आगमन होणार आठवडाभराने विशेष प्रतिनिधी पुणे राज्यात थंडीचा कडाका वाढत असतानाच नीलम चक्रीवादळ आडवे आल्याने थंडीच्या प्रवासात मोठा व्यत्यय आला आहे. त्यामुळे आता गुलाबी थंडीसाठी आणखी आठवडय़ाची तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे. |
प्रतिनिधी पुणे रास्ता पेठेतील जे. पी. ज्वेलर्स या दुकानाच्या मागील दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून चोरटय़ांनी साडेसात किलो सोने व रोख ४७ हजार असा एकूण एक कोटी ९७ लाख रुपयाचा ऐवज चोरुन नेला. |
* साक्रीत ‘रास्ता रोको’ * पाणीयुद्ध पेटण्याची चिन्हे वार्ताहर धुळे पंधरा वर्षांपासून मानवतेच्या दृष्टिकोनातून पिण्याचे पाणी पुरविले. परंतु यापुढे साक्रीच्या प्रकल्पातून धुळ्यास पाणी दिले जाणार नाही, असा निर्धार व्यक्त करीत शुक्रवारी साक्री तालुका पाणी बचाव संघर्ष समितीने ‘रास्ता रोको’ केला. |
* प्रवाशांचे अतोनात हाल * पोलीस मात्र बघ्याच्या भूमिकेत प्रतिनिधी अलिबाग मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आज तब्बल तीन तास ठप्प पडली होती. रायगड जिल्ह्य़ातील खराब रस्त्यांच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाने वडखळ इथे केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे ही वाहतूक बंद होती. |
प्रतिनिधी नाशिक मागील आर्थिक वर्षांत नाशिक दूरसंचारला आतापर्यंतचा सर्वाधिक तोटा झाला असून २०११-१२ चे उत्पन्न १२२ कोटी तर खर्च १५६.२७ कोटी असल्याचे दूरसंचार सल्लागार समितीच्या बैठकीत नाशिक दूरसंचारचे वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण मल्होत्रा यांनी स्पष्ट केले. |
प्रतिनिधी नाशिक सातपूर येथील कंपनीतील कामगाराचा ५० हजारांच्या खंडणीसाठी खून केल्याप्रकरणी संबंधिताच्या दोन मित्रांची शुक्रवारी न्यायालयाने १० नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. संबंधिताच्या वडिलांकडे संशयितांनी पाच कोटींची खंडणी मागितली होती. या प्रकरणी आणखी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. |
वार्ताहर सावंतवाडी एस.टी. बस चुकल्याने मोटरसायकलने कणकवलीत परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या चुलत बहिणीसह तिघा भावंडांचा अपघातात मृत्यू झाला. एस.टी. बसच्या पाठलागात ओव्हरटेकमुळे हा भीषण अपघात घडला. |
वार्ताहर सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात येत्या २६ नोव्हेंबरला ३२९ ग्रामपंचायतींची आचारसंहिताही जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. |
प्रतिनिधी नाशिक पंचवटी येथून दुचाकीच्या डिकीतून अज्ञात चोरटय़ांनी गुरुवारी रात्री तब्बल २७ तोळे सोने लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
खास प्रतिनिधी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातही आता डेंग्यूचे संशयित पाच रुग्ण दाखल झाले असून त्यापैकी एकाला या रोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. |
औषधनिर्मिती बाजारपेठेतील संधी नगण्य प्रशांत देशमुख वर्धा औषधीनिर्मिती उद्योगाची जागतिक व देशांतर्गत उलाढाल अब्जावधीच्या घरात पोहोचली असून यात वार्षिक १६ टक्क्यांनी वाढ होत आहे. मात्र, या क्षेत्रासाठी पात्र फोर्मसी पदवीधरांना त्यात रोजगाराच्या संधी कायदेशीर तरतुदीअभावी नगण्य असल्याने या विद्याशाखेकडील विद्यार्थ्यांचा ओढा दिवसेंदिवस कमी होत असल्याने तथ्य पूढे आले आहे. |
शेतकरी संघटनांमधील विसंगतीने शेतकरी संभ्रमात दयानंद लिपारे कोल्हापूर ऊस दर व शेतक ऱ्यांच्या भावना यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये शाब्दिक वाद जुंपला आहे, तर आता या वादाला नवी फोडणी मिळाली असून शेतक ऱ्यांच्या नेत्यांनी परस्परांवर शरसंधान करण्यास सुरुवात केली आहे. |
प्रतिनिधी पुणे तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून ‘अनाम प्रेम’ या सामाजिक संस्थेमार्फत त्यांच्यासह आनंदमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते १७ नोव्हेंबर या काळात गोवा येथे होणाऱ्या या आनंदमेळाव्यात संपूर्ण राज्यातून तृतीयपंथी सहभागी होणार आहेत. |
औरंगाबाद खंडपीठाचा आदेश राष्ट्रपतींच्या शिर्डी भेटीस ७७ लाखांचा खर्च मंजूर प्रतिनिधी औरंगाबाद शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानमधील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेट म्हणून ४ कोटी ८४ लाख रुपयांची रक्कम खर्च करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी मान्यता दिली. |
परीक्षा पद्धतीत सुधारणेवर आज मुंबईत बैठक प्रदीप राजगुरू औरंगाबाद ‘ही परीक्षा व्यवस्थेत सुधारणा की व्यवस्था सुधारणेची सत्त्वपरीक्षा’ असा काहीसा संभ्रमाचा सूर महाविद्यालयांच्या पातळीवर उमटत आहे. निमित्त आहे उद्या (शनिवारी) राज्यपाल तथा कुलपतींच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ स्तरावरील परीक्षा पद्धतीच्या बहुचर्चित सुधारणेबाबत होऊ घातलेल्या बैठकीचे! |
प्रतिनिधी अलिबाग पनवेल तालुक्यातील कर्नाळा अभयारण्य परिसरात येऊ घातलेल्या इकोसेन्सेटिव्ह झोनला विरोध करण्याचा निर्णय रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीने घेतला आहे. या परिसराला इकोसेन्सेटिव्ह झोन घोषित केल्यास त्याचे पनवेल आणि उरण तालुक्यांतील विकासकामांवर विपरीत परिणाम होणार आहेत. |
प्रतिनिधी अलिबाग रायगड जिल्हा परिषदेची आज झालेली सर्वसाधारण सभा ऐतिहासिक ठरली. सत्ताधारी शेकाप-शिवसेना युतीच्या सदस्यांच्या गैरहजेरीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आपला अध्यक्ष निवडून सभेचे कामकाज चालविले. |
ठाणे, सत्तेच्या राजकारणावरचा जनतेचा विश्वास उडाला असून, सकाळ-संध्याकाळ पत्रकार परिषदा घेऊन ऊठसूट कोणावरही भ्रष्टाचाराचे आरोप करूनही आमचीच त्यांची प्रतिष्ठा मलिन करण्याचे कटकारस्थान केले जाते. |
ठाणे, डहाणू नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्पष्ट भूमिका घेऊन एकमेकातले मतभेद विसरून एकजुटीने काम करीत असताना चुकीच्या पद्धतीने कार्यकर्त्यांवर अन्याय केला तर सरळ काँग्रेसच्या कार्यालयाकडे संपर्क साधा. |
खोपोली, संचालक व अधिकारीवर्गाने संगनमताने ठेवीदार-खातेदारांचा विश्वासघात करून ७५८ कोटी रुपयांचा घोटाळा केला. त्यामुळे पेण अर्बन बँकेचा परवाना रिझव्र्ह बँकेने रद्द केला. या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाली. |