डॉ. सदाशिव शिवदे ,रविवार, २९ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
शिवशाहीर बाबासाहेबांनी गेल्या वर्षी ९० व्या वर्षांत पदार्पण केलं, त्यानिमित्ताने ‘जडण-घडण’ मासिक आणि सह्य़ाद्री प्रकाशनानं पुण्यात आयोजित केलेला कार्यक्रम माझ्यासारख्या असंख्य शिवभक्तांच्या आयुष्यातील कधीही न विसरण्याजोगी संध्याकाळ होती. चाफ्याच्या फुलांचा घमघमाट, ऐतिहासिक काळात घेऊन जाणारे व्यासपीठ, त्यावरील तुळजाभवानीची भव्य मूर्ती, जुने खांब, कवडय़ाच्या माळांनी होणारं मान्यवरांचं स्वागत अन् जोडीला गोंधळ्यांनी भंडारा उधळत वाजवलेला संबळ.. |
किरण ठाकूर ,रविवार, २९ जुलै २०१२ अध्यक्ष, लोकमान्य सोसायटी
मंगळवार, २४ जुलै २०१२ पुण्यात दुपारी बाबासाहेबांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलो. त्यांना ९० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी आयुष्यभर शिवचरित्रासाठी केलेला संघर्ष बेळगाव आणि सीमाभागातील मराठी भाषकांच्या मनात शिवचरित्राच्या माध्यमातून फुलविलेले स्फुल्लिंग आणि ‘जाणता राजा’ महानाटय़ाच्या माध्यमातून बेळगावातील आमच्या काही संस्थांना दिलेले सहकार्य हे सगळं मनात आठवत आठवत पुरंदरे वाडय़ातून बाहेर पडलो. तोच दुपारनंतर समजले की, कर्नाटक विधानसभेने मला आणि ‘तरुण भारत’ ला त्रास देण्यासाठी हक्कभंगाचे शस्त्र उपसण्याचे ठरविले आहे. |
माउली शिरवळकर ,रविवार, २९ जुलै २०१२ (शब्दांकन - रसिका मुळ्ये)
लहानपणापासून बाबासाहेबांच्या वाडय़ातच खेळलो. आमचे नाते हे वडील-मुलासारखे, ते नेमके कधी आणि कसे जुळले, ते सांगता येणार नाही! त्यांचे ऐटबाज वागणे, बोलणे, लांब दाढी, करारीपणा, त्यांची घोडय़ावरची रपेट या सगळ्याची लहानपणापासूनच भुरळ पडली होती. लहानपणापासून बाबासाहेब मला शिवाजी महाराजांचे प्रतिरूपच वाटत आले आहेत. |
राजमाता सुमित्राराजे भोसले ,रविवार, २९ जुलै २०१२ अध्यक्षा, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे षष्टय़ब्दीपूर्ती समिती, सातारा
।। श्री आदिशक्ती तुळजाभवानी।। ।। जय शिवराय।। ।। स्वस्ति श्री शिवराज्य शके ३१० श्रावण शुद्ध एकादशी शुक्रवार ।। अखंडित लक्ष्मी अलंकृत सकलगुणालंकरण राजमान्य राजश्री श्रीमंत शिवयोगी शिवशाहीर बळवंतराव मोरेश्वरराव तथा बाबासाहेब पुरंदरे यांसी |
पांडुरंग बलकवडे ,रविवार, २९ जुलै २०१२ शिवचरित्राचा आणि मराठशाहीचा चालता बोलता इतिहास म्हणजे बाबासाहेब पुरंदरे होय! शिवभक्तीने भारावलेल्या या अवलियाने आपल्या ९० वर्षांच्या आयुष्यात ‘राजा शिवछत्रपती’सारखा अद्वितीय ग्रंथ, ‘जाणता राजा’सारखे महानाटय़ आणि आपल्या ओघवत्या वाणीतील हजारो शिवचरित्र व्याख्यानांच्या माध्यमातून देशभरातच नव्हे तर जगभरात शिवचरित्राचा अखंड जागर केला. त्यांच्या या शिवभक्तीची कुळकथाही तितकीच वेधक आहे. |
शनिवार, २८ जुलै २०१२ एकदिवसीय सामन्यात जावेद मियाँदादने चेतन शर्माच्या अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकून पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता. त्यावेळी त्या सामन्याचे रसभरीत वर्णन अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाले होते.
|
भीष्मराज बाम, बुधवार, २५ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गती आणि हालचाल नियंत्रण करणारे वायुतत्त्व हे जितके संहारक आहे तितकेच जीवसृष्टीच्या निर्मितेत ते प्राणरूप धारण करते. सारी इंद्रिये, मन व वाणी त्याच्याच आधारावर कार्य करतात. स्पर्शाने त्याची अनुभूती मिळते.. गेल्या वर्षी अमेरिकेत असताना ‘इरिन’ या नावाचे तुफानी वादळ अॅटलान्टिक समुद्रावरून घोंघावत आले. त्यामुळे आमच्या वास्तव्याच्या शेवटल्या आठवडय़ाच्या कार्यक्रमाची पार वाताहत झाली. आफ्रिकेपासून हे वादळ निघाले आणि शक्तिमान होत अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर येऊन आदळले.
|
पन्नालाल सुराणा - सोमवार, २३ जुलै २०१२
देशाचे अर्थकारण सतत गतिमान ठेवण्यासाठी अनेक घटक व बाबी एकमेकांना साकारी ठराव्या लागतात. एकटय़ा सरकारच्या हवाली सर्वकाही ठेवून किंवा तशी अपेक्षा बाळगून चालणार नाही. नेमक्या याच गोष्टीचा विसर पडताना दिसतो. नवनव्या वस्तू व सेवांना मागणी वाढायची तर जास्तीत जास्त लोकांच्या हातातील क्रयशक्ती वाढली पाहिजे.
|
भीष्मराज बाम - बुधवार, १८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पृथ्वीतत्त्वाचे महत्त्व तिच्यातील धारणशक्तीने अधोरेखित होते. पृथ्वीतत्त्वाचा अंश खऱ्या अर्थाने वृक्षांमध्ये संक्रमित झाल्याची प्रचीती येते. याचसाठी वृक्षाला सृष्टीच्या निर्मितिप्रक्रियेचे मूर्तरूप समजले जाते. वृक्षराजींनी नटलेल्या पृथ्वीच्या दर्शनाचे ध्यान म्हणूनच आनंददायी असते.. एका उन्हाळय़ात काही दिवस पाचगणीला राहायचा योग आला. तिथे एक मोठे पठार आहे. मी पहाटे उठून त्या पठारावर फिरायला जात असे. पूर्व दिशेला काही खडक होते.
|
मिलिंद कोकजे - सोमवार, १६ जुलै २०१२
‘दक्षता’ मासिक नावारूपाला आणणारे, मुंबई पोलिसांचा इतिहास लिहिणारे आणि अनेक गुन्हेगारांची ‘कुंडली’ माहीत ठेवून तपासात या माहितीचा योग्य वापर करणारे अरविंद पटवर्धन अलीकडेच निवर्तले. माजी साहायक पोलीस आयुक्त या पदाच्या पलीकडचे एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले. समाजातील अनेक घटकांना पटवर्धन यांचे मोठेपण का जाणवे, याबद्दलच्या या काही व्यक्तिगत नोंदी..
|
भीष्मराज बाम, बुधवार, ११ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पाणी केवळ तहान भागवत नाही. ते आपल्याला आणखीही खूप काही देते..स्नेह, ओलावा, शांती, शीतलता, तृप्ती.. पाण्याकडून आपण, नेहमी प्रवाही राहण्याची शक्तीदेखील घ्यायला हवी!.. पुण्याला जायचे असले म्हणजे मी आवर्जून पु. ल. देशपांडय़ांकडे फोन करीत असे. भाई -सुनीताताई या रसिक आणि विद्वान जोडप्याच्या संगतीत एखादी सकाळ वा संध्याकाळ घालवायला मिळणे म्हणजे आनंदाची पर्वणीच असे. त्या दिवशी तर सारेच शुभयोग जुळून आले असावेत.
|
यशवंत सुमंत - सोमवार, ९ जुलै २०१२ राज्यशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ
प्रा. राम बापट यांच्या निधनाने ‘फार मोठा विचारवंत, विद्वान आणि मोठा माणूस काळाच्या पडद्याआड गेला’ अशी सार्वत्रिक सार्थ प्रतिक्रिया उमटली. अभ्यासक, प्राध्यापक, मार्गदर्शक, समीक्षक अशा विविधांगांनी बापटसरांनी आयुष्यभर एक ज्ञानयज्ञ चालविला होता.. २ जुलै २०१२ ! पहाटे चार वाजता विवेक पुरंदरेचा फोन. बापट गेले. एक जीवघेणी विषण्णता आणि मी नि:शब्द झालो. बापटसरांचे जाणे तसे अनपेक्षित नव्हते. ८१ वय, पार्किन्सन अल्झायमर.. मार्ग स्पष्टच होता.
|
|
|