महाराष्ट्र
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महाराष्ट्र
पेयजल योजनेच्या चौकशीसाठी स्वतंत्र चौकशी समितीची मागणी Print E-mail

राष्ट्रवादी आणि काँग्रेसची घोषणा- मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार याचिका
प्रतिनिधी, अलिबाग
रायगड जिल्ह्य़ातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात आलेल्या पेयजल योजनामध्ये घोटाळे झाले असून जिल्हा परिषद प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. पेयजल योजनेच्या चौकशीकरिता आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे दोन्ही पक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.

 
नाशिकमध्ये आजपासून २३ वी राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक
जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या वतीने पंचवटीतील नवरंग मंगल कार्यालयात शुक्रवारी २३व्या वरिष्ठ गट राज्यस्तरीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन आ. माणिकराव कोकाटे, क. का. वाघ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष काशिनाथ टर्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

 
सिंधुदुर्गात पावसाचा शिडकावा Print E-mail

वार्ताहर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आज अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. आज दिवसभर आकाशात पावसाळी वातावरणासारखी स्थिती असल्याने बागायतदार धास्तावले. आज तिन्ही ऋतूंचा अनुभव लोकांनी थोडाफार फरकाने घेतला.

 
रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती भोईर यांची पोलीस कोठडीत रवानगी Print E-mail

प्रतिनिधी, अलिबाग
अलिबागच्या सत्र न्यायालयात शरणागती पत्करल्यानंतर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांना आज अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ५ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. भोईर आणि त्यांचे सहा सहकारी यांनी काल अलिबागच्या जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरणागती पत्करली होती.

 
सिंचन घोटाळ्याची पंतप्रधान कार्यालयाने घेतली गंभीर दखल Print E-mail

गोसीखुर्दसह १७ प्रकल्पांची ‘कुंडली’ मागविली
विक्रम हरकरे, नागपूर

महाराष्ट्रातील १७ सिंचन प्रकल्पांच्या करारनाम्याची संपूर्ण माहिती राज्य सरकारकडून मागविण्यात आली असून सर्व प्रकल्प आता पंतप्रधान कार्यालयाच्या रडारवर आले आहेत. ज्या प्रकल्पांची गुंतवणूक १ कोटी रुपयांपेक्षा अधिक दाखविली आहे, अशा सर्व प्रकल्पांची माहिती द्या, असे पत्र जलस्रोत सचिव ई.बी. पाटील यांना पाठविण्यात आल्याची माहिती पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ सूत्रांनी आज ‘लोकसत्ता’ला दिली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी केंद्रीय दक्षता आयोगाच्या एका पथकाने नागपूरच्या विदर्भ पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयात गोपनीय चौकशी करून बरीच माहिती गोळा केली होती.
 
ई-कचऱ्यात महाराष्ट्र अव्वल! Print E-mail

कॅडमियम यकृतासाठी घातक
सचिन देशपांडे, अकोला

इलेक्ट्रॉनिक अर्थात ई-कचऱ्यात महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान मिळवले असून देशात सर्वाधिक ई-कचरा हा राज्यातून तयार होत असल्याची माहिती एका अहवालात दिली आहे. यंदा देशात आठ लाख टन ई-कचरा तयार होण्याचा अंदाज आहे. राज्यात तीन ठिकाणी खासगी संस्थांद्वारे ई-कचरा संकलन केले जाते तर सात ठिकाणी पुनप्र्रक्रिया केली जाते. ई-कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाची क्षमता वर्षांला केवळ दहा हजार टन एवढीच असल्याने अशा उद्योगांची संख्या वाढवावी लागणार आहे. ई-कचरा हा प्रामुख्याने एलसीडी, एलईडी, दूरचित्रवाणी संच व त्यापाठोपाठ संगणकातून तयार होतो.
 
दोन महिन्यांपासून पुरवठा विस्कळीत Print E-mail

सलाइनच ‘सलाइन’वर!
सुहास सरदेशमुख , औरंगाबाद

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सलाइनच सध्या ‘सलाइन’वर आहे! पेट्रोल, डिझेलचे वाढलेले भाव आणि बाजारपेठेतील सलाइनच्या वाढत्या किमतीमुळे पुरवठादार कंपन्यांनी मागील दोन महिन्यांपासून सलाइनचा पुरवठा थांबविला आहे. ‘अ‍ॅलकॉन पॅटेन्ट्रल’ या सलाइन बनविणाऱ्या कंपनीसमवेत दर करार करण्यात आले होते; परंतु बाजारपेठेतील दर वधारले व अन्य कारणांमुळे सलाइनचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आजही सलाइनचा तुटवडा जाणवत आहे.
 
३० सेकंदांत १ लाख दिवे लावणार Print E-mail

शिर्डीत दीपोत्सवानिमित्त विश्वविक्रमाची तयारी
वार्ताहर, राहाता

साईबाबांच्या हयातीपासून शिर्डीत दीपावलीच्या दीपोत्सवाला विशेष महत्त्व आहे. या दीपोत्सवाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, यासाठी शिर्डीतील साईभक्त लक्ष्मीबाई िशदे चॅरिटेबल ट्रस्टने विडा उचलला आहे. यंदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी केवळ ३० सेकंदांत तेलाचे एक लाख दिवे लावून हा विश्वविक्रम करण्यात येणार आहे. साईभक्त लक्ष्मीबाई यांची नात शैलजा गायकवाड यांच्या हस्ते शिर्डी येथील हॉटेल साई संजीवनीमध्ये तेलाचे नऊ दिवे प्रज्ज्वलित करून या उपक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या वेळी अरुण गायकवाड, संगीता गायकवाड, साईराज गायकवाड, गणेश साळुंके आदी उपस्थित होते.
 
डेंग्यूचा फैलाव; राजकीय पक्ष आक्रमक Print E-mail

वार्ताहर, धुळे

जिल्ह्य़ातील तीन जणांचा मृत्यू डेंग्यूनेच झाल्याचे जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी बुधवारी स्पष्ट केले. इतर सात जणांच्या मृत्यूचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. महापालिका क्षेत्रात १४ यंत्रांच्या माध्यमातून धुरळणी करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. दुसरीकडे आजार रोखण्यास महापालिकेला अपयश येत असल्याने संतप्त झालेल्या विविध राजकीय पक्षांनी बुधवारी स्वतंत्रपणे मोर्चे काढत संतापाला वाट मोकळी करून दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या वतीने मोर्चे काढण्यात आले. तर मनसेच्या महिलांनी आयुक्तांना बांगडय़ा भेट म्हणून दिल्या.
 
शहर बस वाहतुकीच्या गलथानपणाविरोधात ‘चला रिव्हर्स’ आंदोलन Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक

शहर बस वाहतुकीसंदर्भात चालक व वाहकांची कमतरता असल्याने सामान्य प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागत असल्याचे कारण पुढे करणाऱ्या एसटी महामंडळाचे हे कारण काहीसे खरे असले, तरी दुसरीकडे सध्या चालकांच्या मनमानी कारभाराचा नाहक फटका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह प्रवाशांना बसत असल्याचे पाहावयास मिळत आहे. शहर व परिसरातील अनेक थांब्यांवर बस रिकाम्या असतानाही चालक गाडी थांबवत नसल्याने इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या नाशिक शाखेच्या वतीने ‘चला रिव्हर्स’ अशा प्रकारे अभिनव आंदोलन छेडण्यात आले असून, बुधवारी विभाग नियंत्रक कैलास देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
 
‘शिवसत्य’चा टेबल टेनिस संघ राज्यस्तरासाठी पात्र Print E-mail

प्रतिनिधी,  नाशिक
शहरातील गंगापूर रोड येथील शिवसत्य क्रीडा मंडळात सराव करणाऱ्या महिला टेबल टेनिस संघाची पुण्यातील बालेवाडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सलग दुसऱ्या वर्षी पात्र ठरला आहे.९ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या विभागीय स्पर्धेत उपान्त्य फेरीत धुळ्यावर ३-२ ने मात केली.

 
नेटच्या युगातही परीक्षेचा गोंधळ Print E-mail

‘बामु’चे महाविद्यालय  ‘एक दिवस’ मागेच!
प्रदीप राजगुरू, औरंगाबाद
एक दिवस पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा एका महाविद्यालयात मात्र पूर्वघोषित वेळापत्रकानुसार आदल्या दिवशीच घेण्यात आली! डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (‘बामु’) कार्यकक्षेतील कन्नड तालुक्यात असणाऱ्या महाविद्यालयात अलीकडेच हा प्रकार घडला. या प्रकाराची गंभीर दखल घेत विद्यापीठाने एका समितीमार्फत चौकशी सुरू केली.

 
शेती महामंडळ कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी ११ नोव्हेंबरनंतर बैठक- मुख्यमंत्री Print E-mail

वार्ताहर, कोपरगाव
राज्यातील शेती महामंडळ कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात दि. ११ नोव्हेंबरनंतर बैठक घेऊन प्रलंबित सर्व प्रश्नांची सोडवणूक करू, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष बी. आर. पाटील यांनी ही माहिती दिली.

 
आई व आजीनेच घेतला पाच दिवसांच्या चिमुरडीचा जीव! Print E-mail

रत्नागिरी
दुसरीही मुलगीच झाल्याच्या रागातून पाच दिवसांच्या नवजात अर्भकाला जन्मदाती आई व आजीनेच गळा, नाक दाबून ठार मारल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्य़ात संताप व्यक्त होत आहे. तत्पूर्वी या मुलीला फिनेल पाजून तिचे आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केला होता. मूळचा बिजापूर येथील श्रीरंग रघुनाथ बिराजदार (३५ वर्षे) हा आरोग्यमंदिर येथील स्टँडर्ड अपार्टमेन्टमध्ये पत्नी संपदा (२७) व आई श्रीमती लिलावती (६५) यांच्यासह राहतो.

 
वनसंज्ञेच्या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील शेतकरी त्रस्त Print E-mail

वार्ताहर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील वनसंज्ञा, कबुलायतदार गावकर, आकारीपड जमीन प्रश्न अनंत काळ पडून आहेत. त्यामुळे जनतेच्या विकास कामांना फटका बसला आहे. नोकरशाहीच्या निर्णयाचा फटका कसा बसू शकतो हे वनसंज्ञेच्या प्रश्नावरून सर्वाच्या लक्षात येईल.

 
नाशिकमध्ये उद्यापासून महाराष्ट्र शैक्षणिक व व्यवस्थापन परिषदेचे अधिवेशन Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक
मूल्याधिष्ठित गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण, उपाय व व्यवस्थापन या विषयावर वैचारिक मंथन करण्यासाठी पुणे येथील महाराष्ट्र शैक्षणिक, प्रशासन व व्यवस्थापन परिषदेचे १९ वे वार्षिक महाअधिवेशन गोखले एज्युकेशन सोसायटी, एस.एम.आर.के. महिला महाविद्यालय आणि मुंबईचे डॉ. एम.एस.जी. फाऊंडेशन यांच्या वतीने येथील एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयात दोन ते चार नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याची माहिती प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 
हृदयनाथांच्या स्वरांनी रंगली ‘मैत्र जिवांचे’ मैफल Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक
गुलाबी थंडीत कोजागरीच्या चंद्र प्रकाशाने उल्हासित वातावरणात शब्द स्वरांच्या मुक्त उधळणीत नाशिककरांनी कोजागरीचा आनंद लुटला. निमित्त होते पंडित हृदयनाथ मंगेशकर, डॉ. सलील कुलकर्णी आणि राधा मंगेशकर यांच्या ‘मैत्र जिवांचे’ या मैफलीचे. येथील विसे मळ्यातील रामदास उद्यानात नगरसेवक उत्तम कांबळे यांच्या वतीने या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

 
विजय पांढरे यांचा अचानक स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज Print E-mail

 

प्रतिनिधी,नाशिक
जलसंपदा विभागाचे अंतरंग पुरते उलगडून राजकीय भूकंप घडविणारे येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीचे मुख्य अभियंता तथा तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य विजय पांढरे यांनी बुधवारी अचानक स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज देत या वादग्रस्त विभागास अखेर कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला.

 
‘त्या’ वादग्रस्त उपअभियंत्याची सक्तीचा रजेवर रवानगी, ठेकेदारांचे उपोषण स्थगित Print E-mail

रत्नागिरी  
येथील सार्वजनिक बांधकाम- उपविभाग क्र. १ चे उपअभियंता बी. जी. गिते यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने ठेकेदारांनी आपले साखळी उपोषण सायंकाळी मागे घेत असल्याचे जाहीर केले. खासदार, आमदारांच्या स्थानिक विकास निधीतील कामे जाणीवपूर्वक अडवून ठेवणे, देयके वेळेवर अदा न करणे, वारंवार आर्थिक स्वरूपाची मागणी करणे आदी आरोप ठेकेदारांच्या वतीने उपअभियंता गिते यांच्यावर करण्यात आले होते.

 
व्हॅट’चा बोजा सदनिकाधारकांवर पडू न देण्याची दक्षता शासन घेणार Print E-mail

गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन आहिर यांची ग्वाही
प्रतिनिधी, पुणे
सदनिकांवरील ‘व्हॅट’चा बोजा ग्राहकांवर पडणार नाही, याची दक्षता शासन घेईल, अशी ग्वाही गृहनिर्माण, उद्योग राज्यमंत्री व पुणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सचिन आहिर यांनी बुधवारी दिली. गृहखरेदीच्या करारातील उल्लेखानुसार सदनिकाधारकांकडून ‘व्हॅट’ची वसुली केली जात असेल, तर शासनाकडून त्याबाबत योग्य वेळी खुलासा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो