बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
प्रसिद्ध व्यक्तींना कधीकधी कुणी ओळखत नाही, याचा राग न येता हसू येते! स्वतला नीट ओळखू शकलेल्या या व्यक्ती असतात.. आम्ही मुंबईत होतो तेव्हा, बाबा आमटय़ांचा फोन आला. ‘माझे एक मित्र कॅन्सरने आजारी आहेत, त्यांना भेटायला मी संध्याकाळच्या फ्लाईटने येतो आहे. मी एकटाच आहे, तुमच्याकडेच उतरेन.’ मला आणि माझ्या पत्नीला अस्मान ठेंगणे झाले.
|
प्रशांत कुलकर्णी, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
राष्ट्रपती भवनात १११ व्यंगचित्रकार प्रथमच जमले होते आणि आदरांजलीपासून निषेधापर्यंतचे सर्व रंग या भेटीत होते. त्याचा हा वृत्तान्त.. या वर्षभरात व्यंगचित्रं आणि व्यंगचित्रकार अत्यंत चुकीच्या कारणांसाठी गाजत होते. कुणाच्या तरी व्यंगचित्रांवर मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेतला. कुठल्या ५०-६० वर्षांपूर्वीच्या व्यंगचित्रांवरून कुणी तरी संपूर्ण देशाचा अमूल्य वेळ वाया घालवला व व्यंगचित्र आक्षेपार्ह ठरवून ती नकोतच अशी भूमिका घेतली, तर कुठल्या तरी व्यंगचित्रकाराला डायरेक्ट तुरुंगातच टाकलं!!
|
सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
दिल्लीच्या प्रेस क्लबमध्ये व्यंगचित्रकार कुट्टी यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनाची तयारी आम्ही काही व्यंगचित्रकार मित्र करत होतो. ती व्यंगचित्रे प्रामुख्याने ‘आनंद बाजार पत्रिका’ आणि ‘आजकल’ या बंगाली दैनिकांतील होती. ती पाहून तिथे असणारा एक बंगाली पत्रकार एकदम भावनावश झाला. आम्हाला सांगू लागला, ‘मी लहानपणापासून कुट्टी यांची व्यंगचित्रं पाहतोय. आम्हा बंगाली पत्रकारांच्या दोन तीन पिढय़ा कुट्टी यांची व्यंगचित्रं पाहातच वाढल्या आहेत.
|
शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२ जयपूरला भरणारा ‘लिटरेचर फेस्टिव्हल’ गेल्या सहा वर्षांत बराच प्रसिद्ध झाला आहे. इतका की, जानेवारीच्या अखेरच्या दिवसांत कुणी टूरिस्टसारखा न दिसणारा, पण परराज्यातला प्रवासी सवाई माधोसिंग रस्त्यावर चलायचं म्हणाला की रिक्षावालाच विचारतो, ‘उस मेलेमें जाना है?’ पण मुंबईतही ‘लिट फेस्ट’ भरतो आणि त्याचंही यंदा तिसरं वर्ष आहे, याची कल्पना बऱ्याच मुंबईकरांना नाही!
|
भीष्मराज बाम - बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सतत बदलणाऱ्या परिस्थितीचे भान राखून आपला तोल ढळू न देता योग्य तेच प्रतिसाद देता यायला हवेत. भवताल वा माणसे आपल्याला बदलता येत नाहीत, पण स्वतमध्ये बदल घडवणे कष्टसाध्य असते. माझी भोपाळला बदली झाली तोपर्यंत मला मुंबईची चांगलीच सवय झालेली होती. मुंबईला पहिल्यांदा आलो तेव्हा या इतक्या बहुरंगी आणि बहुढंगी शहराची कोणाला सवय होऊ शकेल असे वाटले नव्हते. कॅडबरी, गोदरेज यांसारख्या परिचित ब्रॅण्डच्या कंपन्यांची नावे वाचून नव्याने मुंबईत येणाऱ्या खेडय़ातल्या पाहुण्याला जसे नवल वाटले असेल तसे ते आम्हालाही वाटले होते.
|
विलास गिते, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२
साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुनील गंगोपाध्याय यांनी बंगाली प्रेमकवितेला नवीन आयाम दिला; तर कादंबऱ्यांमधून तत्कालीन कोलकात्याचे व त्यातील मध्यमवर्गीय तरुण-तरुणींच्या विश्वाचे विलक्षण चित्र रेखाटले. नुकतेच सुनीलबाबूंचे निधन झाले. या असामान्य लेखकाची, बंगाली साहित्याच्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ अभ्यासकाने करून दिलेली ओळख.. बहुप्रसव, दर्जेदार आणि लोकप्रिय या तीनही निकषांवर उतरणारे लेखक फार कमी असतात. सुनील गंगोपाध्याय हे बंगाली लेखक अशा दुर्मीळ लेखकांपैकी एक होते. दोनशेपेक्षा अधिक पुस्तके लिहिणारे सुनीलबाबू २००८पासून साहित्य अकादमीचे अध्यक्षही होते.
|
गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२ धनादेश पुढील संस्थांच्या नावे काढावेत.
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर मराठी विज्ञान परिषद इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह (सोलपूर) शाखा, पुणे किंवा पेशंटस् रिलीफ असोसिएशन (सोलापूर)
|
भीष्मराज बाम ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
उत्सव साजरे करणे म्हणजे व्रतस्थ राहणे, सत्य व न्यायावर निष्ठा वाढवणे. आपल्या दुर्गुणांशी, लोभाशी, मोहाशी संघर्ष करायचा हे तर आपलेच काम आहे, ते न करता देवाने मात्र आपल्यावर दयाच दाखवावी, अशी अपेक्षा करणे पोरकटपणाचे आहे.. आपण भारतीय उत्सवप्रिय आहोत. वसंत आणि शरद हे दोन ऋतू उत्सवाचे आहेत. वसंत ऋतूत होळी आणि रंगपंचमी हे सार्वजनिक साजरे करायचे सण. पण शरद ऋतूतल्या सणांचा दिमाख जास्त. कारण सुगीचे दिवस असतात.
|
बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२ धनादेश पुढील संस्थांच्या नावे काढावेत.
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर मराठी विज्ञान परिषद इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह (सोलपूर) शाखा, पुणे किंवा पेशंटस् रिलीफ असोसिएशन (सोलापूर) कल्याण गायन समाज संपूर्ण बांबू केंद्र, लवादा, मेळघाट मानव्य
|
सुहास सरदेशमुख , औरंगाबाद - मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
दररोज होणाऱ्या भरमसाट अभिषेकांमुळे तुळजापुरातील देवीच्या मूर्तीची सच्छिद्रता वाढते आहे. काही अंशी मूर्तीची झीज होत आहे. या पुरातत्त्व विभागाच्या अहवालाकडे आता दुर्लक्ष झाले आहे. आजही अभिषेक होतात, ते वाढावेत असा प्रयत्न पुजारी करतात. त्यांचा चरितार्थ भागतो, पण प्रश्न कायम आहे. देवीची मूर्ती महत्त्वाची की अभिषेक? उत्तर कोणी देईल का? रूढिपरंपरेत अर्थकारण येतेच. ते कोणालाच बाजूला करता येणार नाही. पण किमान सचोटीने काही प्रयोग नव्याने करता येतील. तुळजापूर, कोल्हापूर, रेणुकादेवीच्या सेवेत हजारभर गोंधळी असतील.
|
सुहास सरदेशमुख, औरंगाबाद, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
घटना क्र. १- गेल्या आठवडय़ात एका महिलेने तुळजाभवानीच्या चरणी सोन्याची नथ अर्पण केली. त्याची रीतसर पावती कोणी दिलीच नाही. पावती न मिळाल्याने भाविक महिलेने प्रशासनाकडे तक्रार केली. गदारोळ झाला आणि मंदिर प्रशासनाने साठे नावाच्या कारकुनाला निलंबित केले. घटना क्र. २- नवरात्रीपूर्वी तुळजापूर येथील मानाच्या १६ घरांना मंदिराच्या आर्थिक उत्पन्नातून १६ आणे हिस्सा दिला जातो. उत्पन्नाच्या एकतृतीयांश रक्कम पुजाऱ्यांना देण्याचा ठराव नुकताच मंजूर करण्यात आला. ही रक्कम १ कोटी ४५ लाख एवढी आहे.
|
राजा ढाले, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
कलाशिक्षकांचे गुरू असा गौरव झालेले ज्येष्ठ कलाशिक्षक दि. वि. वडणगेकर हे येत्या गुरुवारी, २४ रोजी वयाची ८० वर्षे पूर्ण करत आहेत. कोल्हापूरच्या कलावर्तुळात राहतानाच दि.वि. सरांनी आधुनिकतावादाचाही अभ्यास केला. या अभ्यासाचा संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत नेला. पण ऐंशीव्या वर्षीही एका कलासंस्थेसाठी ‘दि.वि. सर’ विनावेतन काम करताहेत, हा फक्त त्यांचा मोठेपणा की कलासंस्थांना जगवण्यातला आपला खुजेपणा? त्यांच्याच एका कधीकाळच्या शिष्याचं हे मुक्तचिंतन..
|
|
|