प्रतिसाद
मुखपृष्ठ >> प्रतिसाद
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

प्रतिसाद
Print E-mail

शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
हा सिक्स्थ सेन्स नव्हे
२८ जुलैच्या ‘स्त्री जातक’ सदरातील डॉ. अनघा लवळेकरांचा लेख वाचला. त्यांच्या एका सहकारी स्त्रीला नवीन घरात अस्वस्थ वाटायला लागले. नंतर कळले, त्या घरात आधीचे जे कुटुंब राहत होते त्यांच्यातील कुणी आत्महत्या केली होती.
हे उदाहरण स्त्रीचा सिक्स्थ सेन्स म्हणून लवळेकरांनी उद्धृत केले आहे, पण सिक्स्थ सेन्स म्हणून हे उदाहरण स्वीकारावेसे वाटत नाही. सिक्स्थ सेन्समध्येही तुमच्या तार्किक- सारासार विचारशक्तीच तुमच्या नकळत काम करत असतात. त्या कुटुंबात अशी काही घटना घडलेली आहे, हे माहीत नसताना कोणा परक्या स्त्रीला अस्वस्थ वाटायचे काय कारण? ‘गूढकरा’वर विश्वास ठेवणाऱ्यांनाच हे उदाहरण पटेल असे वाटते. विज्ञानवादी विचारसरणी सिक्स्थ सेन्स म्हणूनसुद्धा हे ‘अस्वस्थ वाटणे’ स्वीकारणार नाही. बाकी सर्व वस्तुनिष्ठ, तर्कशुद्ध पद्धतीने एखादा विचार मांडताना असे विसंगत काही लिहिणे खटकते.
- प्रभा वझे, पुणे.
तीच शिक्षा योग्य
‘बलात्काऱ्याला भय कोणते’ (४ ऑगस्ट) असे राहिलेलेच नाही याची मुख्य कारणे म्हणजे न्यायदानाला लागणारा अक्षम्य विलंब, राजकीय वा गुंडांच्या धाकाने फुटणारे साक्षीदार, तर कधी पीडित स्त्रीसुद्धा साक्ष फिरविते. गाजलेल्या जळगाव सेक्स स्कँडलमध्ये हेच झाले. त्या वेळच्या तेथील महिला सनदी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी अतिशय परिश्रमपूर्वक हा खटला तयार केला होता. या नराधमांना जन्मठेपेपेक्षा जास्त शिक्षा खून केला तरी होत नाही. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेली शिक्षा राष्ट्रपतींनी कमी करून जन्मठेपेची  केली. अशी बक्षिसी मिळाल्यावर त्याचे परिणाम काय होणार?
वरील लेखात अशा नराधम बलात्काऱ्याला लिंगविच्छेदनाचीही एकमेव शिक्षा योग्य आहे,  असे म्हटले आहे. त्या मताशी मी पूर्णत: सहमत आहे. अशा शिक्षेची अंमलबजावणी करण्याआधी व नंतर जोरदार प्रसिद्धी व्हायला हवी. या नराधमाच्या दुष्कृत्याने एखादी स्त्री जीवनातून उठते तशीच शिक्षा त्याला द्यायला हवी. याबाबत मुद्दामहून नमूद करावेसे वाटते की, दिल्ली न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती कामिनी लाऊ यांनी असे खटले चालविताना एप्रिल २०११ व फेब्रुवारी २०१२ मध्ये निकाल देताना लिंगविच्छेदनाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात करावी, अशी सूचना निर्भीडपणे आणि उघडपणे केली होती. अशा न्यायाधीश महोदयांचे कौतुक करावे तेवढे थोडेच ठरेल.
- सुधीर देशपांडे, विलेपार्ले (पूर्व).

संदर्भग्रंथाची यादी उपयुक्त ठरेल
४ ऑगस्टच्या अंकातील ‘आदर लिंगभावनेचा’ हा मंगला सामंत यांचा लेख वाचला. विषय अत्यंत क्लिष्ट असूनही त्यांनी तो अधिकाधिक सोपा करून सांगितला आहे. लेख खूप आवडला. लेखाच्या शेवटी संदर्भग्रंथांची यादी दिली असल्यामुळे ज्यांना या विषयाची अधिक माहिती हवी असेल त्यांना ती मिळवणे सोयीचे ठरेल.
स्त्री व पुरुष समागमानंतर निर्माण झालेला गर्भाशयातील भ्रूण हा ७७ क्रोमोझोम धारण केलेला स्त्रीभ्रूण तरी असतो किंवा ७७ क्रोमोझोम घेऊन पुरुषभ्रूण तरी असतो’ असे त्या लिहितात.गर्भाशयातील भ्रूण ७७ क्रोमोझोम धारण करणारा असावा की ७८ धारण केलेला असावा हे कसे ठरते? योजनाबद्ध निर्णय नसेल तर यामागे कोणती यंत्रणा आहे?
-डॉ. भा. वा. आठवले, सिंधुदुर्ग
या कार्याला त्वरित सुरुवात व्हावी
डॉ. मंगला आठलेकर यांनी ‘र.धों.च्या निमित्ताने’ या सदरातून बलात्काराच्या गुन्ह्य़ासाठी सध्या कायद्यात असणाऱ्या शिक्षेच्या तरतुदीचा पुनर्विचार करण्याबाबत जो प्रस्ताव मांडला आहे तो योग्यच आहे, पण या कार्याला त्वरित सुरुवात झाली पाहिजे. मात्र सध्याची शासनयंत्रणा व प्रसिद्धी-पैसा-प्रतिष्ठा यासाठीच धडपडणाऱ्या सेवाभावी संस्था यांना या कार्यरचनेत स्थान देता कामा नये. हे काम समाजातील संवेदनशील पण प्रगल्भ वृत्तीच्या व्यक्तींनी एकत्र येऊन केल्यास त्यातून काही निश्चित, ठोस मार्ग दिसेल. आठलेकर यांनी याबाबत पुढाकार घ्यावा, असे मला वाटते.
- सुहास बाक्रे, ठाणे   

तुलना चुकीची नव्हे काय?
‘बलात्काऱ्याला भय कोणाचे’ या माझ्या लेखावरची शुभा परांजपे यांची प्रतिक्रिया (१८ ऑगस्ट) वाचली. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्दय़ावर खरे तर एकेक लेख लिहिता येईल. पण सध्या मला म्हणायचे आहे ..

१.पुरुष वासनांध असू शकतो तशी स्त्रीही वासनांध असू शकते हे कोणीच अमान्य करणार नाही. पण त्यांचे दृश्य परिणाम वेगळे आहेत. मुळात फक्त पुरुषच स्त्रीवर लैंगिक बलात्कार करू शकतो. ‘बलात्कार’ या शब्दात बळाचा वापर, क्रौर्य, हिंसा, शारीरिक इजा, सक्तीच्या संभोगातली प्रचंड वेदना आणि भक्ष्य झालेल्या स्त्रीचा जीवघेणा आक्रोश आहे. बलात्कारानंतर स्त्रीला गर्भ राहू शकतो, बलात्काराने दिलेल्या शरीर-मनाच्या जखमा आयुष्यभर एखाद्या दु:स्वप्नासारख्या तिचा छळवाद करीत राहतात. मुख्य म्हणजे अशी स्त्री समाजाकडून ‘टाकली’ जाते. पण शुभा परांजपे म्हणतात तसे श्रीमंत स्त्री जरी तिच्या घरातल्या नोकराशी किंवा ड्रायव्हरशी वासनांध होऊन संबंध ठेवत असली तरी त्या नोकराला किंवा ड्रायव्हरला यापैकी कोणत्याच वेदनेला सामोरे जावे लागत नाही. म्हणूनच स्त्रीच्या आणि पुरुषाच्या वासनांधतेची तुलना होऊ शकत नाही.
२.     चार वासनांध पुरुष आपल्या वासनेच्या पूर्तीसाठी एखाद्या बाईला फरफटत नेऊन तिच्यावर सामुदायिक बलात्कार करतात, पण चार वासनांध स्त्रियांनी एखाद्या पुरुषाला आडरानात नेऊन त्याच्यावर बलात्कार केला हे ऐकिवात नाही. एका प्रसिद्ध पफ्र्युमच्या जाहिरातीत तो पफ्र्युम वापरणाऱ्या पुरुषाच्या मागे स्त्रिया लागतात म्हणून का त्या पुरुषाच्या चेहऱ्यावर वेदना दिसते? उलट इतक्या स्त्रिया मागे लागल्यात म्हटल्यावर आकाश ठेंगणे झाल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतो.
३.     वासनांध बापाने आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या घटना आपण ऐकतो पण वासनांध आईने पोटच्या मुलावर बलात्कार केला ही घटना दुर्मिळात दुर्मिळ. तेव्हा पुरुषाची लैंगिक वासना आणि स्त्रीची लैंगिक वासना याची तुलना चुकीची नव्हे का?
४.     राहता राहिला प्रश्न लिंगविच्छेदाची शिक्षा सुनावलेल्या ‘पुरुष’ या नाटकाचा प्रयोग नाटय़गृहाबाहेर लावावा की नाही हा! याचे उत्तर असे की, जी स्वत: बलात्काराचा बळी ठरली आहे किंवा जिची मुलगी एखाद्या लिंगपिसाट पुरुषाचे भक्ष्य झाली आहे किंवा जिला बलात्कारामुळे स्त्रीच्या वाटय़ाला येणाऱ्या भयंकर आणि कधीच भरपाई होऊ न शकणाऱ्या दु:खाशी स्वत:ला जोडून घेता येते अशा प्रत्येक स्त्रीचे यावरचे उत्तर ‘होय’ असेच असेल. पण ‘आग तर शेजारच्या घराला लागलेली आहे.’ अशी जिची वृत्ती असेल तिला मात्र बलात्कारासारख्या गुन्ह्य़ाला सध्या अस्तित्वात असलेली शिक्षा पुरेशी वाटेल.
आणि शुभाताई, वास्तवातल्या गुन्ह्य़ासाठी शिक्षा काय असायला हव्यात यासाठी कोणी नाटकाची मदत कशाला घेईल? सत्य हे कल्पिताहून भयंकर असते. त्या भयंकराला कल्पित कवेतच घेऊ शकत नाही तर त्याच्या नाशाचे उपाय काय सुचवणार?
डॉ. मंगला आठलेकर

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 20

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो