प्रतिसाद
मुखपृष्ठ >> प्रतिसाद
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

प्रतिसाद
Print E-mail

 

शनिवार, ८ सप्टेंबर २०१२
मूळ स्रोतावर हल्ला हवा!

‘र. धों.च्या निमित्ताने’ या सदरात डॉ. मंगला आठलेकर यांचा ‘बलात्काराला भय कोणते’ हा लेख वाचलाच होता. त्यावर शुभा परांजपे यांचे पत्र आणि त्यावर लेखिकेची प्रतिक्रिया वाचल्यानंतर लिहावेसे वाटले. बलात्कार हा अत्यंत निर्घृण असा गुन्हा आहे आणि त्याला कडक शासन व्हायलाच हवे याबद्दल दुमत नाही.
सामूहिक बलात्कार करणाऱ्यांना तर देहदंडाचीच शिक्षा हवी, अशी तरतूद कायद्यात करता येते. लैंगिकता आणि हिंसाचार असे दोन्ही गुन्हे असतील तर वेगळी शिक्षा कायद्यातही आहे.
 पण लिंगविच्छेदनाची शिक्षा हा या बलात्काराइतकाच अघोरी प्रकार वाटतो. शरीरशास्त्राच्या पातळीवर विचार करायचा झाल्यास िलग हे साधन आहे (ते दोषी नव्हे), दोषी आहे मन, विकृत कामवासना. त्यामुळे नष्ट करायचे असल्यास या वाईट विचारप्रवृत्ती नष्ट करायला हव्यात.
शिक्षा ही सकारात्मक असावी. गुन्हेगाराला शासन हवेच, पण त्यापेक्षा असे गुन्हे का घडतात याचा अभ्यास करून त्यानुसार शिक्षेचे स्वरूप ठरवावे. समाज सुधारायला हवा असा हेतू शिक्षेतून प्रतीत झाला पाहिजे. कायदा सूडबुद्धीचे समर्थन करत नाही, पण लेखाच्या निमित्ताने विचारमंथन घडवणाऱ्या निरोप्यावर रोष ठेवण्यापेक्षा मूळ स्रोतावर हल्ला करावा, असे सुचवावेसे वाटते.
- सागर पाटील, कोल्हापूर

आदर लिंगभावनेचा
हल्ली अनेकांकडून त्याचे लिंग बदलायची इच्छा व्यक्त होते आहे. ही भावना का आणि कशी उत्पन्न होते हे  मंगला सामंत यांच्या सविस्तर लेखावरून ( ४ ऑगस्ट) समजले. लिंग बदलण्याच्या भावना काय असू शकतात याची माहिती लेखात प्रामुख्याने आढळते.
तसे पाहिले तर ही भावना उत्पन्न होण्यास आपण मुद्दाम असे काहीच करत नसतो. काही जण म्हणतात की ही भावना आपोआप उत्पन्न होते. त्याला नक्कीच काही कारणे असतात पण ती कारणे आपल्या हातात नसतात. लेखात पुष्कळ पुस्तकांतले संदर्भ पण दिलेले आहेत, पण हे सामान्यांना कळतीलच असे नाही.
लिंग बदलण्याच्या इच्छेला आपण सामान्य काहीच करू शकत नाही. आपल्या हातात इच्छेचा मान ठेवायचा की नाही एवढेच आहे. लेखिकेने म्हटल्याप्रमाणे लिंगभावनेचा आदर हा केलाच पाहिजे. त्याला पर्यायच नाही. मुख्य म्हणजे आईबाबांनी मनावर ओझे ठेवूनच ‘हा’ म्हटले पाहिजे. ते ओझे त्यांना नाइलाजाने पेलावेच लागेल. ही बदलत्या काळाची गरज आहे.
-रा. आ. कंटक, पुणे.

अवहेलनेस ‘तूच’ जबाबदार
‘तूच आहे तुझ्या अवहेलनेस जबाबदार’ हा डॉ. अनघा लवळेकरांचा लेख (११ऑगस्ट) वाचला व मन सुन्न झाले. हे कटू सत्य उत्तम तऱ्हेने मांडल्याबद्दल धन्यवाद! स्त्रियांचे मनोरंजनाचे पूर्वीचे व आताचे मार्ग याचे वास्तववादी वर्णन या लेखात आहे. मानवी मनाला मनोरंजनाची गरज असतेच, पण ते कोणत्या रूपाने व कसे करायचे व ते करतानाही समाजातले स्वत:चे स्थान व स्वत्व कसे टिकवायचे हे मात्र स्त्रीच्या प्रवृत्तीवरच अवलंबून आहे. पूर्वीही स्त्रीची मानसिक, शारीरिक अवहेलना होतच होती, पण त्याचं बाजारीकरण होऊ नये म्हणून ती जपत होती. पण आता मात्र चित्रपट व दूरदर्शन मालिकांद्वारे त्याला मनोरंजनाचं स्वरूप आलं आहे व आपलंच ते ओंगळ रूप बघून सामूहिक मनोरंजन चाललंय याची खंत वाटते.
आजकाल पालकच आपल्या मुलींना हौस म्हणून लांडेचिंडे, तोकडे, फॅशनेबद्दल कपडे घालून वेडेवाकडे अंगविक्षेप करणाऱ्या बीभत्स नृत्याच्या क्लासला घालतात. ओल्या मातीतल्या त्या मुलीची आवड तिच्या वाढत्या वयाप्रमाणे वाढते व तारुण्यात ती तिच्या अंगात भिनते. तिच्या नृत्याच्या कार्यक्रमाच्या वेळी आंबटशौकीन स्त्रियांच्याच टाळ्यांच्या गजरांनी त्या मुलींना प्रोत्साहन मिळून लवकरच ती ‘सेलिब्रेटी’ बनते. पैसे कमावते. यातच आई-वडील धन्यता मानतात, पण दुसऱ्या बाजूने तिच्या शिलाचं चाललेलं खच्चीकरण त्यांना जाणवत नाही. दुसऱ्याचं अशा रीतीने मनोरंजन करणाऱ्या अशा पुरुषांना त्यांच्याबद्दल नको तेवढे शारीरिक आकर्षण निर्माण होते. पांचट व अश्लील विनोदांना जोर येतो. पुढे ‘रेव्ह’ पाटर्य़ातून त्यांची प्रसिद्धीही(?) होते, पण या सार्वजनिक मनोरंजन करणाऱ्या स्त्रियांना प्रसिद्धीच्या नशेत आपली अवहेलना होते हे कळत नाही. आज सक्षम, कृतिशील स्त्रियांचे आदर्श व समाजातले त्यांचे प्रतिष्ठित स्थान जर आमच्यातल्या सर्वच स्त्रीवर्गाला दिसले तर आपलीच अवहेलना आपल्या डोळ्यांनी पाहायचे दुर्दैव आमच्या वाटय़ाला येणार नाही.
-शुभदा कुळकर्णी, कुर्ला

सुखाचा ठेवा
२५ ऑगस्टच्या ‘लोकसत्ता-चतुरंग’मध्ये अंजली पेंडसे यांचा ‘गोची आजी-आजोबांची’ हा लेख वाचला. लेख वाचनीय व विचार करण्यासारखा होता. मुलां-सुनांनी विचार करून काही केले, तर या गोचीचा प्रश्नच येत नाही. आजी-आजोबांना आपल्या नातवंडांचे लाडकोड करण्यास आनंद व समाधानच असते.
मीसुद्धा दोन नातवंडांची आजी आहे. दोन मुलांची दोन मुले. पण माझी अशी गोची कधी झालीच नाही. कारण माझ्या सुना सुज्ञ आहेत.
मला पहिली नात झाली तेव्हा आम्ही दोघे शारीरिकदृष्टय़ा सक्षम होतो. आजोबांना नात फार प्रिय होती. माझ्या सुनेने सर्व विचार करून जेवण करण्यास बाई ठेवली. बाकीच्या कामाला दुसरी बाई होतीच. नात शाळेत जाऊ लागली तेव्हा बसपर्यंत आणण्यास-पोचवण्यास मुलगी ठेवली. तरीही आजोबा कौतुकाने नातीबरोबर जात. पण त्यात सक्ती नव्हती. नातीचे संगोपन करण्यात मला काहीच त्रास होत नव्हता. आमच्या सुनेचा आमच्यावर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे आजी-आजोबा आणि नात यांत प्रेमाचा घट्ट गोफ विणला गेला.
दुसऱ्या मुलाला जेव्हा मुलगा झाला तेव्हा दुर्दैवाने आजोबांचे छत्र हरवले होते. माझी आजारी बहीण माझ्याकडे होती. मी स्वत: मानसिकदृष्टय़ा खचले होते. दुसरी सूनही सूज्ञच निघाली. ऑफिसला जाण्याअगोदर एक महिना तिने बाळासाठी बाई ठेवली. जेवणासाठी बाई होतीच. बाळाची काळजी व देखरेख करण्यास भरपूर वेळ मिळत होता. त्याचे कष्ट न वाटता आनंद होत होता.
माझी नातवंडे लहान असताना मी सहलींना गेले, माहेरी जात असे. जे बंध होते ते रेशमाचे होते, दोरखंडाचे नव्हते. त्यामुळे मला त्यांचे कधीच ओझे झाले नाही. तर ही देवाघरची भेट आहे असेच मी समजते. पण ही भेट मला माझ्या सुनांमुळे मिळाली, हे मात्र खरं आहे.
सुनांनी आपली प्रगती का करू नये? तिची तशी पात्रता असेल, तर त्याचे ती सोने करू शकते. आपणास जे जमले नाही, ते सून करते याचे समाधान वाटावे. दोघींनीही एकमेकींस समजून घ्यावे; म्हणजे अडचणींवर मात करता येते.
आजी-आजोबांनीही चालू जमान्याप्रमाणे मुले वागणार म्हणून त्याकडे थोडे दुर्लक्ष करावे. नातवंडे आजी-आजोबांचे ऐकत नाहीत, त्यांना मान देत नाहीत यात त्यांचा काही दोष नसून त्यांच्या आई-बाबांचा असतो. मी कित्येक घरात पाहिले आहे. मुले आईबाबांचा अपमान करतात. मुलांदेखत त्यांना टाकून बोलतात. लहान मुले हे पाहात असतात. त्यांना वाटते हे आपणास सांभाळणारे नोकरच आहेत. त्यामुळे आजी-आजोबांनी सांगितले तर त्यांना ते आवडत नाही. त्यांची कागाळी ते आई-बाबांकडे करतात.
भाऊ नसलेल्या मुलींना आई-बाबांवर आपलाच हक्क आहे असे वाटते. वास्तविक प्रत्येक मुलीने आपल्या आईने तिच्या तरुणपणी केलेले कष्ट, धावपळ, दगदग पाहिलेली असते. मुलीच्या अडचणीच्या वेळी आई धावून जातेच. पण मुलींनी सुट्टीत आईबाबांना नातवंडांच्या सहवासात राहण्यास बोलावले पाहिजे. त्यातच नात्याची खरी गोडी असते.
प्रत्येक आई-बाबांनी आपणही पुढे आजी-आजोबा होणार आहोत याची जाणीव ठेवावी. घरातील सर्व माणसांनी एकमेकांना समजून घेतले तर घरात समस्या कधीच राहाणार नाहीत.
म्हणून प्रत्येक मुला-सुनांनो, आई-बाबांची अडचण, शारिरीक क्षमता समजून घ्या. आजी-आजोबांना नातवंडांचे ओझे न वाटता देवाने दिलेला सुखाचा ठेवा, असेच वाटू द्या.
-सुधा देशमुख, कुर्ला.

सामंजस्याची भूमिका हवी
२५ ऑगस्टच्या अंकातील ‘गोची आजी-आजोबांची’ हा लेख आवडला. पण आजी- आजोबा आज घराला हवे आहेत. मुलींना आपण शिक्षणाची दारे उघडी केली अणि त्यांनी उंच भरारी मारली, सर्वच क्षेत्रात. आता मातृत्व त्यांच्या मार्गातील अडथळा बनायला नको. त्याकरिता आजी-आजोबांची मदत हवीच. उतारवयात नवी जबाबदारी पेलताना अनेक अडचणी येणारच, पण त्यावर तोडगा निघू शकतो व प्रश्न सामंजस्याने सोडवता येऊ शकतो. मदतनीस ठेवावा, नोकरी करणाऱ्यांची ही गरज ओळखून बेबी सिटिंगचा एखादा अभ्यासक्रम सुरू करावा, अशा प्रशिक्षित उमेदवारांची घरात नेमणूक करावी. आजी- आजोबांनी देखरेख करावी. संगोपनाबाबत संघर्ष होणारच. कारण पूर्वीपेक्षा आता सारे बदलले आहे. मुख्य म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अभाव नाही. मुबलक पसा हाती आहे, परंतु पशाने सर्व होत नाही, याची जाणीव मुला-बाळांनी ठेवल्यास बरे होईल. मतभेद असणारच, ते बोलून सोडवावेत. आजी-आजोबांना कुठे फिरायला जायचे असल्यास ठरवून सारे करावे, तेसुद्धा करता येते. तडजोड केली की सारे जमते. नाही तर मधल्यामध्ये मुलांची आबाळ होते. ही जबाबदारी आई-बाबांची व आजी-आजोबांची आहे. मने निभ्रेळ व निकोप असतील तर सारे जमते, अन्यथा गुंता वाढतो. शेवटी एकीकडे पळणाघरे व दुसरीकडे वृद्धाश्रमांची संख्या वाढणार.
-जयश्री काकडे, ई-मेलद्वारे  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 20

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो