संकलन: विद्याधर कुलकर्णी ,शनिवार, २९ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एचआयव्ही हा नुसता शब्द जरी ऐकला तरी अंगावर सरकन काटा येतो. नव्हे, प्रत्येकाला भीतीच वाटू लागते. हा शब्द जेव्हा आपल्याला नीटसा समजलादेखील नाही, त्या काळापासून म्हणजे गेल्या दीड दशकापासून एचआयव्हीबाधित मुलांच्या संगोपनासाठी ‘मानव्य’ ही संस्था काम करीत आहे. एचआयव्हीची बाधा झाली म्हणजे मरण हे अटळच. अशा मुलांची काळजी घेणारे हक्काचे घर हे त्यांचे मरण सुसह्य व्हावे यासाठी सातत्याने धडपड करीत होते. मात्र आता वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक प्रगती ही एचआयव्हीबाधित मुलांसाठी वरदान ठरू लागली आहे. त्यांच्यावरील वैद्यकीय उपचार महागडे असले तरी मानव्य संस्थेतील मुलांवर वेळच्या वेळी उपचार केले जातात.
|
संकलन: सुहास बांदल ,शुक्रवार , २८ सप्टेंबर २०१२
‘आमची वॉटरबँक आणि तिच्या कमांडमध्ये असणारी तब्बल २० एकरांची गर्द वनशेती ३००० ते ५००० लहान-मोठय़ा जनावरांना आणि त्यांच्याबरोबर येणाऱ्या ३०० ते ५०० माणसांना वर्षभर पुरेल एवढे पाणी आणि नैसर्गिक सावलीयुक्त निवारा पुरवण्यास समर्थ आहेत. सध्या ५ कोटी लिटर पाणी बँकेत आहेच शिवाय आणखी ३ कोटी लिटर पाणी या वनशेतीने निर्माण केलेल्या जमिनीच्या स्पंजाने शोषून ठेवलेले आहे. तेही उपलब्ध होणार आहेच. तेव्हा कोणत्याही संस्थांनी पुढे येऊन खुशाल चारा छावण्या सुरू कराव्यात.
|
अरुण, सुमंगला यांचा मुलगा राहुल, सुमंगलाची आई असे २६ वर्षांपूर्वी इथे रहायला आले. अरुणचे वडीलही प्रा. रं. प्र. देशपांडे कृषिशास्त्रज्ञच होते. अरुणचं शालेय शिक्षण सोलापूर आणि पुणे येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या कृषी महाविद्यालयात झाले. शाळेत असल्यापासून अरुण विज्ञानछांदिष्ट आणि खटपटय़ा. पुण्याचा जुना बाजार हेच त्याचे विद्यापीठ. पुढे त्याचे लाडके गुरू प्रा. बी. के. धोंडे यांनी कृषी अभियांत्रिकीचे वेड लावलं. इतकं की राष्ट्रीयीकृत बँकेतली अधिकाऱ्याची नोकरी सोडून म्हणजे सुखासीन पांढरपेशा कायमचा सोडून धोंडे सरांबरोबर शेती अवजारं व यंत्र यांचे संशोधन.
|
संकलन : प्रशांत मोरे, गुरुवार, २७ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
हजारो वर्षांपूर्वी बंदर आणि आधुनिक काळातही देशातील एक मुख्य जंक्शन रेल्वे स्थानक अशी ख्याती असणारे कल्याण शहर स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुण्याप्रमाणेच सांस्कृतिक घडामोडींचे एक प्रमुख केंद्र आहे. एके काळचे सुभे कल्याण आता काळानुरूप आमूलाग्र बदलले असले तरी नव्या महानगराचे रूप धारण केलेल्या या शहरातील नागरिकांनी मनात मात्र गावकीच्या परंपरा कसोशीने जपल्या आहेत.
|
संकलन : विनायक करमरकर, बुधवार, २६ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ही गोष्ट आहे ऐंशी वर्षांपूर्वीची. कधीकधी फार मोठय़ा कार्याची सुरुवात एखाद्या अगदी छोटय़ा घटनेतून झालेली असते. भावे गुरुजींनी सुरू केलेल्या ‘रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह’ या कामाची सुरुवातही अगदी छोटय़ा वाटणाऱ्या प्रसंगाने झाली. रुग्णसेवेचे काम स्वातंत्र्यसैनिक द. प्र. भावे गुरुजींनी १९३२मध्ये सुरू केले, तेव्हा ‘निघाले युरीन पॉट वाटायला’ अशा शब्दांत समाजाकडून गुरुजींची हेटाळणी व्हायची; पण रुग्णसेवेचा वसा घेतलेले गुरुजी कधीच नाउमेद झाले नाहीत. |
संकलन: अनिकेत साठे ,मंगळवार, २५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मानसिकदृष्टय़ा अपंग मुलांचे विश्वच वेगळे. सभोवतालची जाणीव बुद्धय़ांकावर अवलंबून असल्याने त्यांच्या अनेक कल्पनाही अस्पष्ट. काही ठराविक बाबींचे त्यांना होणारे आकलन समजून घेत त्यांच्या जाणिवा वाढवून, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य नाशिकची ‘घरकुल परिवार संस्था’ करत आहे. अवघ्या सहा वर्षांच्या वाटचालीत संस्थेने राज्यभरातील अशा २५ मुलींना ‘घरकुल’मध्ये सुरक्षितता व मायेची ऊब दिली.
|
संकलन: मोहन अटाळकर, सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मेळघाटला कुपोषणाचा शाप लागलेला. रोजगाराची अपुरी साधने आणि त्यामुळे आदिवासींची होणारी ससेहोलपट त्यांनी पाहिलेली. त्यांच्यासाठी थेट कृतीतून काही तरी करावे असा संकल्प एका दाम्पत्याने केला आणि नागरी सुखसुविधांना सोडून ते मेळघाटातल्या एका छोटय़ाशा गावात दाखल झाले. आदिवासींमध्ये नवी उमेद निर्माण करून त्यांच्या परंपरागत कलाकुसरीला मानाचे स्थान मिळवून देण्याचे काम या दाम्पत्याने दोन दशकांपूर्वी सुरू केले.
|
शनिवार २२ सप्टेंबर २०१२
छगन भुजबळ हे एखाद्या चालत्या राजकीय व्यंगचित्राप्रमाणेच असावेत असं स्वत:ला एकदा वाटलं असल्याची कबुली सलमान रश्दी यांनी आपल्या ‘आत्मचरित्रा’त दिल्याची बातमी शुक्रवारी प्रेस ट्रस्टनं दिली होती. रश्दी १९८७ साली ‘चॅनेल फोर’साठी भारतात आले तेव्हा राजकीय नेत्यांपैकी एकटय़ा भुजबळांचीच (तेव्हा शिवसेना) मुलाखत घेऊ शकले होते, हा उल्लेख सोडल्यास बाकी पुस्तकात महाराष्ट्राबद्दल फार काही नाही.
|
साईधाम वृद्धाश्रम, खिडकाळी संकलन, प्रशांत मोरे, शनिवार, २२ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एकत्र कुटुंब संस्कृती कितीही आदर्श आणि हवीहवीशी वाटत असली तरी धकाधकीच्या जीवनात अनेक कारणांनी ही पद्धत जशीच्या तशी अनुसरणे अनेकांना अशक्य असते. अपुरी जागा, विसंवाद, प्रायव्हसीचे आकर्षण, जबाबदारी नाकारण्याची वृत्ती, पिढीतील अंतरामुळे उद्भविणारे मतभेद आदी विविध कारणांमुळे वृद्ध मातापित्यांना अथवा सासू-सासऱ्यांना एखाद्या आश्रमात ठेवण्याचा पर्याय नवी पिढी मोठय़ा प्रमाणात स्वीकारताना दिसू लागली आहे.
|
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे संकलन, अनिकेत साठे, शुक्रवार, २१ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
इतिहास संशोधनातून वर्तमानकाळात जगण्याची प्रेरणा मिळावी आणि भविष्यकाळ कसा असावा याचा वेध घेता यावा, अशी जिज्ञासा असणाऱ्या प्रत्येकाची तृष्णा धुळे येथील इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळास भेट दिल्यास पूर्ण होईल, इतकी दुर्मिळ अन् विपूल ग्रंथसंपदा येथे उपलब्ध आहे. इतिहास संशोधनाच्या या मंदिरात ज्ञानोपासनेची साधने पाहिल्यास संपूर्ण देशात अपवादाने एखाद्या संस्थेकडे इतक्या दुर्मिळ व ऐतिहासिक दस्तावेजांचा खजिना आढळून येईल.
|
वाचनसंस्कृतीची समृद्ध परंपरा बुधवार, १९ सप्टेंबर २०१२
आपल्या महाराष्ट्राला ज्ञानसाधनेची दीर्घ व संपन्न परंपरा आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला वेदशास्त्रं वा पुराणांच्या पोथ्यांपलीकडे जाऊन इथे पाश्चात्य राजकीय-सामाजिक विचारांबाबत येथील समाजात चर्चा-वाद घडू लागले. ग्रंथवाचन किंवा ग्रंथसंग्रह ही मूठभरांची मिरासदारी न राहता ज्ञानलालसा व ज्ञानसाधना समाजाच्या विविध थरांमध्ये झिरपू लागली आणि ही गरज भागवण्यासाठी ग्रंथालय या संस्थेचा उदय अपरिहार्य ठरला. मुंबई, ठाणे, पुणे, भिवंडी, रत्नागिरी, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी इत्यादी प्रमुख ठिकाणी ग्रंथालये निर्माण झाली.
|
डॉ. गिरधर पाटील, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२
किराणा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीला वाव दिल्याने भारतातील शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी विनाकरण हाकाटी पिटण्यात येत आहे. वस्तुत: अशा प्रकारच्या गुंतवणुकीमुळे साठवण, वितरण, वाहतूक, प्रतवारी, प्रक्रिया क्षेत्रात असंख्य रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून ग्रामीण भागाचे एकंदरीतच जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे, असे ठाम प्रतिपादन करणारा लेख..
|
|
|