महाराष्ट्र
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महाराष्ट्र
रायगड जिल्हा क्रिकेट निवड चाचणी २ नोव्हेंबरपासून नागोठणेला! Print E-mail

प्रतिनिधी, अलिबाग
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे २ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत रिलायन्स इंडस्ट्री क्रिकेट मैदान, नागोठणे येथे १४ वर्षांखालील, १९ वर्षांखालील, सीनियर अशा तीन गटांची अंतिम निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. मे २०१२ मध्ये रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे प्राथमिक निवड चाचणी घेण्यात आली होती.

 
खातेप्रमुखांविना दिंडोरी पंचायत समिती Print E-mail

गैरहजर अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश
वणी
अनेक महिन्यांपासून प्रभारी गटविकास अधिकारी असलेल्या दिंडोरी पंचायत समितीस बुधवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार यांनी अचानक भेट दिली असता सर्वच विभागांचे खातेप्रमुख कार्यालयात हजर नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त झालेल्या पवार यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईचे आदेश दिले.

 
रायगड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती भोईर यांची न्यायालयासमोर शरणागती Print E-mail

प्रतिनिधी, अलिबाग
गेल्या दीड महिन्यापासून फरार असणाऱ्या जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी आज अखेर शरणागती पत्करली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आज दिलीप भोईर आणि त्यांच्या सहा सहकारी अलिबागच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना उद्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्याचे आदेश दिले. 

 
धुळ्याच्या प्रभारी उपशिक्षणाधिकाऱ्यास लाच घेताना अटक Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक
पटपडताळणी प्रपत्र व हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करण्यासाठी तक्रारकर्त्यांकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे जिल्हा परिषदेचे प्रभारी उपशिक्षणाधिकारी दीपक सुरेश सोनवणे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ ताब्यात घेतले.

 
उसाचा दर खुल्या बाजारात ठरू द्या! Print E-mail

शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांची मागणी
विशेष प्रतिनिधी, पुणे

उसाला किती दर द्यायचा हे सरकारने न ठरवता त्यांनी साखरेवरील लेव्ही-निर्यात यासारखी बंधने उठवावीत. त्यानंतर खुल्या बाजारात उसासाठी जो काही दर ठरेल तो आम्ही मान्य करू. सरकारला दर ठरवायचाच असेल तर टनाला किमान साडेचार हजार रुपयांचा दर द्यावा लागेल, अशी भूमिका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी घेतली आहे. उसाच्या दरावरून राज्यभर सध्या आंदोवलन पेटले आहे. खासदार राजू शेट्टी यांची स्वाभीमान शेतकरी संघटना आणि रघुनाथ पाटील यांची शेतकरी संघटना यांनी आक्रमकपणे आंदेलने सुरू केली आहेत.

 
राज्यातील वस्त्रोद्योगांना मदतीची अपेक्षा Print E-mail

मुंबईतील आजच्या वस्त्रोद्योग परिषदेकडे सूतगिरण्यांचे लक्ष
दयानंद लिपारे, कोल्हापूर

एकामागून एक संकटांची मालिका सुरू झाल्यामुळे राज्यातील सूतगिरण्या आत्यंतिक अडचणीत आलेल्या आहेत. अन्य राज्यांतही सूतगिरण्या अडचणीत असल्या तरी तेथील राज्य शासन मदतीचा हात देण्यास तत्पर असते. याउलट महाराष्ट्र राज्य शासनाने ४० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे नवे वस्त्रोद्योग धोरण जाहीर करून स्वस्थ बसणे पसंत केले आहे. राज्याच्या नव्या वस्त्रोद्योग धोरणामुळे नव्याने होणाऱ्या गुंतवणुकीचे प्रमाण चांगले असले तरी जुन्या उद्योगांची मात्र वाताहत होत चालली आहे. उत्पादनाखाली असलेल्या राज्यातील ६३ सहकारी सूतगिरण्यांच्या नाकासमोर सूत धरून तपासावे इतकी त्यांची प्रकृती क्षीण झालेली आहे,
 
जळगाव जिल्हा बँक घोटाळा; सुरेश जैन यांच्याविरोधात गुन्हा Print E-mail

आर्थर रोड तुरुंगात हलविण्याचे न्यायालयाचे आदेश
वार्ताहर, जळगाव

पालिकेच्या घरकुल घोटाळ्यानंतर वाघूर पाणीपुरवठा योजनेतील कोटय़वधी रुपयांच्या गैरव्यवहाराबद्दल या आधीच पोलिसात गुन्हे दाखल असताना आता जिल्हा बँक व विमानतळ विकास प्रकरणात तब्बल ६१५ कोटींचा घोटाळा झाल्याचा गुन्हा दाखल झाला असून या सर्व प्रकरणांमध्ये आ. सुरेश जैन हेच मुख्य संशयित आहेत. दरम्यान मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जैन यांना आर्थर रोड तुरुंगात हलविण्याचे आदेश देत जिल्हा न्यायालयाने मंगळवारी आणखी एक दणका दिला. महानगर विकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी शहर पोलीस ठाणे व जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जिल्हा बँक व विमानतळ विकास घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
 
प्रस्तावित कोळसा खाणींमुळे आठ व्याघ्र प्रकल्पांचे कॉरिडॉर्स धोक्यात Print E-mail

खास प्रतिनिधी, नागपूर

नव्या प्रस्तावित कोळसा प्रकल्पांना मंजुरी देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने देशातील आठ महत्त्वाच्या व्याघ्र प्रकल्पांना जोडणारे कॉरिडॉर्स धोक्यात येणार आहेत. शिवाय मध्य भारतातील १.१ दशलक्ष हेक्टरवरील जंगले आणि वन्यजीवांच्या अधिवासाला गंभीर स्वरूपाचा धोका निर्माण होण्याची भीती आहे. कोळसा, पर्यटन आणि पर्यावरण या पारंपरिक युद्धाला नवे वळण मिळण्याची वेळ आली आहे, असे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अँड एन्व्हायरोन्मेंटच्या जिओ-इन्फर्मेटिक्स प्रयोगशाळेतील सर्वेक्षणात १३ कोळसा खाणींच्या नकाशावरून देशातील १.१ दशलक्ष हेक्टर जंगलक्षेत्रात वृक्षतोड होण्याची जाण्याची शक्यता असून, यामुळे १८५ हजार हेक्टर वनक्षेत्रातील वाघ, २,७० हजार हेक्टरवरील बिबटे आणि ५५ हजार हेक्टरवरील हत्ती विस्थापित होतील.
 
ताडोबातील वाघिणीचा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात Print E-mail

सर्पदंशाने नव्हे, तर विषबाधेने झाल्याची शक्यता
देवेंद्र गावंडे, चंद्रपूर  

अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या ताडोबाच्या कोअरझोनमध्ये गेल्या शनिवारी झालेला गर्भवती वाघिणीचा मृत्यू सर्पदंशाने नव्हे, तर विषबाधेने झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ताडोबातील अधिकारी केवळ अकार्यक्षमता दडवण्यासाठी या वाघिणीच्या मृत्यूसाठी सापाला जबाबदार ठरवून मोकळे झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.  जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या येथील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला गेल्या दहा महिन्यांपासून वाघांच्या मृत्यूचे ग्रहण लागले आहे. कोटय़वधी रुपये खर्च करत अनेक नव्या उपाययोजना अमलात आणूनसुद्धा या प्रकल्पातील वाघ सुरक्षित नसल्याचे गेल्या शनिवारी पुन्हा एकदा सिद्ध झाले.
 
विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक

महागाई भत्त्यात सात टक्के वाढ मिळावी, यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्हा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि जिल्हा अधिकारी महासंघ या संघटना सहभागी झाल्या. जुलै २०१२ पासून महागाई भत्त्यात सात टक्के वाढ मिळावी, महागाई भत्त्याची ३५ महिन्यांची थकबाकी मिळावी, वाहतूक, शैक्षणिक, वसतिगृह यांचे भत्ते मिळावे, केंद्राप्रमाणे बोनस मिळावा, आगाऊ वेतनवाढ मिळावी, नवीन पेन्शन धोरण रद्द करावे,
 
राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेत ‘योगक्षेम’ विजेते Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा ब्रिज संघटनेच्या वतीने येथील मित्रविहार क्लबच्या शतक महोत्सवी राज्यस्तरीय स्पर्धेत पुण्याच्या ‘सौमित्र’ संघावर एका गुणाने मात करीत मुंबईच्या योगक्षेम संघाने विजेतेपद पटकाविले. २० हजार रुपये रोख व चषक असे पारितोषिक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विनोद कपूर यांच्या हस्ते योगक्षेमला देण्यात आले. तर सौमित्र संघास द्वितीय क्रमांकाचे १२ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. योगक्षेम संघात अरुण बापट, दीपक प्रधान, राज मोहन यांचा समावेश आहे. तर सौमित्र संघात सुहास वैद्य, अशोक वैद्य, मकरंद कुलकर्णी, कौस्तुभ बेंद्रे आणि नाशिकच्या मोहन उकिडवे यांचा समावेश आहे.
 
समस्यांच्या गर्तेतून औशाला नवी झळाळी! Print E-mail

प्रदीप नणंदकर, लातूर
मोकाट जनावरे, जागोजागी अस्वच्छता, डुकरांचा सुळसुळाट, पाहावे तिकडे प्लॅस्टिकच्या पिशव्या, घाण पाण्याची डबकी असे दीड महिन्यांपूर्वी औसा शहराचे बकाल रूप होते. या पाश्र्वभूमीवर गेल्या १ सप्टेंबरला दापोलीहून बदलून आलेल्या रामदास कोकरे यांनी औसा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली आणि आपल्या कर्तृव्याने ही परिस्थिती बदलून दाखवली़ कोकरे यांनी दापोली पालिकेत केलेल्या कामांची राज्य सरकारने दखल घेऊन दापोली पॅटर्न राज्यभर राबवण्याचे आदेश नगरपालिकेला दिले.

 
६६५ कोटींचा जिल्हा प्रारूप नियोजन आराखडा मंजूर Print E-mail

निधी खर्च न झालेल्या विभागांना पालकमंत्र्यांची तंबी
प्रतिनिधी, नाशिक
राज्य शासनाने ‘लक्ष्मणरेषा’ आखून दिल्यामुळे कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर २०१३-१४ या वर्षांसाठीच्या जिल्हा नियोजन प्रारूप आराखडय़ात वेगवेगळ्या योजनांसाठी आलेल्या तब्बल ६०० कोटींहून अधिकच्या मागणी प्रस्तावांना कात्री लावत जिल्हा नियोजन समितीने मंगळवारी ६६५ कोटी ५३ लाख रुपयांच्या आराखडय़ास मान्यता दिली.

 
स्थानिक विकास निधीतून आठ कोटीची कामे प्रस्तावित - खा. भुजबळ Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक
स्थानिक विकास निधीतून नाशिक लोकसभा मतदार संघात शिल्लक रकमेसह यंदा आठ कोटीची कामे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती खा. समीर भुजबळ यांनी दिली आहे. त्यामध्ये शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक वाचनालयांना संगणक आणि प्रिंटर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येकी ४० हजार रुपये देण्यात येणार आहे. शंभर टंचाईग्रस्त गावांना हातपंप वाटप करण्यासाठी पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

 
आंबोली मार्गावर आपत्कालीन यंत्रणेची रंगीत तालीम Print E-mail

वार्ताहर, सावंतवाडी
सावंतवाडी ते आंबोली मार्गावरील बुर्डी पुलाजवळ भीषण अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मंगळवारी आपत्कालीन यंत्रणेच्या रंगीत तालमीसाठी दिल्यावर सर्व यंत्रणा सतर्क बनली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व यंत्रणेकडे फोन खणखणला, पणप्रत्यक्ष घटनास्थळी रंगीत तालीम सुरू असल्याने सर्वानीच श्वास घेतला.

 
कोकण रेल्वेची डॉक्युमेंटरी भारतीय रेल्वे बोर्डाला सादर करणार Print E-mail

वार्ताहर, सावंतवाडी
कोकण रेल्वेची डॉक्युमेंटरी बनवून भारत सरकारच्या रेल्वे बोर्डाला इंग्लंडची टीव्ही ५ ही टीम सादर करणार आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत कोकण रेल्वे प्रवासात आमूलाग्र बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या डॉक्युमेंटरीसाठी कोकण रेल्वेचे तत्कालीन निवृत्त सर्वेसर्वा बी. राजाराम यांनी पेडणे येथे उपस्थिती दर्शविली.

 
चिरेखाण र्निबधांबाबत व्यावसायिकांची दिशाभूल Print E-mail

खास प्रतिनिधी, रत्नागिरी
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिरेखाणींवर सध्या असलेल्या र्निबधांबाबत काँग्रेस पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून जाणीवपूर्वक दिशाभूल केली जात असल्याचे उघड झाले आहे.  ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम घाटतज्ज्ञ समितीने सादर केलेल्या अहवालाच्या विरोधात खासदार डॉ. नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काल कणकवली येथे महामोर्चा काढण्यात आला.

 
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या नवीन शाखांमध्ये ६० लाखांच्या ठेवी Print E-mail

खास प्रतिनिधी, रत्नागिरी  
येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेतर्फे खंडाळा आणि चिपळूण येथे सुरूकरण्यात आलेल्या दोन शाखांमध्ये एकूण सुमारे ६० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी गोळा झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील या आघाडीच्या पतसंस्थेने गेल्या ६ सप्टेंबर रोजी खंडाळा येथे प्रथमच शाखा सुरू केली. त्यामध्ये आजअखेर २७ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून ३८ लाख रुपयांचे सोनेतारण कर्ज प्रकरणे झाली आहेत. या व्यतिरिक्त सुमारे सव्वाचार लाख रुपयांचे मुदतीचे कर्ज वितरण झाले आहे.

 
परुकीय गुंतवणुकीमुळे कृषी व्यवस्थेला बळकटी - डॉ. गिरधर पाटील Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक
थेट परकीय गुंतवणुकीमुळे देशाचा फायदाच होणार असून भारतीय कृषी व्यवस्थेला बळकटी प्राप्त होणार आहे, असे प्रतिपादन कृषी विषयक अभ्यासक डॉ. गिरधर पाटील यांनी येथे केले. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्चतर्फे आयोजित ‘मॅनेजमेंट ट्रायो-२०१२’ या चर्चासत्रात ‘कृषी क्षेत्रात थेट गुंतवणुकीमुळे होणारे परिणाम’ या विषयावर ते बोलत होते.

 
र्सवकष मूल्यमापन पुस्तिकेचे प्रकाशन Print E-mail

चोपडा
एप्रिल २०१० पासून राज्यात लागू करण्यात आलेल्या र्सवकष मूल्यमापन कार्यपद्धतीविषयी शिक्षकांना विस्तारित माहिती व्हावी म्हणून येथील पंकज विद्यालयाचे शिक्षक आर. डी. पाटील यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांसाठी लिहिलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन गटविकास अधिकारी डॉ. कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पुस्तिकेत शिक्षक मार्गदर्शिका भाग-१, भाग-२ आणि भाग-३ यांचा एकत्रित सारांश मांडला आहे.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 19 20 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो