प्रतिसाद
मुखपृष्ठ >> प्रतिसाद
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

प्रतिसाद
Print E-mail

शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
लिंगभावनेचा आदर कशासाठी?

‘आदर लिंगभावनेचा’ हा लेख (४ ऑगस्ट)लिहून लेखिका मंगला सामंत यांनी या विषयावर लोकांमध्ये होणाऱ्या वेडय़ावाकडय़ा चर्चेला शास्त्रीय माहितीचे जे पाठबळ पुरविले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. ही माहिती त्यांनी अत्यंत सुलभ करून मांडली आहे, हे विशेष.
लिंगभावनेचा आदर करावा हे त्यांचे मत मात्र मला मान्य नाही. समलिंगीसंबंधीचा उदो उदो करण्यासारखेही त्यात काही नाही, पण काही माणसांची ती मजबुरी आहे. त्यातून समाजात, कुटुंबात दु:ख निर्माण होतानाही दिसते. त्यासाठी त्यांच्या जीवनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, इतकेच.
मंगलाबाई म्हणतात, ‘‘बहुसंख्य व्यक्तींमध्ये स्त्रीपुरुष लिंग फरक हा ठरलेल्या नैसर्गिक घटनाक्रमाने अतिशय सुरळीतपणे पार पडत असतो.’’ याचा अर्थ ही विकृती मानली नाही तरी स्वाभाविक, नैसर्गिक, नॉर्मल म्हणता येत नाही. या अवस्थेमुळे जेव्हा व्यक्तीची जननक्षमता नष्ट होते तेव्हा ते व्यंगच म्हणावे लागेल. दुसरे असे की, सर्वच समलिंगी व्यवहार करणारे ‘ते तसेच जन्मलेले आहेत’ ‘बॉर्न दॅट वे’ म्हणून झालेले नसून प्रसंगवश, अनुभवांच्या दडपणाने तसे बनलेले असू शकतात. या दोन्ही प्रकारच्या समलिंगी व्यवहार करणाऱ्या व्यक्ती दुसऱ्यांचे लैंगिक शोषण करून आपले सुख मिळविण्याचा प्रयत्न करताना आढळतात. उदाहरणार्थ, अशी व्यक्ती समलिंगीभाव नसलेल्या व्यक्तीशी संबंध करते आणि पुढे ती बाधित व्यक्ती भिन्न लिंगी लोकांशी संबंध करायला अक्षम बनते. समलिंगी माणसांना जननक्षमता असली तर ती लग्न करून मुलाबाळांना जन्मही देतात आणि दुसरीकडे समलिंगी प्रवृत्ती जबर असल्याने समलिंगी संबंधही जोडतात. हे संबंध इतके प्रभावी ठरतात की घरदार, मुलेबाळे यांच्याकडे त्यांचे दुर्लक्ष होऊन, कुटुंबीयांचे विशेषत: वाढत्या मुलांचे भावनिक नुकसान होते. संसार मोडतातही. कुटुंब सल्ला केंद्रात काम करताना मी अशा अनेक केसेस हाताळल्या आहेत.
- प्रभा तुळपुळे, मुंबई
लेखिका मंगला सामंत यांच्याशी संपर्कासाठी -
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

परखड विचार पटले
 ‘चतुरंग’मध्ये र. धों. कर्वेच्या निमित्ताने आलेले डॉ. मंगला आठलेकर यांचे तीनही लेख आवडले. यासह ‘बलात्कार हाही एक अपघात समजावा’ हा विचार खूपच भावला. इतर अवयवांना अपघातात इजा झाली तर अनुकंपा निर्माण होते, मग ह्याच बाबतीत घृणा का वाटावी? ‘शील’ ह्या शब्दाचा आपण फार बाऊ करतो, हे लेखिकेने मांडलेले विचार मला पटले. ती काय कचकडय़ाची वस्तू आहे एवढय़ातेवढय़ा धक्क्याने मोडायला? आणि पुरुषांच्या शीलाचं काय? की त्याचं शील लोखंडाचं असतं? की त्यांना शीलच नसतं? अशा वेळी मुलीला आई-वडिलांनी, बायकोला नवऱ्याने समजून घेतलं तर प्रेम वृिद्धगतच होईल. सर्वानीच आपली मानसिकता बदलली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा मुलीने किंवा स्त्रीने तो प्रसंग पूर्णपणे विसरून जाऊन खंबीरपणे आयुष्याची पुढची वाटचाल केली पाहिजे. तीच आयुष्यभर कुढत राहिली तर.. लेखिकेने खूप छान विचार अगदी परखडपणे मांडलेत, त्याबद्दल धन्यवाद.
प्रेमानंद सामंत, ई-मेलवरून

प्रवाहाविरुद्ध ‘पोहणे’ सोपे नाही
८ सप्टेंबरच्या ‘प्रवाहाविरुद्ध पोहणे’ या शैलजा दांडेकर यांच्या लेखातून माझ्यासारख्या अनेकींचे विचार व्यक्त झाले असावेत. त्यांनी लेखात उल्लेख केलेल्या ज्या ज्या मुलींनी अटी घातल्या त्यांचे अभिनंदन! आम्ही अशाच अटी २५-३० वर्षांपूर्वी घालत होतो तेव्हा आम्हाला आईवडिलांसह सगळ्यांकडून ‘अ‍ॅबनॉर्मल’ ठरवले गेले व त्या न्याय्य मागण्या पूर्ण न झाल्याने आम्हाला अविवाहित राहावे लागले. अर्थात त्याबद्दल आम्हाला दु:ख नाही. कारण गुलामासारखे आपल्या मनाचा कोंडमारा करून लग्न केल्यामुळे आम्हाला त्रासच झाला असता. आमच्या पुढे लग्न झालेल्या बायका जेव्हा उगाचच भाव खातात तेव्हा आम्हाला त्यांच्या वागण्याचे हसू येते, कारण त्यांनी हुंडा वगैरे देऊनच लग्न केलेले असते. आम्हाला तडजोडीचे अनेक सल्ले दिले गेले. पण गुलामगिरीला तडजोड म्हणता येत नाही. आमच्या अटी होत्या की आम्हीही नोकरी-व्यवसाय करणारच, कारण आíथक स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा हक्क आहे. आमच्या बरोबरीने नवऱ्याने घरकामात भाग घेतला पाहिजे. शिवाय जसे नवऱ्याचे जन्मदाते महत्त्वाचे तसेच आमचेही जन्मदाते महत्त्वाचे आहेत. आम्ही त्यांच्या दुखल्याखुपल्याकडे लक्ष देणारच. पण या अटी त्या काळी ‘आगाऊपणाच्या’ ठरल्या.
लग्नात वरमाईचे पाय मुलीच्या आईने धुवायचे असतात, या रीती सांभाळणाऱ्या मुलींना काही स्वाभिमान आहे की नाही, असा प्रश्न पडतो. त्यांच्या आई-वडिलांच्या बोलण्यात लग्नखर्चाबद्दल काळजीचे सूर असतात. पण तेसुद्धा मुलींना वाढवताना त्यांच्यात स्वाभिमान जागृत करीत नाहीत.
- स्मिता पटवर्धन, सांगली
 
वर्मावर अचूक बोट ठेवले आहे
डॉ. अनघा लवळेकर यांचा ११ ऑगस्टच्या चतुरंगमधील ‘तूच आहेच..’ या मथळ्याचा लेख वाचला. रोखठोक लेखनशैलीत लेखिकेने समाजाच्या बिघडत्या मानसिकतेवर अचूक बोट ठेवले आहे. िहदी मालिका अतिशयोक्तीच्या कथा दाखवण्यात आघाडीवर आहेतच, पण मराठी मालिकाही हळूहळू त्याच वळणावर जात आहेत. प्रेक्षक असणाऱ्या महिला वर्गालाही आपली अभिरुची दूषित होत असल्याची जाणीव होत नसल्याने वाईट वाटते. सृजनशील मनोरंजनाचा आग्रह  धरायला हवा, याची जाणीव समस्त स्त्री वर्गाला होणे गरजेचे आहे.
- अशोक पाटकर, बोरिवली

प्रक्रियेत बदल अपेक्षित
डॉ. मंगला आठलेकर यांच्या ‘बलात्काऱ्याला भय कोणते?’ या लेखात गुन्हेगाराच्या शिक्षेबाबत बराच उहापोह झाला आहे. बलात्काराच्या ज्या खटल्यात गुन्हेगाराला कमी शिक्षा झाली असे सरकारी पक्षाला वाटत असेल तर ते वरच्या कोर्टात अपील करू शकतात. मात्र हे पाऊल उचलणे राज्य सरकारवर बंधनकारक नाही. कायद्याने ते बंधनकारक करावे, असे मला वाटते. तसेच राज्यघटना लिहीली गेली त्या काळात मानवी हक्कांबाबत जागरूकता नव्हती. त्यामुळे न्यायालयाच्या फाशी देण्याच्या अधिकारावर नियंत्रण रहावे, म्हणून फाशीच्या शिक्षेबाबत पुनर्विचार करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना दिला गेला. आजघडीला संयुक्त राष्ट्रांच्या दबावामुळे मानवी हक्क जपणुकीबाबत वचक निर्माण झाला आहे. अशा स्थितीत राष्ट्रपतींचा हा अधिकार कमी केला, तर त्यात काय वावडे ?
-राजश्री साकळे, कोल्हापूर

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 20

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो