उसाच्या दरावरून आंदोलन चिघळले वार्ताहर, इंदापूर साखर कारखान्यांनी जाहीर केलेला प्रतिटन २ हजार शंभर रुपये उसाचा दर सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील जोपर्यंत मागे घेत नाहीत व शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे दर जाहीर होत नाही तोपर्यंत कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यावर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी बुधवारी जारी केले आणि उपस्थित हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनास हात उंचावून पाठिंबा व्यक्त केला. |
संतप्त जमावाने मृतदेह नेला पालिकेत वार्ताहर,धुळे अस्वच्छता आणि डासांची उत्पत्ती वाढल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असतानाही महापालिकेकडून विशेष उपाययोजना केल्या जात नसल्याच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी डेंग्यूसदृश्य आजाराने एका बालकाचा मृत्यू झाला. या आजाराने मृत्यू झालेला हा आठवा रुग्ण होय. |
प्रतिनिधी , नाशिक वर्धा येथे आयोजित वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याच्या कर्णधारपदी नाशिकरोडच्या गणेश व्यायाममंदिरचा तुषार परदेशी व वीरेंद्र क्रीडा मंडळाची दीपिका पाटील यांची निवड करण्यात आली आहे. |
खास प्रतिनिधी, रत्नागिरी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पाच जिल्ह्य़ांसाठी कोल्हापूर येथे स्वतंत्र खंडपीठ व्हावे या मागणीसाठी येथील जिल्हा बार असोसिएशनतर्फे गेले तीन दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले. |
प्रतिनिधी,नाशिक येथील विद्या प्रबोधिनी प्रशाला येथे गुरुवारी दुपारी तीन वाजता जिल्हास्तरीय सेपक टकरा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यभान सादडे यांनी दिली. |
प्रतिनिधी ,नाशिक रंगभूमी दिनानिमित्त मुंबई येथे अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या वतीने आयोजित एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत नाशिक शाखेने सादर केलेली श्रीपाद देशपांडे लिखित ‘रास्कल’ एकांकिका सवरेत्कृष्ट ठरली. बारामती येथे होणाऱ्या नाटय़ संमेलनात ही एकांकिका सादर केली जाणार आहे. |
भाजपचे ‘मिशन - २०१४’ बाळासाहेब जवळकर पिंपरी, बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा असलेले भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्याकडे आगामी निवडणुकांचे नेतृत्व सोपवण्यात आल्यानंतर त्यांनी प्रदीर्घ राजकीय अनुभवाच्या आधारे ‘मिशन-२०१४’ ची रणनीती आखली आहे. सत्ताधाऱ्यांचे घोटाळे, वाढती महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न यासारख्या ज्वलंत विषयांवर सरकारविरोधात रस्त्यावर येऊन कडवा संघर्ष करण्यापूर्वी त्यांनी ‘घरदुरूस्ती’ ला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे.
|
प्रतिनिधी
पुणे एखादी भाषा शिकण्यासाठी तेवढय़ा भाषेचेच ज्ञान पुरेसे होत नाही, तर त्या भाषेची अन्य भाषांशी नाळ जोडण्यासाठी कोशवाङ्मयाची निर्मिती आवश्यक असते. हे ध्यानात घेऊन प्रा. अविनाश बिनीवाले यांनी पाच दशकांच्या अभ्यासातून मराठी-डॉइच् (जर्मन) शब्दकोशाची निर्मिती केली आहे. |
हिवाळी अधिवेशनातील आखणीबाबत संभ्रम खास प्रतिनिधी
नागपूर पुढील महिन्यात येथे होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे वेध लागले असतानाच भाजपाध्यक्ष नितीन गडकरींवरील आरोपांच्या सावटामुळे विरोधकांच्या रणनीतीपुढेच संकट निर्माण झाले आहे. कोटय़वधींचा सिंचन घोटाळा हिवाळी अधिवेशनात गाजणार हे गृहीत धरण्यात आले आहे. |
धूरफवारणीसाठी औषधांचा तुटवडा सुहास सरदेशमुख औरंगाबाद सरकारदफ्तरी मराठवाडय़ात डेंग्यूचे आतापर्यंत ४८ रुग्ण नोंदविले गेले. पैकी सहा दगावले. आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. लक्षात आले की, डास वाढले आहेत. डास निर्मूलनासाठी मग उपाययोजनांची घाई सुरू झाली. हिवताप निर्मूलनाचे अधिकारी सरसावले. तेव्हा लक्षात आले की, राज्यात २२ ठिकाणी जागाच रिक्त आहेत! |
देवेंद्र गावंडे चंद्रपूर या जिल्हय़ातील सावली तालुक्यातील उसेगाव येथील २३ शेतकऱ्यांनी त्यांच्या सहकारी संस्थेमार्फत उसाची लागवड करावी यासाठी पूर्तीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मध्यस्थीने एक त्रीपक्षीय करार केला होता. १३ वर्षांपूर्वीचे हे प्रकरण आहे. या करारानुसार शेतकऱ्यांना बँकेने २६ लाख २६ हजाराचे कर्ज उपलब्ध करून दिले. |
वार्ताहर अकोले सहकारी साखर कारखाने बंद पाडून त्यांचा ऊस आपल्या खाजगी कारखान्यांसाठी पळविण्याचा सरकारमधील खासगी साखर कारखानदारांचा डाव असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केला. |
वार्ताहर सावंतवाडी गॅस सिलेंडरची दरवाढ ग्राहकांना आर्थिक फटका देणारी ठरत असतानाच सरसकट ग्राहकांना केवायसी फॉर्म भरून देण्यासाठी गॅस वितरण एजन्सीकडून आग्रह धरण्यात येत आहे. |
नगर सेक्सस्कँडल प्रतिनिधी औरंगाबाद अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून वाममार्गाला लावण्याच्या प्रकरणात नगरमधील सातजणांना जन्मठेपेची तर अन्य आठजणांना दहा वर्षे व इतर ४ आरोपींना ८ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी सुनावली. |
खास प्रतिनिधी रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्य़ातील दापोली तालुक्यात वसलेल्या कोळबांद्रे या लहानशा गावातील ग्रामस्थांनी स्वबळावर निधी उभारून आणि गरजेनुसार श्रमदानाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवला आहे. |
आतापर्यंत १६६ विद्यार्थ्यांकडून तक्रारी प्रतिनिधी पुणे अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची विमानाच्या तिकीट बुकिंगमध्ये चंदीगड येथील इंडोकॅनेडियन कंपनीकडून कोटय़वधीची फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याकडे करण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत १६६ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ६५ हजार रुपये घेऊन कोणतेही विमानाचे तिकीट न देता फसवणूक केल्याचे म्हटले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. |
प्रतिनिधी नाशिक जिल्हा संघटनेच्या वतीने येथे आयोजित २३ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या पुरूष व महिलांनी सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा क्रीडा व युवा सेवा संचालनालयाचे सहाय्यक संचालक रवि नाईक, नगरसेवक नाना महाले, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. |
नाशिक प्रतिनिधी सांगलीतील आटपाडी येथे आयोजित राज्यस्तरीय महिला व्हॉलीबॉल स्पर्धेत कोल्हापूर विभागाच्या संघास ३-० असे पराभूत करीत नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वीरेंद्र क्रीडा मंडळाने विजेतेपद पटकावले. |
प्रतिनिधी नाशिक मुंबईतील डबेवाल्यांपाठोपाठ आता रेल्वे स्थानकांवर ‘बूट पॉलिश’ करणाऱ्या १०० मुलांनी आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. |
प्रतिनिधी अलिबाग रायगड जिल्ह्यातील नऊ गावांत पसरलेली डेंग्यूची साथ आता आटोक्यात येण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एस. व्ही. पाटील यांनी दिली आहे. मुंबईप्रमाणेच पावसाळ्यानंतर रायगड जिल्ह्य़ातील १४ गावांत साथीच्या तापाची लागण झाली होती. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|