पुणे प्रतिनिधी महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र असे रूपांतर झाले असून राज्यातील मद्यक्रांतीचे सत्तापीठ बारामतीमध्ये आहे, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांनी रविवारी हल्ला चढविला. |
पिंपरी / प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा फसवी ठरल्याने तोंडघशी पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रसने पुन्हा २४ तास पाणी देण्याचे गाजर दाखवण्यास सुरूवात केली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगवीत बोलताना येत्या ३ वर्षांत २४ तास पाणीपुरवठा करण्याची ग्वाही दिली आहे. |
लातूर/वार्ताहर मराठवाडय़ातील साखर कारखानदारी पश्चिम महाराष्ट्रापेक्षा सरस असून यावर्षी मांजरा परिवारातील कारखाने उसाला पश्चिम महाराष्ट्रापेक्षा अधिक भाव देतील, अशी घोषणा आमदार अमित देशमुख यांनी मांजरा, विकास, जागृती, प्रियदर्शनी व रेणा साखर कारखान्याच्या गळीत हंगामप्रसंगी बोलताना केली. |
हिंगोली/वार्ताहर वसमत तालुक्यातील हयातनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या एका परिचारिकेवर श्याम शिवलिंगप्पा महाजन व भरत साहेबराव सारंग या दोघांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. |
वार्ताहर , वाशीम आंध्रप्रदेशातून चोरटय़ा मार्गाने गुटखा विक्रीसाठी वाशीमच्या काळ्याबाजारात आणणारा ट्रक शुक्रवारी रात्री येथील स्थानिक गुन्हे शाखा व वाशीम शहर पोलिसांच्या पथकाने वाशीम-अकोला महामार्गावर पकडला. या गुटख्याची किंमत ८ लाख ४ हजार २४० रुपये असल्याची माहिती वाशीम शहर पोलीस ठाण्यात प्रभारी ठाणेदार परशुराम राठोड यांनी दिली. |
नितीन गडकरी यांचे प्रतिपादन वार्ताहर, जळगाव, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२
देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेतमालास रास्त भाव मिळण्याबरोबर ग्रामीण भागात शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारणे गरजेचे आहे. त्यामुळे या भागातील बेरोजगारांना रोजगार मिळेल व शहराकडे येणारे लोंढे थांबतील आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याही थांबतील, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले. फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या ३७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ शनिवारी गडकरी यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
|
शिवसेना- मनसेवर अजित पवारांचे टीकास्त्र प्रतिनिधी पिंपरी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच िपपरी बालेकिल्ल्यात आलेल्या अजित पवार यांनी शनिवारी चौफेर फटकेबाजी केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना जमीन दिल्याचे जोरदार समर्थन करतानाच अजितदादांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना मात्र चांगलेच चिमटे काढले. |
ससंद बरखास्तीची अण्णा हजारेंची मागणी वार्ताहर पारनेर घटनेचे पालन न करणाऱ्या सरकारला सत्तेतत राहण्याचा अधिकार नसल्याचा आरोप करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी संसद बरखास्त करण्याची मागणी शनिवारी सायंकाळी ब्लॉगद्वारे केली. |
दिवाळी व नाताळात होणार पर्यटकांची गर्दी प्रतिनिधी चंद्रपूर तब्बल चार महिन्यांनी न्यायालयाने बंदी उठविल्यानंतर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी गर्दी केली असून दिवाळी व नाताळाच्या सुटय़ांची बुकिंग आतापासूनच हाऊसफुल्ल झालेली आहे. व्याघ्रदर्शनाचे पर्यटकांना असलेले आकर्षण लक्षात घेता बंदीनंतरही ताडोबाने गर्दी खेचली आहे. |
मोहन अटाळकर अमरावती राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या प्राधान्यक्रमाचा विषय ऐरणीवर आला असताना दहा वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेल्या आंतरखोरे पाणी परिवहनाचे १३ प्रस्ताव मात्र पुन्हा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. |
सुरक्षा रक्षक खून प्रकरण खास प्रतिनिधी, नागपूर गोळीबारात झालेल्या सुरक्षा रक्षकाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले देशोन्नतीचे मालक व मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांचा जामीन अर्ज शनिवारी न्यायालयाने फेटाळून लावला. |
प्रतिनिधी वर्धा सेवाग्राम आश्रमाच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त हे स्थळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे पावनस्थळ करण्याच्या हेतूने ३०० कोटी रुपये खर्चाचा ‘गांधी फॉर टुमारो’ हा प्रकल्प साकारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली. महात्मा गांधींजींचे सर्वसमावेशक विचार भावी पिढीपुढे ठेवण्याचा मुख्य हेतू या प्रकल्पामागे आहे. |
रत्नागिरी जिल्ह्य़ात काही तालुक्यांतील गावांमध्ये झालेल्या गोवंश हत्येचा निषेध करण्यासाठी शिवसेना, भाजप व विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडक दिली. |
वार्ताहर, सावंतवाडी मालवण-तारकर्ली येथील समुद्रात पुणे येथील आयटी पार्कमधील दोन सॉफ्टवेअर अभियंते समुद्रात बुडाले, तर तिघेजण बालबाल बचावले. समुद्रात चेंडूने खेळणाऱ्या या तरुणांना अंदाज आला नसल्याने दोघांना समुद्राने पोटात घेतले. |
प्रतिनिधी, नाशिक जिल्हा माहिती कार्यालय व एचपीटी महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे वृत्तपत्रविद्या पदवी अभ्यासक्रम केंद्र यांच्यातर्फे ४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता ‘बाळशास्त्री जांभेकर व आजकालची पत्रकारिता’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार सुरेश अवधूत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. |
सुरक्षा रक्षक खून प्रकरण खास प्रतिनिधी नागपूर गोळीबारात झालेल्या सुरक्षा रक्षकाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले देशोन्नतीचे मालक व मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांचा जामीन अर्ज शनिवारी न्यायालयाने फेटाळून लावला. |
नांदेड/वार्ताहर
शहराच्या वेगवेगळ्या भागात चोरटय़ांनी मोठा धुमाकूळ घातला. शुक्रवारी रात्री शहरालगत पेट्रोलपंपावर झालेल्या दरोडय़ानंतर शनिवारी भरदिवसा एका इसमाची दोन लाख रुपयांची बॅग चोरटय़ांनी लंपास केली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड-पूर्णा रस्त्यावरील पेट्रोलपंपावर शुक्रवारी रात्री दहा वाजता अनोळखी तिघे आले. |
औरंगाबाद/प्रतिनिधी
‘‘विविध आरोपांची राळ उडवून विरोधी पक्षांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. परंतु त्यामुळे काही फरक पडणार नाही. पूर्ती ग्रुपसह कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास आपण तयार आहोत. कुठलाही भ्रष्टाचार केला नसताना बिनबुडाचे आरोप आपणावर केले जात आहेत,’’ अशी तोफ भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे बोलताना डागली. |
संतोष मासोळे धुळे, शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
डबघाईला गेलेली जिल्हा बँक, शिरपूर साखर कारखाना आणि अन्य लहान-मोठय़ा कारणांनी काँग्रेसविरोधात वाढलेले जनमत थोपविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दौरा आ. अमरीश पटेल यांच्या राजकीय अस्तित्वासाठीचा मोठा आधार ठरल्याचे मानले जात आहे. एवढेच नव्हे तर, माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या मेळाव्यास केवळ औपचारिक उपस्थिती लावत आणि दाजींविषयी कोणतेही विधान न केल्याने भविष्यात पटेल यांची बाजू वरचढ ठरण्याची शक्यता आहे.
|
वार्ताहर
धुळे ‘सोशल मीडियामुळे आजची तरुण पिढी संस्कारहीन बनली आहे काय?’ या विषयावर मालेगाव एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित आंतर जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत येथील जयहिंद शैक्षणिक संस्थेच्या जयहिंद हायस्कूलमधील ऋतुजा जवाहर पाटील व अश्विनी विजय साळुंखे या दोन्ही विद्यार्थिनींच्या संघाने पहिला क्रमांक मिळविला. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|