बुधवार, १५ ऑगस्ट २०१२
अमेरिकेचे मुंबईस्थित वाणिज्यदूत पीटर हास यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘लोकसत्ता’साठी लिहिलेले टिपण.. भारताचा ६५वा स्वातंत्र्यदिन आज साजरा होत असताना, लोकशाहीच्या सशक्त परंपरा जपणाऱ्या आणि राजकीय बहुविधतेचा आदर करणाऱ्या भारतासारख्या जागतिक शक्तीला जग दाद देते आहे. अमेरिकेचा मुंबईस्थित वाणिज्य दूतावासही आमच्या भारतीय मित्र व सहकाऱ्यांच्या साथीने हा प्रसंग साजरा करताना भारताची अहिंसक स्वातंत्र्यचळवळ, सहिष्णुतेच्या पायावर या देशाची झालेली उभारणी आणि कायद्याचे राज्य आणून या देशाने विविध समाजांना दिलेले सातत्यपूर्ण संरक्षण यांचे स्मरण करू इच्छितो.
|
भीष्मराज बाम - बुधवार, १५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने ‘आजवरची सर्वाधिक’ पदके पटकावल्याचा आनंद मानायचा की आत्मपरीक्षण करायचे? तशी सुरुवात या निमित्ताने झाली, तरी भरपूर.. ऑलिम्पिकच्या निमित्ताने अनेकांचे लक्ष खेळांकडे वळले. अर्थात त्यात क्रीडा क्षेत्राशी संबंध नसणारेच असंख्य होते. त्यांना पडणारे प्रश्नही क्रीडा क्षेत्राशी फारसे संबंधित नव्हते. माझ्या एका स्नेह्याने मला विचारले, ‘हे ऑलिम्पिक सुवर्णपदक जे देतात ते खऱ्या सोन्याचे असते का?’ एका समारंभाच्या वेळी याबाबत चर्चा झाली होती.
|
भीष्मराज बाम, बुधवार, ८ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सरावासाठी संयम, निवडलेल्या खेळ-प्रकारावर निष्ठा आणि त्यासाठी शारीरिक ताकद कमावण्याची वृत्ती हे गुण भारताच्या खेळाडूंकडे होते, म्हणून ऑलिम्पिक पदके मिळाली.. ती आणखी का नाहीत? हाच प्रश्न आहे. अलीकडेच एका चांगल्या मेळाव्याला जाण्याचा योग आला. ज्यांची चित्रे आणि स्वाक्षऱ्या आपल्या संग्रही असाव्यात असे वाटायला लावणारे बरेच जण होते. उज्ज्वल भविष्याची आपापल्या क्षेत्रामध्ये ग्वाही देऊ शकतील असेही तरुण होते. सध्या हवा ऑलिम्पिक स्पर्धाची असल्याने मला गराडा पडला.
|
वृत्तसंस्था , ह्य़ूस्टन - मंगळवार, ७ ऑगस्ट २०१२
नासाची ‘क्युरिऑसिटी’ ही रोव्हर गाडी भारतीय प्रमाणवेळेनसुार सोमवारी सकाळी अकरा वाजता सुखरूपरीत्या मंगळावर उतरली आणि जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीत वैज्ञानिकांनी एकच जल्लोष केला. या प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या वैज्ञानिकांनी रात्रीचा दिवस करून तयार केलेली ही एक टन वजनाची गाडी मंगळावर उतरवणे हा मानवी समुदायाने तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचा एक अनोखा आविष्कार होता. पृथ्वीचा सहोदर असलेल्या लाल रंगाच्या मंगळावर जीवसृष्टीला पोषक परिस्थिती अब्जावधी वर्षांपूर्वी होती की नाही याचा शोध या मोहिमेत घेतला जाणार आहे.
|
अतुल देऊळगावकर - सोमवार, ६ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
काही देशांत भयंकर अवर्षण तर काही देशांत भीषण महापूर अशा ‘चरम हवामान काळात ’ (एज ऑफ एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्स)आपण जगत आहोत. ऐन पावसाळ्यात दर्शन देऊन ढग निघून जातात. मेघांचे भौतिकशास्त्र समजून घेऊन पाणी असणाऱ्या ढगांकडून पाऊस पाडून घेण्यासाठी ६० वर्षांपासून अथक प्रयत्न चालू आहेत. पज्र्यन रोपण (क्लाऊड सीडिंग), पर्जन्य निर्माण (रेन मेकिंग), हवामान बदल (वेदर मॉडिफिकेशन)चे जगभर प्रयोग चालू आहेत.
|
भीष्मराज बाम - बुधवार, १ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आकाशतत्त्व हे ईश्वराचे कान.. ॐकारच नव्हे, तर मुंग्यांचे उंकारही ऐकणारे.. अहंभाव गळून जावा, यासाठीच आकाशतत्त्वाची साधना महत्त्वाची ठरते.. दिल्लीमधल्या माझ्या आठवणी बऱ्याचशा संगीताशी निगडित आहेत. मी दिल्लीमध्ये नेमणुकीवर होतो तेव्हा बाबा आमटे आणि साधनाताई बरेच दिवस दिल्लीत होते. बाबांचे मेहुणे डॉक्टर सदाफळ यांच्याकडे त्यांचा मुक्काम असे. माझाही बराच वेळ सदाफळांकडेच जात असे.
|
अनिकेत साठे - सोमवार, ३० जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
चीनने या वर्षी आपल्या लष्करी खर्चात ११ टक्क्यांनी वाढ करून तो तब्बल १०६ बिलियन डॉलरवर नेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जागतिक पटलावर त्याचे वेगवेगळ्या स्वरूपांत तरंग उमटत आहेत. लष्करी प्रयोजनावर प्रचंड खर्च करणाऱ्या राष्ट्रांच्या यादीत अमेरिकेनंतर त्याचे दुसरे स्थान आहे. चीनच्या तरतुदीमुळे भारताच्या चिंतेत किती वाढ झाली आहे ते अलीकडेच सिंगापूर येथे झालेल्या संरक्षण परिषदेत दिसून आले. चीनच्या भरमसाट लष्करी तरतुदीमुळे आशिया खंडात शस्त्रास्त्र स्पर्धा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वाढीस लागणार आहे.
|
|
|
|
रविवार, २९ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
प्रतिभावंत साहित्यिक, शिवप्रेमींच्या तीन पिढय़ांना शिवचरित्रात न्हाऊ घालणारे अफाट वक्तृत्वाचे धनी, नकलाकार, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, कवी, संघटक, दानशूर समाजसेवक, साने गुरुजी कथामालेतील कथाकथनकार, स्वातंत्र्यसैनिक आणि विविध प्रकल्प व दुर्बल व्यक्तींचे आधारस्तंभ असलेले इतिहास संशोधक ब. मो. तथा बाबासाहेब पुरंदरे येत्या २९ जुलै २०१२ रोजी वयाची नव्वदी ओलांडत आहेत.
|
रविवार, २९ जुलै २०१२
जंक्यताऱ्यावरचे त्यांचे व्याख्यान ऐकताना मला असे वाटले की त्या लढाईच्या वेळी परत आलेले पुरंदरे हे एक सैनिकच असावेत! केवळ पुस्तके लिहून ते थांबले नाहीत तर शिवचरित्र त्यांच्या वाणीतून सारखे निथळत असे. पैसे देऊन व्याख्याने ऐकणे ही नवीन परंपरा त्यांनी महाराष्ट्रात निर्माण केली. सतत २५ वर्षे एकाच विषयाचा ध्यास घेऊन कार्य करीत राहणारी माणसे कमी आढळतात. |
अॅड. आनंद देशपांडे ,रविवार, २९ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
साडेतीनशे वर्षांपूर्वी समर्थानी छत्रपती संभाजीमहाराजांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, ‘शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप..’ त्यानुसार पुढची साडेतीनशे वर्षे महाराष्ट्र शिवरायांच्या रूपाला आठवत आणि पुतळय़ांच्या स्वरूपात साठवत राहिला. त्यांच्या पराक्रमाचे तपशील मिळवून, हुडकून त्यावर कथा, कादंबऱ्या आणि पोवाडे रचत राहिला. नि:संशय हेही काम मोठे होते. पण या साऱ्या व्यापातून शिवकार्याचे नेमके वर्तमानात असलेले मोल, त्याचा संदेश आणि या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यामध्ये असणारे पाथेय याकडे मात्र दुर्लक्ष झाले. |
वीणा देव ,रविवार, २९ जुलै २०१२
बाबासाहेब आणि गोनीदा - मैत्री इतिहास व भूगोलाची !
नागपंचमी. तिथीप्रमाणे बाबासाहेबांचा वाढदिवस. अलीकडे झालंय असं, की आमच्या मनात त्या तिथीचे हा सोडून बाकी सर्व संदर्भ मागे पडलेत. या वर्षी तर ते एक्याण्णवाव्या वर्षांत पदार्पण करणार. केवढा आनंद उसळेल! मागे ते पंचमीला विश्वामबागवाडय़ात असत. आता पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या त्यांच्या घरात असतात. ते घर, परिसर माणसांनी ओसंडत असतो. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>
|