शेखर जोशी, मंगळवार , २९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
नावात काय आहे, असा प्रश्न कोणाला विचारला तर प्रत्येकाकडून वेगवेगळी उत्तरे येतील. कोणी म्हणेल नावात काय, काही नाही तर कोणी सांगेल नावातच सर्व काही आहे. खरय ते. जात नाही ती जात असे म्हटले जाते, तसेच आपल्या जन्मापासून शेवटपर्यंत जे आपल्याबरोबर असते आणि मृत्यूनंतरही मागे राहते ते आपले नाव. |
निशांत सरवणकर, सोमवार , २८ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुंबईतील एका प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकात शनिवारी पहिल्या पानावर एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. निर्घृण हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या विजय पालांडे या आरोपीने म्हणे, सिनेसृष्टीत स्वत:चे करिअर करू पाहणाऱ्या दिल्लीस्थित करणकुमार कक्कड याची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्याची प्रेरणा मारीया सुसाईराज प्रकरणापासून घेतली. |
शेखर जोशी, सोमवार , २८ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
काय उन्हाळा चांगलाच तापलाय ना, कधी एकदा पावसाला सुरुवात होतेय, असं झालय. खरं आहे. या उन्हाळ्याबद्दल जरा पुन्हा थोडेसे. आपण गाण्याचे शौकीन असाल तर विविध मूड्समधील गाणी आपण ऐकली असतील. काय काही वेगळं लक्षात येतंय. थंडी किंवा पाऊस या विषयावर मराठीत जेवढी गाणी आहेत, त्या तुलनेत उन्हाळा/उन या विषयी गाणी कमी आहेत, असं नकोसा उन्हाळा या मागील लेखात मी म्हटलं होतं.
|
शेखर जोशी, गुरुवार , २४ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
तुमचा सर्वात आवडता ऋतू कोणता, असा प्रश्न विचारला तर वेगवेगळी उत्तरे येतील हे खरे असले तरी बहुतांश मंडळी हिवाळा आणि पावसाळा हेच उत्तर देतील. अगदी नक्की. आम्हाला उन्हाळा आवडतो, असे सांगणारी अगदी कमी मंडळी असतील. अंगाची काहिली करणारा, घामाच्या धारा काढणारा, जीवाची तगमग करणारा, सगळीकडे रखरखीतपणा आणणारा हा उन्हाळा अगदी नकोसा होतो.
|
शेखर जोशी , सोमवार, २१ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
२१ मे २०१२ मराठी साहित्यातील काही साहित्यिकांवर संकेतस्थळे तयार करण्यात आली असून त्या निमित्ताने मराठी साहित्यिक आता माहितीच्या महाजालात आले आहेत. या महाजालात सध्या जी. ए. कुलकर्णी, कवी, गीतकार आणि महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमा अर्थात ग. दि. माडगूळकर, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे, ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्यासह कथालेखक व नाटककार रत्नाकर मतकरी, नाटककार-साहित्यिक विजय तेंडुलकर, नाटककार सुरेश खरे आदींचा समावेश असून लवकरच गो. नि. दांडेकर यांच्यावरील संकेतस्थळही सुरू होणार आहे.
|
शेखर जोशी, शनिवार १९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
रसना गर्ल तरुणी सचदेव हिच्या विमान अपघाती मृत्युची बातमी वाचली आणि मनात आणखी एका रसना गर्लच्या आठवणी जाग्या झाल्या. काही वर्षांपूर्वी आय लव्ह यु रसना म्हणणारी अंकिता जव्हेरी ही छोटी मुलगीही घराघरात आणि मनामनात पोहोचली होती. मार्च-एप्रिल अर्थातच उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की ही जाहिरात दूरदर्शनवर लागायला सुरुवात व्हायची. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी खासगी दूरचित्रवाहिन्यांचे आत्ताच्या एवढे प्रस्थ नव्हते. |
रवींद्र पाथरे ,शनिवार १९ मे २०१२
‘मी लिहितो कन्नड आणि इंग्रजीतून; पण मराठी रंगभूमीच्या संप्रदायातलाच मी आहे..’ हे उद्गार आहेत कन्नडमधील ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त नाटककार गिरीश कर्नाड यांचे! आज रोजी पंच्याहत्तरीत पदार्पण करणाऱ्या गिरीश कर्नाड यांचा भारतीय रंगभूमीचे जे चार बिनीचे शिलेदार मानले जातात, त्यात विजय तेंडुलकर, मोहन राकेश आणि बादल सरकार यांच्याबरोबरीने आदराने उल्लेख केला जातो. |
रवींद्र पाथरे ,शनिवार, १९ मे २०१२ नाटककार विजय तेंडुलकरांचा आज चौथा स्मृतिदिन. ‘भारतीय रंगभूमीचे भीष्मपितामह’ एवढीच त्यांची ओळख नसून, ‘सामाजिक जागल्या’ची त्यांची भूमिकाही तितकीच महत्त्वपूर्ण होती. त्यांच्यातल्या या जागल्याने अनेक वाद आयुष्यभर ओढवून घेतले आणि त्याची पुरेपूर किंमतही त्यांनी खळखळ न करता मोजली.त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार न मिळण्यामागे प्रचलित राजकीय व्यवस्थेला सतत आव्हान देण्याची त्यांची ही निडर वृत्तीच कारणीभूत ठरल्याचं अनेकांचं मत आहे. |
दिनेश गुणे , शुक्रवार, १८ मे २०१२ बडबड बंद झाली, की माणसं अडगळीत पडतात. बडबडण्यामुळे कालपरवापर्यंत प्रसिद्धीच्या झोतात असलेले अनेक नेते आज गायब झाले आहेत. अधूनमधून कधीतरी ते बोलताना दिसतात, तेव्हा त्या ‘गायबपणा’च्या वेदना त्यांच्या चेहऱ्यांवर स्पष्ट वाचता येतात. म्हणून, बोलत राहिलं पाहिजे! राजकारणातल्या लोकांनी तर बोललंच पाहिजे. मौन पाळून सगळ्यांनाच प्रसिद्धीच्या झोतात राहता येत नाही. |
शेखर जोशी, शुक्रवार, १८ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
लहानपणी विविध क्षेत्रातील मान्यनर व्यक्तींचे हस्ताक्षर जमविण्याचा छंद मी जोपासला होता. पुढे त्यात सातत्य ठेवले नाही आणि नंतर तो हळूहळू कमी होत गेला. मात्र त्या पाच-सहा वर्षांच्या काळात अनेक मान्यवरांना पत्र पाठवून त्यांनी त्यांचे हस्ताक्षर मला पाठवावे, अशी विनंती करत असे. वाढदिवस किंवा दिवाळी शुभेच्छा, मासिकातील किंवा वर्तमानपत्रताली एखादा लेख किंवा मुलाखत वाचून,दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहून त्यांना मी पत्र पाठवत असे. अशा साठ ते सत्तर मान्यवर व्यक्तींच्या हस्ताक्षरातील पत्रांचा संग्रह माझ्याकडे आहे.
|
अभिजित बेल्हेकर , शुक्रवार, १८ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आज (१८ मे) जागतिक संग्रहालयदिन! इतिहास किंवा वर्तमानातील संदर्भमूल्य असणा-या वस्तू आणि त्याबरोबरीच्या संस्कृतीला जतन करणारे, आश्रय देणारे घर म्हणजे संग्रहालय! ही खरेतर विदेशी कल्पना. ग्रीक-रोमन संस्कृतीतून जन्माला आलेली! ‘म्युझियम’ हा या रचनेतील मूळ शब्दच वरील संस्कृतीतल्या ‘म्युझ’ या देवतांनी विश्वाला भेट दिलेला! या ‘म्युझ’ नावाच्या नऊ देवता! कला, साहित्य आणि इतिहासाचे रक्षण करणा-या या देवता! ज्या संस्कृतीत अशा कला, साहित्याला दैवत्वाचे स्थान मिळते, तिथे त्यातील दुर्मिळ वस्तूंनाही मग देवघर लाभते. अशा या देवघराचे नावही मग या ‘म्युझ’वरून आले- ‘म्युझियम’!
|
विनायक परब , शुक्रवार, १८ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एक वेगळाच योग आयुष्यात जुळून आला आहे. आज जगभरात संग्रहालय दिन म्हणजेच म्युझियम डे साजरा होत आहे आणि उद्या प्रसिद्ध नाटककार, लेखक, साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा स्मृतिदिन आहे. आता तुम्ही म्हणाल की, तेंडुलकर आणि म्युझियम्स यांचा काय संबंध ? |
|
|