भीष्मराज बाम -
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
वेळ फुकट जातो, याचे कारण आवड आणि नावड अनाठायी जपली जाते.. आळस, व्यसन किंवा प्रमाद यांमध्ये निघून जाणारा वेळ वाचवायचा असेल, तर आधी आवड आणि नावड बाजूला ठेवून काय चांगले नि काय वाईट, हे ओळखायला हवे! संध्याकाळी पोहण्याचे सत्र संपल्यावर प्रशिक्षकाने जाहीर केले की, दुसऱ्या दिवशीपासून सकाळी सहा वाजता योगासनांचे वर्ग होणार. नागपूरचे योगाचार्य जनार्दन स्वामी स्वत: वर्ग घ्यायला येणार आहेत. सर्वानी हजर राहणे सक्तीचे आहे. जे येणार नाहीत त्यांना इतर कोणतेही खेळ खेळायला मिळणार नाहीत. आमच्यापैकी बहुतेक जण अगदी खट्टू झाले. कारण उन्हाळ्याची सुट्टी होती.
|
सोमवार, १० सप्टेंबर २०१२
‘भारतीय शेतकऱ्यांचा मी कर्मचारी’ ही बांधीलकी मानणाऱ्या व्हर्गिस कुरियन यांना ‘दुधाच्या महापुरा’चं महत्त्व जगालाच काय, भारतालाही पटवून देणं अवघड होतं.. त्या कष्टांची ही झलक, व्हर्गिस कुरियन यांच्याच शब्दांत.. ऑक्टोबर १९६८मधली रोमची ती भेट अजूनही माझ्या पक्की स्मरणात आहे. एकूण २४ देशांचं प्रतिनिधित्व असलेल्या डब्ल्यूएफपीच्या कार्यकारी समितीपुढे ‘एनडीडीबी’च्या प्रकल्पाचा प्रस्ताव मला मांडायचा होता.
|
सोमवार, १० सप्टेंबर २०१२
डॉ. व्हर्गिस कुरियन यांनी आपल्या देशात सहकारी दुग्धव्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या प्रयत्नातून धवलक्रांती झाली. त्यांनी राबवलेल्या ऑपरेशन फ्लडचा तो दृश्य परिणाम होता. ‘मिल्कमॅन ऑफ इंडिया’ असे सार्थ नामाभिधान त्यांना मिळाले. त्यांनी काही अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीतून अमूल दूध उद्योग सुरू केला. त्यांच्या या दुग्धव्यवसाय प्रारूपास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली होती.
|
शनिवार, ८ सप्टेंबर २०१२
हे पुस्तक प्रचंड वेगानं खपतं आहे.. त्याच्या तब्बल तीन कोटी १० लाख प्रती जगभर विकल्या गेल्या आहेत आणि अजूनही विकल्या जाताहेत.. ‘दा विन्ची कोड’ किंवा ‘हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज’ या पुस्तकांचे खपाचे विक्रम हे पुस्तक नक्कीच मोडणार, असा बोलबाला सुरू आहे ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ या ई. एल. जेम्स लिखित कादंबरीचा. जेम्स ब्रिटिश आणि ‘फिफ्टी शेड्स’चं कथानक मात्र अमेरिकेत- सिएटलमध्ये घडतं. एक कॉलेजकन्या आणि एक तद्दन पैसेवादी, यशवादी बिझनेसबॉस (आडनाव ग्रे) यांच्या लैंगिक स्वैराचाराला प्रेम कसं म्हणता येईल, याची ही कथा.
|
भीष्मराज बाम, बुधवार, ५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गुण्यागोविंदाने नांदणारी आणि पाहुण्यालाही परके न मानणारी घरे, काश्मीरसारखे भूतलावरील नंदनवन किंवा ‘गुंडांचे गाव’ म्हणून कुख्यात असलेले एखादे गाव.. सारेच पालटू शकते.. बदल घडणारच, प्रश्न आहे तो निवडीचा!.. हैदराबादला आमच्या एका मित्राचा मोठा वाडा होता. एकत्र कुटुंब असल्याने घर सतत गजबजलेले असे. दिवाळीला त्यांच्या घरी जायला मला फार आवडे.
|
दिगंबर रा. तळेकर - सोमवार, ३ सप्टेंबर २०१२ कला दिग्दर्शक (चित्रपट कामगारांच्या एका संघटनेचे पदाधिकारी)
चित्रपट कामगारांच्या संघटना या तिच्या सभासदांच्या रास्त व न्याय्य मागणी व प्रश्नांचा पाठपुरावा न करता सभासदाची अडवणूक कशी होईल असे वर्तन करतात तेव्हा या क्षेत्रातही राजकारण व राजकारण्यांचा प्रवेश सुकर होतो. अश्याने चित्रपट कामगारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकी ऐवजी राजकारणशरणतेला वाव मिळतो हे वास्तव अधोरेखित करणारी कैफियत.. मुंबईतील मल्टीफ्लेक्सचा आणि ‘भारतीय’ या मराठी चित्रपटाचा वाद नुकताच वृत्तपत्रातून वाचला.
|
सुनील चावके, शुक्रवार, ३१ ऑगस्ट २०१२
‘समय से पहले और मुकद्दर से जादा कभी कुछ नही मिलता’, असे विलासराव देशमुख नेहमी म्हणायचे. पण दिल्लीत आल्यानंतर कदाचित त्यांचाच या तत्त्वज्ञानावरचा विश्वास उडाला असेल. दिल्लीच्या राजकारणात त्यांचे ‘समय से पहले’ आगमन झाले आणि पात्रतेला साजेशी संधी मिळविण्यातही त्यांचे ‘मुकद्दर’ अपयशी ठरले. जवळजवळ तीन दशके महाराष्ट्राच्या राजकारणात आपले वलय निर्माण करणारे विलासराव उदासीन काँग्रेसश्रेष्ठी आणि सतत प्रतिकूल होत जाणाऱ्या परिस्थितीमुळे दिल्लीच्या राजकारणात अवघ्या तीन वर्षांंत लयाला गेले. अवजड उद्योगासारख्या मोडीत निघालेल्या मंत्रालयासह दिल्लीच्या राजकारणात विलासरावांची एंट्री झाली आणि बिनखात्याचे मंत्री म्हणून त्यांची दुर्दैवी एक्झिट झाली. कार्यक्षम आणि कर्तृत्ववान नेतृत्वाची कदर दिल्लीने ठेवली नाही..
|
हर्षवर्धन पाटील, शुक्रवार, ३१ ऑगस्ट २०१२ (संसदीय कार्य तथा सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य)
देशमुखसाहेबांच्या मंत्रिमंडळात मला दोन वेळा कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अल्पमतात सरकार असताना सर्वाना बरोबर घेऊन राज्यात त्यांनी सरकार लोकाभिमुख केले. अनेक खात्यांचा कार्यभार माझ्याकडे असताना सांस्कृतिक खाते त्यांनी माझ्याकडे दिले. महाराष्ट्रातील लोककलांचा व कलेचा त्यांना आदर होता. एकेकाळी त्यांनीही सांस्कृतिक खाते सांभाळले होते. संसदीय कार्यमंत्रीपदी माझी वर्णी लावून विधानसभा कामकाजाचा एक अभ्यासपूर्ण व व्यापक अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला त्यांनी मिळवून दिला.
|
भीष्मराज बाम, बुधवार, २९ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
निसर्गानं १६ ते २४ या वयोगटाला शक्ती देऊ केली आहे. ती वापरली जाते की नाही, हा भाग प्रत्येकावर अवलंबून असतो. ज्यांनी ती वापरली नाही त्यांनीही ‘आता वय गेलं रे..’ म्हणण्याचं काही कारण नाही.. युवक कोणाला म्हणावे याचा सरकारी निकष ३५ वर्षांवरून ३० वर्षांपर्यंत खाली आणला गेल्याचे कळले. युवक म्हणून सरकारी कृपेचा वर्षांव आता ३० वयापर्यंतच होणार. पण निसर्गाची कृपा मात्र २४ वयापर्यंतच होत असते. तोपर्यंत विद्यार्थीदशा संपवून नोकरी-धंदा यांपैकी जो काही व्यवसाय करायचा असेल, त्याला सुरुवात व्हावी अशी अपेक्षा असते.
|
राजेंद्र येवलेकर - सोमवार, २७ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
चांद्रविजयाची साहसकथा ही मानवाला असलेल्या मर्यादांचा भंग करणारी होती, चंद्रावरील अवतरणाने माणसाची विज्ञाननिष्ठा प्रबळ झाली त्याचबरोबर विज्ञान-तंत्रज्ञानातील त्याची कुशलता प्रत्यक्ष वास्तवतेच्या कसोटीवर खरी उतरली. या साहसकथेतील नायक होता अमेरिकेचा चांद्रवीर नील आर्मस्ट्राँग. रविवारी त्याने जगाचा निरोप घेतला असला तरी पुढच्या पिढय़ांसाठी त्याची कामगिरी चंद्रज्योतीप्रमाणे मार्गदर्शक ठरणार आहे.
|
भीष्मराज बाम - बुधवार, २२ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एका वेळी एकच भूमिका समर्थपणे जगण्याची क्षमता क्रीडा क्षेत्राप्रमाणेच इतर सर्व क्षेत्रांत तितकीच उपयोगी पडते. भूमिकांची सरमिसळ होऊ न देण्याची कला साधली तर जीवनात यशाची बाजू वरचढ ठरते आणि जगण्यातला खरा आनंद मिळतो. कुठल्या भूमिकेला इतर कोणत्या भूमिकांची जोड द्यायची हे आपण ठरवू शकतो, पण ध्येयाकडे जाण्यासाठी असो की हातातले काम नीट करण्यासाठी असो.. त्याच कामाकडे सारे लक्ष देणे महत्त्वाचे!
|
अ. पां. देशपांडे - सोमवार, २० ऑगस्ट २०१२
ख्यातनाम स्ट्रक्चरल इंजिनीअर व महाराष्ट्र विज्ञान परिषदेसह अनेक संस्थांशी संबंधित असलेले डॉ. चिंतामणी मोरेश्वर पंडित यांचे शुक्रवार दिनांक १० ऑगस्ट, २०१० रोजी चेन्नई येथे हृदयविकाराने निधन झाले. आपल्या व्यवसायातून विचारपूर्वक निवृत्ती स्वीकारून समाजकार्यात योगदान देण्याचा निर्णय परोपरीने अमलात आणून त्यांनी एक वस्तूपाठ घालून दिला. १२ सप्टेंबर १९३२ रोजी जन्मलेले डॉ. पंडित बीई (सिव्हिल) झाले आणि नंतर पश्चिम जर्मनीत जाऊन त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनीअिरगमध्ये पीएच.डी. केली.
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>
|