जून २०१२ रोजी एक वृत्तलेख झळकला, तो हा.. जसाच्या तसा मराठीत. भिंद्रनवाले किंवा इंदिरा गांधींचे मारेकरी यांना मोठे करण्याचे काही गटांचे प्रयत्न कसे पद्धतशीरपणे सुरू आहेत, याची इशाराघंटाच चार महिन्यांपूर्वी वाजली होती.. अमृतसरच्या सुवर्णमंदिरात दरवर्षी ६ जून हा दिवस ऑपरेशन ब्ल्यू स्टार कारवाईत बळी पडलेल्यांचे स्मरण करण्यासाठी पाळण्यात येतो.
|
भीष्मराज बाम - बुधवार, १० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
वेळ मिळत नाही म्हणून व्यायाम वा अन्य प्रकारची साधना करता येत नाही.. किंवा वेळ मोकळा इतका आहे की, मनात घोळणाऱ्या विचारांमुळे त्रासून जायला होते, ही दोन्ही टोके टाळली पाहिजेत. वेळ आणि विचार यांची सांगड घातली गेली पाहिजे.. मागल्या लेखात नैसर्गिक प्रेरणांना, ओढीला आवर घालायला हवा हे लिहिले होते ते बहुतेकांना पटलेले दिसते. कारण मला अनेकांनी विचारले आहे की, हे कसे करायचे? अष्टांग योगच मुळात यासाठी सांगितलेला आहे. पण सुरुवातीला तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान ही क्रियायोगाची त्रिसूत्री अमलात आणायला हवी. आपोआपच चित्ताचे भरकटणे कमी होते आणि आनंदाचा भाव मनात उमटायला लागतो, कारण मनाचे क्लेशही कमी व्हायला लागतात.
|
ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
चीनकडून भारतीय हद्दीत होणारी घुसखोरी ही चीनचे वाढते राजकीय प्रभुत्व आणि भारताचे प्रभुत्व कमी करणे याचे संकेत आहेत.... ‘सीमांच्या रक्षणासाठी लष्कर पूर्णपणे सज्ज असल्यामुळे १९६२ च्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही,’ अशी ग्वाही लष्करप्रमुख जनरल विक्रमसिंग यांनी २१ सप्टेंबरला पत्रकार परिषदेत दिली. १९६२ ची पुनरावृत्ती करणे कोणत्या देशाला शक्य होईल काय, या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले. अशी पुनरावृत्ती होणार नाही याची ग्वाही मी लष्करप्रमुख म्हणून देशाला देतो.
|
शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
साहित्याच्या ‘नोबेल पारितोषिका’ची घोषणा येत्या गुरुवारी होण्याची शक्यता असल्याने नोबेलच्या जुगाराला आणखी जोर चढला आहे. हा जुगार चालतो, यात नवे काही नाही. ‘लॅडब्रोक्स’ या ब्रिटिश बेटिंग उद्योगाची जी वेबसाइट आहे, तिथे साहित्याच्या नोबेलबद्दल लागणाऱ्या बोलींची चर्चा होणे हेही एकविसाव्या शतकात नवे राहिलेले नाही.लॅडब्रोकवरल्या जुगाऱ्यांचा कल कोणत्या नावाच्या मागे आहे, याची बातमी हल्ली दरवर्षी दिली जाते आणि ‘अमक्याला यंदा कौल’ अशी आयती जाहिरात होते. त्यात अर्थ असतोच, असे नाही.
|
भीष्मराज बाम - बुधवार, ३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
भूतकाळातल्या चुकांचा शोक, वर्तमानात जे नाही त्याची अतृप्ती आणि ते भविष्यकाळात मिळवण्याची ओढ आणि अज्ञात भविष्याकडे वाटचाल करण्याची भीती हे सारे आपल्याला दुर्बळ करून टाकते.. नेमबाज अर्जुन असो की राल्फ शूमान; त्याला हे कळणे महत्त्वाचे! नातवंडाबरोबर खेळत असताना बेल वाजली. कोण आले आहे ते पाहायला मी पटकन दार उघडले. आलेली व्यक्ती नुसतेच एक पत्र देऊन निघूनसुद्धा गेली. पण नातवाने जे भोकाड पसरले ते थांबवायला बराच वेळ जावा लागला. दार उघडण्याचे काम हे त्याचे एकटय़ाचे होते. ते मी करून त्याचा फार मोठा अपमान केला होता.
|
जयानंद मठकर, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
माजी आमदार काँग्रेसची विश्वासार्हता १९६७ पासून रसातळालाच जात असताना, भाजपही जनमानसातील विश्वास टिकवू शकलेला नाही. उलट हे दोन्ही पक्ष म्हणजे ‘एकाच नाण्याच्या दोन बाजू’ अशी जनधारणा बळावते आहे. या दोन पक्षांना पर्यायी ठरणारी राजकीय शक्ती अन्य पक्षांच्या एकत्रीकरणातून येऊ शकत नाही हे ओळखून आता नागरिकांनीच आंदोलनांकडे वळण्याची गरज आहे..
|
|
|